मुक्तपीठ टीम
लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रावर गुन्हा दाखल असून सध्या तो तुरुंगात आहे. दरम्यान अजय मिश्रा टेनी यांचे एक विधान सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये गृह राज्यमंत्री अजय टेनी पत्रकाराची कॉलर पकडून, अपशब्द वापरताना दिसत आहे. यामुळे अजित मिश्रा टेनी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये अजय मिश्रा यांना मुलगा आशिष मिश्राबाबत प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी पत्रकाराची कॉलर पकडली आणि शिविगाळ केली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक टेनीवर प्रश्न उपस्थित करत आहेत.
व्हिडिओ शेअर करताना ज्येष्ठ पत्रकार उमाशंकर सिंह यांनी ट्विट केले आणि लिहिले, ‘लखीमपूर खेरी प्रकरणातील मुख्य आरोपीचे वडील आणि गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी प्रश्न विचारल्याने संतापले होते. पत्रकाराला धमकी दिली. त्यांनी आणखी एका ट्विटमध्ये लिहिले की, पुढचा व्हिडिओ आणखी भयावह आहे. पत्रकाराचा मोबाईल बंद करण्याचा प्रयत्न केला, शिवीगाळ करतात, धमक्या देतात.
लखीमपुर खीरी मामले के मुख्य अभियुक्त के पिता और गृह राज्य मंत्री अजय मिश्रा टेनी सवाल पूछने पर भड़के। पत्रकार को धमकाया… pic.twitter.com/gBXelPSf8o
— Umashankar Singh उमाशंकर सिंह (@umashankarsingh) December 15, 2021
व्हिडिओ शेअर करताना, कवी कुमार विश्वास यांनी ट्विट केले की, ‘देशातील लोकशाही, लोकप्रतिनिधींचे उत्तरदायित्व आणि अभय रामराज्यासाठी गृह राज्यमंत्री यांची नम्रता, सार्वजनिक धमक आणि उद्दामपणा निःसंशयपणे निषेधार्ह आहे, परंतु मीडियाचे मित्र हल्ला झाल्यावरच प्रश्न उपस्थित करणार का?
राहुल गांधी काय म्हणाले?
- काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी अजय मिश्रा टेनी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
- मोदी सरकारला गृहराज्यमंत्र्यांना हटवावे लागेल, असे ते म्हणाले.
- आणि त्यांना तुरुंगात जावे लागेल, मग ते ५ वर्षे, १० वर्षे किंवा १५ वर्षे असो.
- लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी एसआयटी टीमने अजय मिश्रा टेनी यांच्या मुलाविरुद्ध हत्येचा कट रचणे आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.