मुक्तपीठ टीम
मीशो या भारतातील एकमेव अस्सल ई-कॉमर्स बाजारपेठेने प्रत्येक व्यक्तीला इंटरनेट कॉमर्सची सुविधा उपलब्ध करवून देण्याच्या आपल्या उद्दिष्टामध्ये नवे टप्पे पार करत २०२२ हे लक्षणीय वर्ष ठरल्याची नोंद केली आहे. यंदाच्या वर्षी मीशोने तीन विक्री विक्रम रचले आहेत, यापैकी प्रत्येक विक्रम आधीच्या विक्रमाला मागे टाकणारा असून वस्तूंच्या मूल्याबाबत चोखंदळ असलेल्या देशभरातील ग्राहकांनी मीशोवरील दररोजच्या कमी किमती आणि विशाल उत्पादन श्रेणींना भरभरून प्रतिसाद दिला आहे.
शून्य कमिशन आणि शून्य दंड यासारख्या या उद्योगक्षेत्रात प्रथमच आणल्या गेलेल्या उपक्रमांमुळे गेल्या वर्षी महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांनी मीशोवर विक्री करायला सुरुवात केली. महाराष्ट्रातून गेल्या १२ महिन्यात ३०० पेक्षा जास्त विक्रेते कोट्याधीश बनले आहेत तर ६००० विक्रेते लक्षाधीश बनले आहेत. महाराष्ट्रातून मीशोवर आलेल्या पुरवठादारांमध्ये यंदाच्या वर्षी ४०% वाढ झाली, यापैकी ६०% पुरवठादारांनी त्यांची ई-कॉमर्स वाटचाल मीशोसोबत सुरु केली आहे. महाराष्ट्रातील खरेदीदारांनी सर्वाधिक पसंती ब्ल्यूटूथ हेडफोन्स, इयरफोन्स, साड्या, स्मार्ट वॉचेस, एक्स्टेंशन बोर्ड्स आणि कॉटन बेडशीट्स यांनी दिली आहे.
देशभरात सर्वत्र आणि सर्व प्रकारच्या सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीच्या भागांमध्ये ई-कॉमर्स वेगाने लोकप्रिय होत आहे. त्यामुळे देशातील वैविध्यपूर्ण ग्राहकवर्गाला वेगवेगळी उत्पादने, परवडण्याजोग्या किमतींना मिळत आहेत. भारताने २०२२ मध्ये खरेदी कशी केली हे दर्शवणारे काही प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत –
मीशोवर विक्रेते रचत आहेत नवी यशोगाथा
या उद्योगक्षेत्रात प्रथमच सुरु करण्यात आलेल्या शून्य कमिशन मॉडेलमुळे २०२२ मध्ये मीशोवरील विक्रेत्यांनी कमिशनचे ३७०० कोटी रुपये वाचवले. भारतभरातील लघु व मध्यम उद्योगांचे डिजिटायजेशन: २०२२ मध्ये मीशोवर ~५,००,००० पुरवठादार आहे, त्यापैकी ६१% साठी ई-कॉमर्स नवे होते आणि ते ऑनलाईन विक्री पहिल्यांदाच करत होते.
भारताचा खरेदीचा प्राईम टाईम
रविवार म्हणजे आराम करण्याचा दिवस आणि रविवार म्हणजे ऑनलाईन खरेदीचा देखील दिवस अशी नवी व्याख्या २०२२ मध्ये तयार झाली आहे. गेल्या वर्षी बुधवारी सर्वात जास्त ऑनलाईन खरेदी केली जात होती. दररोज रात्रीचे ८ हा मीशो ग्राहकांचा प्राईम टाईम आहे, २०२१ मध्ये दुपारी २ ते ३ या वेळेत सर्वाधिक खरेदी होत होती. लाखो ग्राहकांनी डिलिव्हरी कर्मचाऱ्यांना पत्ता समजून सांगण्यासाठी स्थानिक शब्दांचा वापर केला, जसे, पीपल का पेड, बरगद का पेड, आटा चक्की के पीछे आणि पानी की टंकी के पास. डिजिटल मॅप्सच्या तोडीस तोड देशी नेव्हिगेशन टूल्स अचूक ठरले आहेत.
भारत स्वतःची जास्त चांगली काळजी घेत आहे.
२०२२ मध्ये सर्वात जास्त शोध घेतल्या गेलेल्या उत्पादनांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे स्मार्टवॉच. शारीरिक आरोग्याला भारतीय महत्त्व देत असल्याचे यातून सिद्ध झाले आहे. ग्रूमिंग उत्पादनांना पुरुष भरपूर पसंती देत आहेत, ६०% पेक्षा जास्त ऑर्डर्स या चतुर्थ श्रेणी बाजारपेठांमधून येत आहेत. द्वितीय श्रेणी शहरांमधून सॅनिटरी नॅपकिन्ससाठी येणाऱ्या मागण्यांमध्ये ९ पट वाढ झाली आहे, भारतातील लाखो महिलांना ई-कॉमर्स किती सोयीचे बनत आहे आणि अनेक उत्पादने त्यांना याठिकाणी सहज उपलब्ध होत असल्याचे यातून दिसून येते.
२०२२ मधील शॉपिंग कार्ट
मीशोवर दर मिनिटाला १४८ साड्या विकल्या जातात आणि देशाच्या सर्व कानाकोपऱ्यांमधून ऑर्डर्स येत असतात. भारतीयांचे साडीप्रेम सातत्याने वाढत आहे. ९३००० टीशर्ट्स, ५१७२५ ब्ल्यूटूथ इयरफोन्स आणि २१६६२ लिपस्टिक्स दर दिवशी विकल्या गेल्या. राजस्थानात सर्वात जास्त ब्ल्यूटूथ इयरफोन्स विकले गेले, तर एक्स्टेंशन बोर्ड झारखंडमध्ये सर्वात जास्त विकले गेले, हरयाणामध्ये ब्ल्यूटूथ इयरफोन्स आणि आसाममध्ये बॉडी लोशन्सची सर्वात जास्त विक्री झाली.