मुक्तपीठ टीम
मुंबईकरांनो जरा सावधान, कारण मुंबईत गोवर रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. गोवंडी भागात गोवर साथीच्या आजाराचा उद्रेक झाला असून आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे आता मुंबई महापालिका देखील सतर्क झाली आहे. यामुळे गोवरची लक्षण काय आणि लहान मुलांना हा आजार होऊ नये यासाठी काळजी घ्यावी.
गोवर रोग काय आहे?
- गोवर हा वेगाने पसरणारा संसर्ग आहे.
- या आजारास इंग्लिश मध्ये मिजल्स किंवा रुबीयोला असे म्हटले जाते.
- गोवर हा पाच वर्षापेक्षा कमी वयाच्या लहान मुलांमध्ये होणारा मृत्यूचा एक प्रमुख कारण आहे.
- हा आजार हवेतून एका माणसापासून दुसरीकडे पसरू शकतो.
- हा विषाणू प्रथम श्वसनमार्गाला संक्रमित करतो आणि नंतर खोकला किंवा सर्दी किंवा थेट स्पर्शाने निरोगी लोकांना संक्रमित करतो.
- गोवरचा उद्रेक दर २ ते ३ वर्षांनी दिसून येतो आणि शेवटच्या उद्रेकात सुमारे १.४ लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला.
गोवरची लक्षणे-
- गोवर हा लहान मुलांसाठी अत्यंत धोकादायक संसर्ग असल्याचे सिद्ध होऊ शकते.
- यामध्ये १०४ अंशांपर्यंत उच्च ताप
- खोकला
- वाहती सर्दी
- लाल डोळे किंवा पाणीदार डोळे
- गोवरची सुरुवातीची लक्षणे दिसू लागल्यानंतर
- सीडीसी म्हणते की जेव्हा संक्रमित मुलामध्ये गोवरची सुरुवातीची लक्षणे दिसतात तेव्हा २ ते ३ दिवसांनंतर तोंडात लहान पांढरे डाग तयार होतात.
- त्याच वेळी, ३ ते ५ दिवसात शरीरावर लाल-चपटे पुरळ दिसू लागतात.
- गोवरची पुरळ मुलाच्या चेहऱ्यावर, मानांवर, खोडावर, हातांवर, पायांवर आणि तळव्यांना येऊ शकते.
- क्षणं सोबत रुग्णाला भूक न लागणे, थकवा जाणवणे, हात पाय दुखणे अशी लक्षणे दिसू शकतात.
गोवर झाल्यानंतर काय करावे?
- मुलांना गोवरपासून वाचवण्यासाठी त्यांना गोवर लसीचे २ डोस दिले जातात.
- पुरेसा आराम करावा.
- संक्रमितांपासून दूर रहावे.
- पाणी आणि ज्यूस प्यावे.
- मुलाचे शरीर ओल्या कापसाने स्वच्छ करावे.
- डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध द्यावे.
- बाळाला स्पर्श करण्यापूर्वी आणि नंतर हात चांगले धुवा.
मुंबईत गोवर कसा पसरला?
- मुंबईत गोवर रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे.
- कमी वेळेत २९ अधिकृत प्रकरणे समोर आली आहेत.
- यातील बऱ्याचशा मुलांना पुरळ, ताप आणि डोळ्यांतून पाणी वाहणे आदी लक्षणे दिसून आली.
- या २९ बाधित मुलांपैकी सुमारे ५० टक्के मुलांना गोवरची लस देण्यात आली आहे.
- त्यापैकी काही मुलांना ९ महिन्यांपेक्षा कमी वयात गोवरची पहिली लस देण्यात आली होती.
गोवरवर नियंत्रण ठेवण्यासाठी तज्ज्ञांच्या समितीची नेमणुक!!
- गोवरच्या या साथीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तज्ज्ञांच्या समितीची नेमणुक करण्यात आली आहे.
- सार्वजनिक आरोग्य चांगले राखण्यासाठी उपाययोजना तसेच मार्गदर्शक नियमावली तयार करण्यासाठी राज्य आरोग्य यंत्रणेला ही तज्ज्ञांची समिती मदत करणार आहेत.
- डॉ अनुभव श्रीवास्तव, उपसंचालक (IDSP)आणि NCDC चे उपसंचालक श्री अनुभव श्रीवास्तव या समितीचं नेतृत्तव करत आहेत.
- या समितीमध्ये नवी दिल्लीचे लेडी हार्डिंग्ज वैद्यकीय महाविद्यालय आणि आरोग्य आणि कुटुंबकल्याण विभागीय कार्यालय, पुणे येथील तज्ज्ञांचाही समावेश आहे.