मुक्तपीठ टीम
अदिती सिंह दिल्लीची एक तरुण विद्यार्थीनी. खरंतर अभ्यास करता करता ती शेजाऱ्यांचे वायफाय पासवर्ड हॅक करु लागली. त्यातून तिची रुची वाढत गेली आणि ती एथिकल हॅकर झाली. नुकतंच तिने मायक्रोसॉफ्टच्या सिस्टममधील एक मोठा बग शोधला आहे. या जबरदस्त कामगिरीसाठी तिला तसाच मोठा पुरस्कार मिळाला आहे. मायक्रोसॉफ्टने अझ्योर क्लाउड सिस्टममधील बग शोधण्यासाठी अदितीला २२ लाख रुपयांचे बक्षीस दिले आहे. दोन महिन्यांपूर्वी फेसबुकमध्येही तिने असाच बग शोधला होता. त्यानंतर आदितीला हा दुसरा मोठा बग सापडला आहे.
मायक्रोसॉफ्ट आणि फेसबुकमध्ये आढळले एकसारखे बग
• मायक्रोसॉफ्ट अझ्योरमधील आरसीई बग अदितीने दोन महिन्यांपूर्वीच शोधून काढला होता आणि कंपनीला त्याबद्दलही माहिती दिली होती.
• परंतु, कंपनीने प्रतिसाद दिला नाही कारण, कोणीतरी सिस्टमचा इनसिक्योर व्हर्जन डाउनलोड केला आहे की नाही याची आधी तपासणी सुरू होती.
• अदितीच्या म्हणण्यानुसार, दोन्ही कंपन्यांमध्ये समान प्रकारचे रिमोट कोड एक्झिक्यूशन बग आढळले.
• जे कंपनीसाठी अत्यंत घातक ठरू शकतात.
• हा बग अगदी नवीन आहे आणि सहज शोधला जाणारा नाही.
विद्यार्थीनी कशी झाली हॅकर?
• अदितीने गेली दोन वर्षे ज्या एथिकल हॅकिंगमध्ये काम केले, ती या क्षेत्रात कशी गुंतली याविषयीही बोलले.
• अदितीचा पहिला हॅकिंग अनुभव घेतला तो तिच्या शेजारच्या घरातील वाय-फाय पासवर्ड हॅक करून.
• ती वैद्यकीय प्रवेश परीक्षा एनईईटीसाठी तयारी करत असताना तिने एथिकल हॅकिंगमध्ये रस घेतला.
• अदितीला फेसबुक, टिकटॉक, मायक्रोसॉफ्ट, मोझिला, पेटीएम, एथेरियम आणि एचपी यासह ४० हून अधिक कंपन्यांमध्ये बग्स सापडले.
• टिकटॉकच्या फॉरगॉट पासवर्ड सिस्टममध्ये ओटीपी बायपास बग शोधल्यानंतर तीला एथिकल हॅकिंगबाबत योग्य खात्री झाली.
• तिला फेसबुक तर्फे ५.५ लाख रुपयांचे बक्षीसही मिळाले आहे.