मुक्तपीठ टीम
पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे (पीआयए) विमान शुक्रवारी मलेशियामध्ये जप्त करण्यात आले. पीआयएने भाड्याने घेतलेल्या बोईंग -७७७ विमानाचे भाडे दिले नाही म्हणून क्वालालंपूर विमानातळावर हे विमान जप्त करण्यात आले. तेव्हा त्या विमानात प्रवासी बसले होते. एका माध्यम अहवालाचा हवाला देत, वृत्तसंस्थेने सांगितले की, मलेशियन कोर्टाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.
पीआयए ही पाकिस्तानची सरकारी विमान कंपनी आहे. २०१५ मध्ये त्याने व्हिएतनाम कंपनीकडून दोन विमान भाड्याने घेतले होते. जप्त केलेल्या बोईंग -७७७ विमानाचा यात समावेश आहे. कंपनीने विमानाचे (लीज) भाडे भरण्यासाठी ६ महिन्यांपूर्वी युकेच्या न्यायालयात याचिका केली होती. यावर कोर्टाने हे विमान जप्त करण्याचे आदेश दिले.
पीआयए विमानाची प्रक्रिया करण्यात आली तेव्हा बोर्डिंग प्रक्रिया पूर्ण झाली होती. विमानात क्रूचे एकूण १८ सदस्य होते. कारवाईनंतर क्वालालंपूरमध्ये हे कर्मचारी आणि प्रवासी अडकले आहेत. प्रोटोकॉलनुसार, आता या सगळ्यांना १४ दिवसांसाठी कॉरंटाइन करण्यात येईल.
विमान ताब्यात घेतल्यानंतर पीआयएने सोशल मीडियावर आपल्या अधिकृत खात्यातून सांगितले की, “सर्व प्रवाशांची काळजी घेतली जात आहे आणि त्यांच्या प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था केली जाईल. एअरलाइन्सने सांगितले की ही पूर्णपणे अस्वीकार्य परिस्थिती आहे.”
कायदेशीर लढाईवर भाष्य करताना एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, “हा वाद विमानाचे भाडे न दिल्यामुळे झाला आहे जो एअरलाइन्स आणि व्हिएतनामी कंपनीत सुरू आहे. ते म्हणाले की,”कोर्टाच्या एकतर्फी कारवाईमुळे विमानात बसलेल्या प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला.”
बनावट परवान्यामुळे बर्याच देशांनी बंदी घातली
पीआयएवर बर्याच वर्षांपासून चौकशी केली जात आहे. विमान वाहतूक मंत्री गुलाम सरवर खान यांनी संसदेत विमान क्षेत्रातील एक अहवाल सादर केला. त्यात म्हटले आहे की, देशातील ४० ते ४५ टक्के पायलटकडे बनावट परवाने व डिग्री आहे. यानंतर पीआयएच्या विमानांवर मुस्लिम देश, युरोपियन युनियन आणि अमेरिकेसह इतर अनेक देशांनी बंदी घातली होती.