अपेक्षा सकपाळ
आज शिवप्रताप दिन! आजचाच तो दिवस जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अत्याचारी अफझल खानाला धुळीस मिळवले. अत्याचारी खानाने महाराजांच्या पाठीत वार करत तसेच त्यांचा गळा दाबत विश्वासघात केला. पण अखंड अष्टावधानी असलेल्या महाराजांनी त्यांच्या विश्वासघाताला गनिमी काव्यानं उत्तर दिलं. त्याच्या पोटात वाघनखं घुसवून त्याचा कोथळाच काढला. चला तर जाणून घेऊया शिवप्रताप दिनाचा इतिहास….
अत्याचारी कपटी अफजल खान चालून आला स्वराज्यावर!
- सतराव्या शतकात महाराष्ट्र हा परक्यांच्या जोखडात होता.
- मराठा सरदार हे स्वत्व आणि सत्व विसरून परक्या शाह्यांसाठी पराक्रम खर्ची घालत होते.
- शहाजी राजे आणि जिजाऊ आईसाहेबांच्या प्रेरणेने शिवरायांनी स्वराज्याची स्थापन केली.
- छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरच्या आदिलशाहाच्या जोखडातूनही मराठी मुलूख स्वराज्यात आणला.
- त्यामुळे १६५९ मध्ये विजापूरचा राजा आदिलशाहसाठी छत्रपती शिवाजी महाराज जणू एक महासंकट वाटू लागले.
- त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना संपवण्यासाठी आदिलशाहीकडून प्रयत्न सुरु झाले.
- त्याने छत्रपती शिवाजी महाराजांना ठार मारण्याचा प्रयत्न बर्याच वेळा केला होता, परंतु त्याला यश मिळाले नाही.
- शेवटी अफजलखानाला पाठविण्यात आले.
- तो दिवस होता १० नोव्हेंबर १६५९चा.
- अफजल खान हा कपटी, घातपाती रणनीतीसाठी ओळखला जात असे.
- त्याने यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे यांची हत्या केली होती.
- वाटेत येणारी गावे आणि मंदिरे उद्ध्वस्त करीत तो साताऱ्यातील वाईपर्यंत पोहोचला आणि तिथे त्याने छत्रपती शिवाजी महाराजांना भेटावयास बोलाविले.
- मात्,र आम्ही आपल्याला घाबरलो आहोत, मी तिथे येत नाही, आपणच जावळी प्रांतात या, असा निरोप छत्रपती शिवाजी महाराजांनी धाडला.
- महाराजांनी कुशाग्र बुद्धीचा वापर करत खानाला घाबरले असल्याचे चित्र उभे केले.
शिवाजी महाराजांना माहित होता अफजलखानाचा कपटीपणा!
- अफजलखान साताऱ्यातील ढोरप्याच्या डोंगराच्या पायथ्याशी पोहोचला.
- तिथे छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझलखानाच्या भेटीची व्यवस्था केली गेली.
- भव्य शामियाना उभारला होता.
- प्रतापगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज होते.
- कोणत्याही सैन्याला तिथवर पोहोचणे अवघड होते.
- अफजल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांना भेटण्याचा निरोप पाठविला.
- छत्रपती शिवाजी महाराजांना त्याच्या घातपाती स्वभावाची जाणीव होती.
- भेटीसाठी कोणतेही हत्यार कोणाकडे नसतील आणि दोन्ही पक्षाचे १० अंगरक्षक असतील.
- त्यापैकी एक शामियान्याबाहेर थांबेल, अशी अट ठरली.
- भेटीच्या वेळी अफजलखान वेळेआधीच शामियान्यात पोहोचला.
- अफजल खान काही कटकारस्थान करून घातपात करेल याचा अंदाज छत्रपती शिवाजी महाराजांना आला होता.
- म्हणून त्यांनी आपल्या अंगरख्याखाली चिलखत घातले.
- जिरेटोपाखाली शिरस्त्राण घातले आणि मुठीत सहज न दिसणारी अशी वाघनखे लपविली होती.
- दोघांचे वकीलच बरोबर असतील असे ठरले.
महाराजांनी असा केला अफजल खानाचा वध!
- छत्रपती शिवाजीराजे न घाबरता शामियानात पोहोचले.
- त्यांना पाहून ‘या शिवा आमच्या मिठीत या’ असे म्हणत अफजल खानाने मिठी मारण्यासाठी हात पसरविले.
- छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला मिठी मारली.
- त्या वेळी अफजल खानाने लपविलेल्या कट्यारीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीत वार केला.
- तो वार महाराजांनी घातलेल्या चिलखतामुळे लागला नाही.
- कपटी खान तेवढ्यावरच थांबला नाही, त्याने महाराजांचा गळा आपल्या काखेत आवळण्याचा प्रयत्न केला.
- छत्रपती शिवाजी महाराज सावध होते.
- खानाच्या प्रहाराने सावध होत छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मुठीतील वाघनखे काढून त्याच्या पोटात घुसविली आणि त्याला ठार केले.
- याच वेळी खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी महाराजांच्या अंगावर चाल करून आला.
- महाराजांनी त्याला तलवारीच्या एकाच वारात यमसदनी धाडला.
- खानाने दगा दगा म्हणत आकांत केला.
- त्याचा आवाज ऐकून बाहेर उभा असलेला सय्यद आत आला.
- त्याने शिवाजी महाराजांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
- तोपर्यंत जिवा महालाने सय्यद बंडाला ठार मारून महाराजांच्या प्राणाचे रक्षण केले.
- झाडीत लपलेल्या सर्व मावळ्यांनी माकड हल्ल्याचे तंत्र वापरून खानाच्या सैन्याला पळवून लावले.
- यामुळे इतिहासात हे युद्ध प्रतापगड युद्ध म्हणून ओळखले जाते.
शिवप्रताप दिन का साजरा केला जातो?
- अफझलखान वधाच्या दिनानिमित्त प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा केला जातो.
- गडाच्या पायथ्याशी झालेल्या शिवप्रतापामुळे तरुणांना राष्ट्प्रेम आणि अन्याय, अत्याचाराविरोधात लढण्याची शिवप्रेरणा मिळते.
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे साक्षादार असलेल्या किल्ले प्रतापगड आणि परिसराला पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक गडकिल्ल्यांवर येतात.