मुक्तपीठ टीम
तिसर्या राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सवात देश-विदेशातील कलाकारांनी एकत्र येऊन हा महोत्सव जल्लोषात साजरा केला. तीन दिवस चाललेल्या या महोत्सवात मोठ्या संख्येने आदिवासी कलाकारांनी नृत्यातून आपली कला आणि संस्कृती सादर केली. राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सवाची ही तिसरी आवृत्ती रायपूर, छत्तीसगड येथे आयोजित केली गेली आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन गुरुवारी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या उपस्थितीत झाले. या कार्यक्रमाच्या आयोजनात देश-विदेशातील अनेक जमातींच्या लोकांनी आपली संस्कृती दाखवली. तसेच, रायपूर येथील राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सवात आफ्रिकन वंशाच्या सिद्दी जमातीने त्यांचे सांस्कृतिक नृत्य सादर केले.
आफ्रिकन वंशाच्या सिद्दी जमातीचा भारतातील इतिहास!
- छत्तीसगडच्या राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सवात, ८५० वर्षांपूर्वी भारतात आलेल्या आफ्रिकन वंशाच्या सिद्दी जमातीने त्यांचे सांस्कृतिक नृत्य सादर केले.
- सिद्दी जमात ही आफ्रिकेतील सर्वात जुन्या जमातींपैकी एक आहे.
- आफ्रो-भारतीय लोकांना सिद्दी म्हणतात.
- आफ्रिकन वंशाची सिद्दी जमात ८५० वर्षांपूर्वी भारतात आली होती. भारतात राहणाऱ्या आफ्रिकन लोकांबद्दल फारसे माहिती नाही. हे लोक अजूनही भारताच्या पश्चिम किनार्यावरील जांबूर गुजरातमधील एक गाव आहे या गावात राहत आहेत.
- त्यांचे पूर्वज आफ्रिकन होते जे येथे सैनिक, व्यापारी आणि खलाशी म्हणून आले होते.
- पूर्व आणि दक्षिण आफ्रिका आणि भारतातील गुजरातशी सागरी व्यापार दोन हजार वर्षांपूर्वी स्थापित झाला.
- काही इतिहासकारांचा असं माननं आहे की, लाखो आफ्रिकन लोक समुद्र पार करून येथे आले.
सिद्दी समाजातील लोककलाकार म्हणाले की, “आपली संस्कृती आफ्रिकन असली तरी आपले हृदय भारतीय आहे. ८५० वर्षांपूर्वी, आमचे पूर्वज आफ्रिकेतून आले आणि त्यांनी आफ्रिकन संस्कृती एकत्र आणली आणि येथे स्थायिक झाले. आमचा ग्रुप अजूनही संस्कृती जिवंत ठेवत आहे. आता आम्ही फक्त भारतीय आहोत. भारतासारखा देश नाही.” असे ते म्हणाले.
संस्कृती आफ्रिकेची असली तरी, आमचे हृदय भारतीय आहे!!
- गेल्या काही वर्षांपासून भारतात स्थायिक झालेल्या आफ्रिकन कलाकारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, ते गुजरातमधून आले आहेत.
- ८५० वर्षांपूर्वीची आफ्रिकेची संस्कृती त्यांच्या पूर्वजांनी भारतात आणली होती. त्यांनी आजही जिवंत ठेवली आहे.
- ते म्हणतात संस्कृती आफ्रिकन असली तरी हृदय भारतीय आहे.