Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

चारही बाजूंनी महाराष्ट्र…तरीही कर्नाटकाच्या पाशात अडकलेलं एक मराठी गाव!

November 5, 2021
in featured, घडलं-बिघडलं, व्हा अभिव्यक्त!
0
Maharashtra Karnataka Border area

पियुष नंदकुमार हावळ

सीमाप्रश्नाचा अभ्यास या लढ्याची खरी ताकद आहे. फक्त झालाच पाहिजे म्हणून नाही तर का झालाच पाहिजे हे समजून घेणं जास्त महत्वाचं आहे.

 

नकाशातील पिवळ्या रंगात राखविलेला हा भाग सध्या कर्नाटकाच्या अखत्यारीत आहे. हा नकाशा मुद्दाम आज आपल्या समोर मांडत आहे कारण सीमाप्रश्न काय ? का लोक अजूनही संयुक्त महाराष्ट्रासाठी लढत आहेत, ते समजावं. फक्त मराठीचाच मुद्दा नाही, तर इतर अशी कित्येक कारण आहेत, ज्यामुळे सीमाभागातील मराठी माणूस त्रासला आहे. भाषिक मुद्द्यांवरून छळ तर होतोच पण इतर गोष्टी सुद्धा कशा अन्यायकारक आहेत याची साक्ष म्हणजे वरचा नकाशा. बेटाप्रमाणे दिसणारे गाव हे धामणे (एस) बैलूर . लाल रंगातील रेष ही कर्नाटक राज्याची सध्या सीमा रेषा आहे. आणि पांढऱ्या रंगातील भाग हा काही समुद्र नसून ती महाराष्ट्राची भूमी आहे. याचा अर्थ सीमाप्रश्नाच्या चक्रव्यूहात अडकलेले हे धामणे(एस) गाव आहे असे म्हणल्यास चुकीचे ठरणार नाही.

 

चारही बाजूने महाराष्ट्र आहे आणि मधल्या मध्ये हे गाव कर्नाटकातील आहे. बेळगाव शहरापासून साधारण २५ कि मी अंतरावर हे गाव आहे. तसे पाहायला गेल्यास बेळगाव शहरापासून पश्चिमेला ९ कि मी अंतरावर महाराष्ट्र राज्याची हद्द सुरु होते त्याच्या पुढे जाऊन या गावाला जाण्यासाठी प्रवास करावा लागत याचा विचार आधुनिक म्हणून घेणाऱ्या महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील मराठी माणूस कधी करणार आहे का ? गावाची लोकसंख्या साधारण ५००-५५० आहे . गावात १०० च्या आसपास घरे आहेत. भौगोलिक रित्याकोणत्याही दिशेने कर्नाटकाशी न जोडलेले गाव हे कोणत्या आधारावर कर्नाटकात आहे याचे उत्तर कोणत्याही सुज्ञ माणसाने द्यावे. का आम्ही लोक झालाच पाहिजे , झालाच पाहिजे म्हणतो याची उत्तरे अशा अनेक प्रश्नात तुम्हाला मिळतील. हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे.
या गावाला पाणी महाराष्ट्रकडून, वीज महाराष्ट्राकडून, रस्ता महाराष्ट्र हद्दीतून, पण नाव कुणाचं ? कर्नाटक राज्याचं का ?? कशासाठी ?

 

हा लेख वाचणारे अनेक लोक ग्रामीण भागातील असतील किंवा शहरी भागातील आहेत असे समजून पुढे एक प्रश्न . आपण ज्या ठिकाणी राहता तेथून ग्राम पंचायत कार्यालय किती दूर आहे (जर आपण ग्रामीण भागातील असाल तर ) किंवा शहरी भागातील लोकांनी सांगावे कि आपल्या घरापासून पालिका कार्यालय (मुख्य किंवा -उप कार्यालय)किती दूर आहे. ? आपली साधारण उत्तरे १ ते ३ किमी असेल ग्रामीण भागासाठी (काहीवेळा २-३ गावांची मिळून एक ग्राम पंचायत असते) शहरी भागात जास्तीत जास्त ५- ६ कि मी अंतरावर पालिका आहे किंवा त्यांचे विभागीय कार्यालय तर नक्कीच आहेत. या धामणे (एस) बैलूर लोकांचे दुर्भाग्य म्हणा हवं तर कारण या गावाची ग्राम पंचायत या गावापासून २० किमी अंतरावर आहे. मुंबई सारख्या महानगरात देखील पालिका कार्यालय एकाद्या माणसाला एवढे दूर नसावे. पण या गावातील लोकांना आपल्या पंचायत कामासाठी तब्बल २० किमी बेळवट्टी येथील ग्राम पंचायत मध्ये जावे लागते.

 

याला जवाबदार कोण ? १०० अपराधी सुटले तरी चालतील पण एक निरपराध्याला शिक्षा होता काम नये म्हणून लोकशाहीची टिमकी वाजविणारे म्हणतात मग या ५००-५५० लोकांना कशाची शिक्षा देत आहात ? ते मराठी असल्याची ? की या भोळ्या भाबड्या ग्रामीण लोकांना शहरात फोफावणाऱ्या अधिनुकतेची ? की राजकारणाची ?

 

मी लढ्यासाठी सक्रिय काम करायला सुरवात केल्यावर माझा मित्र सागर मुतकेकर याच्या सोबत या गावात जाऊन आलो होतो पहिल्यांदा . या गावा भोवती असणारी निसर्ग संपत्ती हि तर यांच्या या परिस्थितीला कारणीभूत नसावी ? कारण महाजन चे तुणतुणं वाजविणारे लोक हे विसरतात किंबहुना त्यांना माहित देखील नसेल कि भीमगड सारखा मराठ मोळा प्रदेश तिथल्या निसर्ग संपन्नतेला घशात घालण्यासाठी कर्नाटकाने आपल्याच ताब्यात ठेवला आहे कोणतेही सबळ कारण नसताना. मग या धामणे (एस) गावाची तर काय गय केली जाणार?

 

मित्रानो सीमाप्रश्न का याची असंख्य उत्तरे तुम्हाला या लढ्याच्या अभ्यासात मिळतील. अजूनही वेळ गेली नाही. या लढ्यात सक्रिय व्हा. कारण हा लढा फक्त भाषा आणि प्रांत यांचा नसून माणुसकी वाचविण्याचा देखील आहे.

Piyush Haval -11

(पियुष नंदकुमार हावळ हे महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्न अभ्यासक असून महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते आहेत.) piyush.haval88@gmail.com


Tags: BelgaonDhamanemaharashtra ekikran samiteemarathimuktpeethPiyush Nandkumar Hawalधामणेपियुष नंदकुमार हावळबेळगावमराठीमहाराष्ट्रमहाराष्ट्र एकीकरण समितीमुक्तपीठ Maharashtra
Previous Post

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत ११७ जागांसाठी अॅप्रेंटिसशिप संधी

Next Post

दिवाळीत कोरोना रुग्णांची संख्या घटती! ८०२ नवे रुग्ण, ८८६ रुग्ण घरी परतले!!

Next Post
MCR 4-8-21

दिवाळीत कोरोना रुग्णांची संख्या घटती! ८०२ नवे रुग्ण, ८८६ रुग्ण घरी परतले!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!