Friday, May 16, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

मुंबईत विकास कार्यांचे वेगवान सोहळे, राजीव यांच्या आभारासाठी की निवडणुकीची तयारी?

मुंबईत मेट्रो मार्गिकांच्या चाचणीचा शुभारंभ, भुयारी मार्गाचे भूमिपूजन, उड्डाणपुलांचे ई लोकार्पण

May 31, 2021
in featured, सरकारी बातम्या
0
mumbai

मुक्तपीठ टीम

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही कडक निर्बंध असताना विकासाचा वेग मंदावला नाही. मुंबई शहराला दिशा आणि वेग देणाऱ्या नव्या पिढीच्या विचारांना प्रत्यक्षात उतरविण्यात आल्याने मेट्रोचं काम आखीव रेखीव आणि देखणे झाले आहे. कोरोनाचा धोका अजुनही टळला नाही गाफील न राहता आयुष्याला ब्रेक लागणार नाही याची दक्षता घ्या, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील एम.एम.आर.डी.ए.च्या जंगी सोहळ्यात केले. मुंबईत मेट्रो मार्गिकांच्या चाचणीचा शुभारंभ, भुयारी मार्गाचे भूमिपूजन, उड्डाणपुलांचे ई लोकार्पण या विकास कार्यासाठी आयोजित सोहळा आज राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही खूप दिवसांनी ते अशा मोठ्या सोहळ्यास उपस्थित राहिल्याची भाषणात खास उल्लेख केला. मेट्रो प्रकल्पात सिंहाचा वाटा असणाऱ्या आर. ए.राजीव यांच्या सेवा विस्ताराच्या शेवटच्या दिवशी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला, असे काहींचे मत आहे. मात्र, हा सोहळा केवळ केवळ त्यासाठी नव्हता तर काही महिन्यांवर आलेल्या मुंबई आणि मुंबई महानगर परिसरातील अन्य महापालिकांच्या निमित्ताने कोरोना संकटातही आघाडी सरकारचे त्यातही शिवसेनेचे विकास कार्य थांबवले नाही, असा संदेश देण्याच्या उद्देशानेही असल्याचे मानले जाते.

डहाणूकरवाडी ते आरे स्थानका दरम्यानच्या मेट्रो मार्गिकांच्या चाचणीचा शुभारंभ, पश्चिम द्रुतगती महामार्ग (टर्मिनल १ अणि २) येथील नियंत्रित प्रवेश भुयारी- उन्नत मार्ग प्रकल्पाचे भूमिपूजन, राजणोली उड्डाण पुल मार्गिका आणि दुर्गाडी पुलाच्या दोन मार्गिकांचा ई लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, उद्योगमंत्री सुभाष देसाई, अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक, मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार राहुल शेवाळे, आमदार झीशान सिद्दीकी आदी यावेळी उपस्थित होते.

 

पुण्यश्लोक अहिल्या देवी यांच्या जयंतनिमित्त त्यांना अभिवादन करून मुख्यमंत्र्यांनी भाषणाला सुरूवात केली. ते म्हणाले, आजचा कार्यक्रम हा या महानगराला दिशा आणि वेग देणारा आहे. वर्षभराहून अधिक काळ कोरोनाचे सावट राज्यावर आहे. मात्र याकाळात उपचारांच्या सुविधा निर्माण करतानाच मुंबई सारख्या वेगवान महानगराचा विकासाचा वेग कमी होऊ दिला नाही. मुंबई वाढतेय तसा तिच्या विकासाचा वेगही कायम राखतोय, असेही त्यांनी सांगितले. विविध पायाभूत आणि दळणवळणाच्या प्रकल्पांमुळे मुंबई जो वेग घेत आहे त्या प्रवासात मुख्यमंत्री म्हणून सहभागी होता आले असे सांगतानाच मेट्रोची स्थानके, कोच यासाठी नव्या पिढीच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीची जोड दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

सांघिक यश

मुंबई आधुनिकतेची कास धरणार शहर असलं तरी त्याला प्राचीनतेचा वारसा आहे. आगळवेगळ विविधतेन नटलेल्या शहरात होत असलेली विकास कामे हे सांघीक यश असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

 

मुंबईच्या रस्त्यांवर वाहतुकीच्या गर्दीचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले, कोरोना रोखण्यासाठी जे निर्बंध आहेत ते अजून उठवलेले नाही. गर्दी करू नका. कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही गाफील राहीलो तर आयुष्याच्या वेगाला ब्रेक लागेल, असा इशारा देतानाच कोरोना काळात विकास कामांचा पुढचा टप्पा वेगाने पार पाडावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

 

