अपेक्षा सकपाळ / मुक्तपीठ टीम
मुंबईच्या हिंदमाता परिसरातील दशकानुदशकांची पाणी तुंबण्याची समस्या दूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या समस्येवर मात करण्यासाठी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंच्या पुढाकाराने राबवण्यात आलेल्या भूमिगत टाक्यांच्या योजनेचे काम आता जवळजवळ पूर्ण झाले आहे. स्वत: आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करून तुंबणारे पाणी साठवण्यासाठी बांधलेल्या टाक्या अंतर्गत भूयारी मार्गाने एकमेकांशी जोडण्यात आल्या असल्याची माहिती दिली आहे.
A major milestone achieved by @mybmc today. The rainwater holding tanks tor Hind Mata flood spot, that we got under way are now fully connected through micro tunnel to ensure no stagnation of water, during heavy rain at Hind Mata junction for 80 mins.
(1/n) pic.twitter.com/YGzDbtzbfU— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 31, 2021
हिंदमाता परिसरात नेमची येतो पावसाळा आणि पावसाळ्यात पाणी तुंबण्याची समस्या तशी नेहमीचीच. दशके लोटली पण पावसाळ्यातील या समस्येपासून हिंदमाता परिसराची मुक्तता काही झाली नाही. मात्र, आता ही समस्या सुटण्याची शक्यता आहे. साचणाऱ्या पाण्यावर उपाय म्हणून प्रमोद महाजन उद्यान, हिंदमाता फ्लायओव्हर, सेंट झेव्हियर्स ग्राऊंड या तीन ठिकाणी भूमिगत टाक्यांची कामे आता पूर्ण झाली आहेत.
हिंदमाता परिसर खोलगट असल्यामुळे पावसाळ्यात त्याठिकाणी पाणी साचते. मुसळधार पाऊस झाल्यास या परिसरात पाणी मोठ्या प्रमाणात तुंबते व त्याचा लवकर निचरा होत नाही. अशा वेळी या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेमार्फत या भूमिगत टाक्या बांधण्यात आल्या आहेत. या कामावर पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी लक्ष ठेवत होते. आजही त्यांनी काम पूर्ण झाल्याची चांगली बातमी ट्वीटद्वारे दिली.
पाणी साचण्याच्या समस्येवर भूमिगत उपाय
- जोरदार पर्जन्यवृष्टी तसेच मोठ्या भरतीच्या कालावधीमध्ये या भूमिगत टाक्यांचा विशेष उपयोग होईल.
- या ठिकाणी तुंबणाऱ्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.या मोठ्या भूमिगत टाक्या पावसाळ्यामध्ये कमीतकमी ३ तास पावसाचे अतिरिक्त पाणी साठवून ठेवण्यास मदत करतील.
- मुंबईच्या ज्या ज्या भागामध्ये मुसळधार पावसात पाणी तुंबते अशा ठिकाणी यासारखे प्रकल्प उभे करता येतील, असे पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.
- या भूमिगत टाक्यांच्या वरच्या बाजूस अर्बन लँडस्केपिंग करुन त्या आच्छादित केल्या जातील.
- मुंबईतील ज्या भागात विशिष्ट भौगोलिक रचनेमुळे पावसात पाणी साचते किंवा पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप वापरणे कठीण होते अशा ठिकाणी मुंबई महापालिकेने अशा भूमिगत टाक्या बांधण्यासाठी आणखी संभाव्य जागांसाठी शोध सुरू केला आहे.