Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यात ‘नर्सरी हब’ सुरु करण्यासंदर्भात कृषी विद्यापीठांनी प्रस्ताव सादर करावा – कृषीमंत्री दादाजी भुसे

February 10, 2022
in सरकारी बातम्या
0
राज्यात नर्सरी हब सुरु करण्यासंदर्भात आढावा बैठक 1.jpg

मुक्तपीठ टीम

राज्यात एकाच ठिकाणी फुले, फळे व भाजीपाला तसेच रोपे, कलमे विक्री सुविधा केंद्र (नर्सरी हब) असणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या ठिकाणच्या रोपवाटिकाधारकांसाठी त्यांच्याकडील फळे, भाजीपाला, फुले, मसाला पिके, औषधी व सुगंधी वनस्पती इ. पिकांच्या कलमे-रोपे विक्रीसाठी एकत्रित सुविधा निर्माण व्हावी यासाठी राज्यात ‘नर्सरी हब’ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून कृषी विद्यापीठांनी यासंदर्भात प्रस्ताव सादर करावे, असे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

मंत्रालयात राज्यात नर्सरी हब सुरु करण्यासंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला कृषी विद्यापीठांचे कुलगुरु, कृषी आयुक्त धीरज कुमार, रोपवाटिका उत्पादक शेतकरी प्रतिनिधी, संबंधित अधिकारी उपस्थित होते. राज्यातील विभागानुसार पीक पद्धतीचा अभ्यास करुन कृषी विद्यापीठांनी प्रायोगिक तत्वावर नर्सरी हब सुरु करण्यासाठी प्रस्ताव तयार करावा. अशी सूचना देऊन यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांचा आराखडा तयार करावा, असे निर्देश कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

कृषीमंत्री दादाजी भुसे म्हणाले, शेतकऱ्यांना फळे, भाजीपाला, फुले, मसाला पिके, औषधी व सुगंधी वनस्पती इ. फलोत्पादन पिकांच्या विविध वाणांची कलमे-रोपे एका ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करुन निवड करता येईल. तसेच विशिष्ट वाणाच्या खरेदी-विक्रीतील किंमतीचा फरक कमी होऊन अवास्तव नफेखोरीला आळा बसून शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. यामुळे लघुउद्योगास चालना, रोजगार निर्मितीमध्ये वाढ, शोभीवंत फुले-फळे निर्यात वाढून देशाच्या परकीय चलनवाढीस मदत होईल, असेही कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

 

पुणे कृषि भवनाच्या कामाला गती द्यावी – कृषिमंत्री दादाजी भुसे

शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध कृषि योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच एकाच ठिकाणी शेतकऱ्यांना कृषि सेवा उपलब्ध व्हावी यासाठी कृषि विभागाचे कामकाज एका छताखाली आणण्यासाठी पुणे येथे कृषि भवन उभारण्यात येत आहे. कृषि भवनाच्या कामाला गती देवून हा प्रकल्प वेळेत पुर्ण करावा, अशा सूचना कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या.

 

मंत्रालयात कृषि मंत्री कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथील कृषि भवनाच्या बांधकाम आराखडासंदर्भात सादरीकरण करण्यात आले. यावेळी कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे आधिकारी उपस्थित होते.

 

राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र आणि राज्यशासनाच्या कृषि योजनांची सेवा आणि माहिती एका ठिकाणी उपलब्ध व्हावी आणि प्रशासकीय कार्यालये कामकाजाच्या दृष्टीने एकाच ठिकाणी आणल्यास कामाला गती प्राप्त होईल. त्यासाठी उभारण्यात येणाऱ्या कृषि भवनाचे काम कालमार्यादेत पूर्ण करावे, असेही कृषिमंत्री कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.


Tags: Dadaji BhuseMaharashtraNursery hubकृषीमंत्री दादाजी भुसेनर्सरी हब
Previous Post

अण्णा हजारेंच्या उपोषणानंतर तरी आघाडी सरकारचं ‘वाइन प्रेम’ उतरणार?

Next Post

सचिन वाझेने जबानी बदलल्यानं अनिल देशमुख अडचणीत! सीबीआयनंही केली सहकाऱ्यांची चौकशी!

Next Post
waze vs deshmukh

सचिन वाझेने जबानी बदलल्यानं अनिल देशमुख अडचणीत! सीबीआयनंही केली सहकाऱ्यांची चौकशी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!