राज्याच्या विकासाला खीळ बसू दिली नाही- उपमुख्यमंत्री 

पुण्यश्लोक अहिल्या देवी यांच्या आदर्श राज्यकाराभाराप्रमाणे राज्य शासनाचे सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्राला देशात प्रगतीशील राज्य बनविण्यामध्ये मुंबईचा मोठा वाटा आहे. राज्याचा प्रगतीचा वेग कायम राखण्यासाठी देशाच्या आर्थिक राजधानी वेगवान ठेवण्याच काम विविध पायाभूत प्रकल्पांच्या माध्यमातून होत आहे. गेल्या सव्वा वर्षांत कोरोनाची पहिली लाट, दुसरी लाट, निसर्ग चक्रीवादळ, तौक्ते चक्रीवादळ अशी नैसर्गिक संकटे आली मात्र त्यावर मात करीत राज्याच्या विकासाला खीळ बसू दिली नाही.

 

राज्य शासनाची यंत्रणा किती गतीने काम करतेय याचं उदाहरण देताना उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात एका दिवसात ३० किमी लांबीचा डांबरी रस्ता तयार करण्याचे काम झाले असून त्याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईत देखील रात्रीच्या बारा तासात सिमेंट रस्ता तयार करण्याचे काम हाती घ्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले. कोरोनाच्या संकटला दूर करायचं तर नियमावलीचं पालन होण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. वादळात मोठी झाडं उन्मळून पडल्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली त्यातून झालेल्या चर्चेनुसार हेरिटेज ट्री हा संकल्पना महाराष्ट्र राबविणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

 

महसुलमंत्र्यांकडून यंत्रणेचे अभिनंदन

मुंबईच्या विकासासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करू, असे केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी सांगितले. कोरोनाच्या संकटात पायाभूत सुविधांचे प्रकल्प गतीने पूर्ण झाल्याबद्दल महसुल मंत्री थोरात यांनी यंत्रणांचे अभिनंदन केले.

 

मुंबईकरांचा प्रवास सुखकर होण्यासाठी- एकनाथ शिंदे

मुंबई आणि महानगर परिसराला जोडणारे हे प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण होत असून त्यामुळे मुंबईकरांना दिलासा देण्याचा आणि त्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. दुर्गाडी पुल आणि राजनोली उड्डाणपुलाचे काम झाल्यामुळे मुंबई महानगर परिसरातील नागरिकांना त्चा फायदा होणार असल्याचे नगरविकास मंत्री शिंदे यांनी सांगितले.एमएमआरडीएने केवळ रस्ते, पुल बांधले नाही तर कोरोना संकटाच्या काळात जम्बो कोरोना सेंटर्स उभारणी करून लाखो रुग्णांना दिलासा देण्याचं काम केल्याचं शिंदे यांनी सांगितले.

पश्चिम द्रुतगती महामार्ग हा दुसरा गेटवे ऑफ इंडिया- आदित्य ठाकरे

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबई शहरातील पश्चिम द्रुतगती महामार्ग हा दुसरा गेटवे ऑफ इंडिया असून या महामार्गावरील वाहतुक कोंडी आणि गर्दी कमी करण्यासाठी नियोजन केले जात आहे. या महामार्गावर सुबक आखीव रेखीव डिजाईन्स, हिरवळ तयार करून त्याचे सौंदर्यीकरण करण्यात येत आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावरील दहिसर ते माहिम पर्यंत सायकलींग किंवा चालत जाण्याची सोय करण्याचे नियोजीत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

यावेळी मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांच्या हस्ते नीरा आडारकर लिखीत मल्टिप्लिसीटीज या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच मेट्रो मार्गिका,टर्मिनल १ आणि २ भूयारी मार्ग, दुर्गाडी पुल, राजणोली उड्डाणपुल याबाबत सादरीकरण करण्यात आले. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी प्रास्ताविक केले. अतिरिक्त आयुक्त डॉ. गोविंदराज यांनी आभार मानले.

 

 

 

 


Tags: balasaheb thoratchief minister uddhav thackerayDeputy Chief Minister Ajit PawarMayor Kishori PednekarMinister Eknath Shindemumbaiअस्लम शेखआदित्य ठाकरेकेंद्रीय मंत्री रामदास आठवलेनवाब मलिक
Previous Post

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन, इंजिन देखभाल आणि परिचलन प्रशिक्षणासाठी प्रवेश सुरू

Next Post

“मराठा समाजाच्या स्वतंत्र आरक्षणाच्या जबाबदारीतून पळ काढू नका, घेतल्याशिवाय राहणार नाही”

Next Post
chandrakant dada patil

"मराठा समाजाच्या स्वतंत्र आरक्षणाच्या जबाबदारीतून पळ काढू नका, घेतल्याशिवाय राहणार नाही"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!