जगदीश ओहोळ
‘प्राँव्हिंशियल डिसेंट्रलायझेशन आँफ इंपीरियल फायनांन्स इन ब्रिटिश इंडिया’ या शोधनिबंधावर ‘मास्टर आँफ सायन्स’ ही पदवी घेवून बाबासाहेबांनी आता D.SC साठी लंडन विद्यापीठात ‘द प्राँब्लेम आँफ रुपी’ हा शोधनिबंध सादर केला होता. दरम्यान प्रोफेसर एडविन कँनन यांच त्यांना एक पत्र आलं, त्यात असं लिहीलं होतं की सदर शोधनिबंधाचा निष्कर्ष बदलुन शोधनिबंध पुन्हा सादर करावा. बाबासाहेब विद्यापीठात आले त्यांनी आपला शोधनिबंध पुन्हा पाहिला, त्यातील निष्कर्ष त्यांना योग्य वाटत होते. म्हणुन त्यांनी लंडन स्कुल आँफ सायन्सचे प्रा.हेराँल्ड जे लाँस्की यांचे सोबत चर्चा केली, तेव्हा ते म्हणाले मि.आंबेडकर “ब्रिटिश साम्राज्यवादी विचारसरणीचं विश्लेषण आपण आपल्या या शोधनिबंधामध्ये केलंय आणि शेवटी आपण खुपच क्रांतीकारी स्वरुपाचे निष्कर्ष काढले आहेत.”
‘ असं केलं ही माझी चूक झाली आहे का, प्राध्यापक लाँस्की?’ आंबेडकरांनी विचारलं. ‘मी असं कधी म्हटलं?’ ” मग..? ”
“प्राध्यापक कँनन यांनी जे सांगितलय त्यावर थोडा शांतपणे विचार करा. तसं केलं तरंच तुम्हाला D.SC ची पदवी मिळू शकते. नाहीतर तुमच्या शोधनिबंधा विषयी आम्हाला फेरविचार करावा लागेल.. तुमचे श्रम सार्थकी लावायचेत की नाही याचा निर्णय तुमचा तुम्हाला घ्यायचा आहे..” प्राध्यापक लाँस्कींनी म्हटलं.
आता बाबासाहेबां समोर D.SC शिवाय भारतात माघारी येण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण जवळचे पैसे संपत आले होते. बाबासाहेब खुप उदास व निराश झाले. त्यांनी भारतात जाऊन या शोधनिबंधावर पुन्हा समीक्षा व परिवर्तन करण्याचा विचार केला.
त्यावेळी अस्नोडकर हा त्यांचा तेथील रुममेट होता, तो बाबासाहेबांना सोडण्यासाठी जहाजावर आला होता. तो बोलत होता, ” तुम्ही आपल्या देशात परत जात आहात, तिथं तुमचा शोधनिबंध पुन्हा तपासा, त्यावर आणखी संशोधन करुन पुन: सादर करा. तुमच्या आयुष्यात एक दिवस असा येईल की, तुम्हाला पदवी देवून विद्यापीठांना सन्मानित झाल्यासारखं वाटेल.”
बाबासाहेबांचा प्रवास सुरु झाला, जहाज चारी बाजूंनी पाण्याने वेढले अन् बाबासाहेबांना विचारांनी.
पुढे अस्नोडकरांचे शब्द सार्थ झाले.. लंडन विद्यापीठ धन्य धन्य झाले. आज त्या विद्यापीठात त्यांच्या इतिहासातील एकाच हुशार विद्यार्थ्याचा पुतळा उभारला आहे symbol of knowledge म्हणुन ते म्हणजे याच महामानवाचा..।
(जगदीश ओहोळ हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते, कवी व लेखक आहेत)
9921878801