मुक्तपीठ टीम
दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताबची येत्या दोन दिवसांत नार्को टेस्ट होऊ शकते. आफताबची पोलिस कोठडी संपणार आहे, त्यामुळे उर्वरित काळात आणखी पुरावे गोळा करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. आफताब पोलिसांना खोटी माहिती देऊन तपासात दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याने त्याची नार्को टेस्ट करण्यात येणार आहे.
नार्को टेस्ट म्हणजे काय?
- नार्को शब्द हा ग्रीक नार्क शब्दापासून घेण्यात आला आहे, ज्याचा अर्थ नार्कोटिक.
- याला ‘ट्रुथ सिरम’देखील म्हटले जाते.
- नार्को टेस्ट करण्यासाठी सोडियम पेंटोथॉल, सोडियम एमेटल, इथेनॉल, बार्बीचेरेट्स, स्कोपोल-अमाइन, टेपाजेमॅन इत्यादी शुद्ध पाण्यामध्ये मिसळले जाते.
नोर्को टेस्टमध्ये आरोपी खरं बोलू लागतो…
- ऍनेस्थेसियाद्वारे ज्याला हे इंजेक्शन दिले जाते, ज्यामुळे व्यक्तीला भान राहत नाही.
- त्यामुळे ही व्यक्ती कुठल्याही प्रभावाशिवाय अथवा आत्मनिर्बंधाशिवाय बोलू लागते.
- या दरम्यान, त्याच्याकडे स्वतंत्रपणे विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता नसते.
- अशा परिस्थितीत, कोणताही प्रश्न विचारला तरी तो सहसा सर्वकाही अचूकपणे सांगतो.
- नार्को टेस्ट दरम्यान, आण्विक स्तरावर व्यक्तीच्या मज्जासंस्थेमध्ये हस्तक्षेप करून प्रतिबंध कमी केले जातात.
- झोपेसारख्या अवस्थेत, त्याला सर्व काही सांगितले जाते ज्याबद्दल त्याला माहिती आहे.
- मानवी लिंग, वय, आरोग्य आणि शारीरिक स्थिती यानुसार इंजेक्शनचा डोस ठरवला जातो.
- या प्रक्रियेदरम्यान, व्यक्तीच्या नाडीचा दर आणि रक्तदाब यांचे सतत निरीक्षण केले जाते.
- रक्तदाब किंवा पल्स रेट कमी झाल्यास आरोपीला तात्पुरता ऑक्सिजनही दिला जातो.
नार्को टेस्ट १०० टक्के खरी?
- नार्को टेस्ट करताना १०० टक्के एखाद्या व्यक्ती खरं बोलेल असं नाही.
- बर्याच प्रकरणांमध्ये भ्रष्ट गुन्हेगार नार्को टेस्टही फसवणूक करतात.
- निठारी प्रकरणातही असाच काहीसा प्रकार घडला होता, जेव्हा पोलिसांना या चाचणीतून विशेष काही कळू शकले नाही.
- त्याचप्रमाणे २००७ च्या हैदराबाद दुहेरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अब्दुल करीम आणि इम्रान यांनाही नार्को चाचणीत विशेष काही कबुली देता आली नाही.
व्यक्तीच्या संमतीशिवाय चाचणी केली जात नाही-
- नार्को चाचणी करण्यासाठी न्यायालयाच्या संमतीसह व्यक्तीची संमती देखील आवश्यक आहे.
- नार्को अॅनालिसिस, ब्रेन मॅपिंग आणि पॉलीग्राफ टेस्ट कोणत्याही व्यक्तीच्या संमतीशिवाय करता येणार नाहीत, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.
- हे बेकायदेशीर आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे उल्लंघन असल्याचे न्यायालयाने म्हटले होते.
- ज्या व्यक्तीची नार्को टेस्ट केली जाते, त्याला त्याच्या प्रक्रियेबद्दल सर्व काही आधीच सांगितले जाते.
- जेव्हा तो पूर्णपणे समाधानी असतो, तेव्हा डॉक्टर त्याची वैद्यकीय तपासणी करतात.
- तपास यंत्रणा आरोपींची थेट चौकशी करत नाही, तर प्रश्नांची यादी तयार करून डॉक्टरांना दिली जाते.
- डॉक्टरच आरोपीला सर्व प्रश्न विचारतात.
- या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग होतो.
या प्रश्नांची उत्तरे नार्को टेस्टद्वारे पोलिसांना मिळणार आहेत
- श्रद्धाची हत्या कधी आणि का झाली? आणखी कोणी सहभागी आहे का?
- श्रद्धाचं डोकं आणि शरीराचे इतर अवयव कुठे फेकले गेले?
- श्रद्धा आणि स्वतःचे कपडे कुठे ठेवले?
- ज्या शस्त्राने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करण्यात आले ते शस्त्र कुठे लपवले होते?
- श्रद्धाचा मोबाईल कुठे आहे?