मुक्तपीठ टीम
गरीब विद्यार्थ्यांना जम्मू-काश्मीरमध्ये सुपर-३० कार्यक्रमांतर्गत लष्कराकडून एमबीबीएस आणि नीटचे विनामूल्य प्रशिक्षण दिले जात आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत राज्यातील दोन बॅचचे ५२ विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात प्रवेश घेऊन आपले स्वप्न पूर्ण करीत आहेत.
सुपर ३० कोचिंग सेंटरकडून वर्षातून एक बॅच तयार केली जाते. मुलांना दररोज सहा तासांच्या वर्गात फिजिक्स, केमेस्ट्री, झूलॉजी आणि बॉटनी या विषयांचे प्रशिक्षण दिले जाते. जम्मू-काश्मीरमध्ये सैन्याच्या सुपर -३० कार्यक्रमाची सुरुवात १५ मार्च २०१८ पासून झाली. येथे एक बॅच एका वर्षात मेडिकल आणि इंजिनिअरिंग परीक्षेस क्रॅक करण्यासाठी तयार केली जाते. २०१८ मध्ये विविध संस्थांमध्ये १९ मुलांची निवड झाली. त्याच वेळी, २०१९-२० मध्ये, ३३ मुलांनी मेडिकल आणि इंजिनिअरिंग परीक्षा क्लीअर केल्या.
यामागे जम्मू काश्मीरमधील दुर्गम भागातील गरीब मुलांचे स्वप्न पूर्ण करण्याचे लष्कराचे ध्येय आहे. या मुलांना सुविधा आणि संसाधने नाहीत. सुपर ३० या मुलांची स्वप्ने बनवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
लष्कराच्या पुढाकाराने गरीब विद्यार्थ्यांना त्यांचे जीवन बदलण्याची संधी मिळत असल्याने तेही समाधानी आहेत.
पाहा व्हिडीओ: