मुक्तपीठ टीम
पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांची रविवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सिद्धूच्या गाडीवर ३० राऊंड फायर करत हत्या केली आहे. अवघ्या २८ वर्षांच्या सिद्धूच्या हत्येने संपूर्ण पंजाब हादरला आहे. पंजाब सरकारने मूसेवालाची एक दिवसापूर्वीच सुरक्षा व्यवस्था काढून घेतली होती. यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्यावर हल्ला झाला यामध्ये मूसेवालचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सिद्धू मूसेवाला यांच्याशीसंबंधित वाद आणि त्याच्याशी असलेल्या वैराच्या चर्चा काय आहेत हे जाणून घेऊया…
सिद्धू मुसेवालाशी संबंधित कोणते वाद?
१. दुसऱ्या गायकाबरोबर वाद
रॅपर-गायक करण औजलासोबत सिद्धू मूस वालाचे काही वर्षांपासून वाद झाले होते. दोन्ही गायक सोशल मीडिया आणि गाण्यांच्या माध्यमातून एकमेकांवर निशाणा साधताना दिसले. या गाण्यांमध्ये दोन्ही गायकांनी एकमेकांविरुद्ध हिंसाचार भडकवण्यासंबंधीचे बोल वापरले होते, त्यामुळे त्यांच्यावर टीकाही झाली होती.
२. पोलिसांसोबत AK-47 चालवताना दिसले, अटक टाळण्यासाठी गायब
मे २०२० मध्ये सिद्धूचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामध्ये तो पाच पोलिसांसह एके-47 आणि वैयक्तिक पिस्तूल चालवण्याचे प्रशिक्षण घेताना दिसला. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सिद्धला मदत करणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्यात आले. या प्रकरणी सिद्धूविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी छापेमारी सुरू केली. मात्र, सिद्धू अटक टाळण्यासाठी गायब झाला. पोलीस तपासात त्याचा सहभाग असल्याने त्याला नंतर जामीन मंजूर करण्यात आला.
३. बंदूक संस्कृतीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप
६ जून २०२० रोजी, सिद्धूला गाडीला काळ्या काचा वापरल्याबद्दल दंड लावण्यात आले. मात्र, नंतर त्याची सुटका करण्यात आली. दोन वर्षापूर्वी २०२० मध्ये मूसेवाला यांच्या संजू गाण्यामुळं मोठा वाद निर्माण झाला होता. सोशल मीडियावर रिलीज झालेल्या गाण्यात त्याने स्वत:ची तुलना अभिनेता संजय दत्तशी केली होती. त्यानंतर भारतीय नेमबाज अवनीत सिद्धूने मूसेवाला बंदूक परंपरेला प्रोत्साहन देत असल्याची टीका केली.
४. खलिस्तानचे समर्थन
डिसेंबर २०२० मध्ये सिद्धू मूसेवालाचे नावही खलिस्तान समर्थनाशी जोडले गेले होते. सिद्धूने खलिस्तानी फुटीरतावादी जर्नेल सिंग भिंद्रनवाले यांना त्यांच्या ‘पंजाब: माय मदरलँड’ या गाण्यातून पाठिंबा दिला होता. या गाण्यात खलिस्तान समर्थक भूपर सिंग बलबीर यांनी १९८० मध्ये दिलेल्या भाषणातील काही दृश्यांचाही समावेश आहे.