मुक्तपीठ टीम
इन्फोसिस आणि विप्रोनंतर आता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस देखील मूनलाइटिंगच्या विरोधात उतरली आहे. आता TCSचीही यावर कडक भूमिका पाहायला मिळणार आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन गणपथी सुब्रमण्यम यांनी म्हटले आहे की, “कर्मचार्यांवर ‘मूनलाइटिंग’ कारवाई केल्यास दुसर्या संस्थेत नोकरी केल्याने त्या कर्मचाऱ्यांचे करिअर खराब होऊ शकते.” असे म्हणतात.
‘मूनलाइटिंग’ म्हणजे काय?
- जेव्हा एखादा कर्मचारी त्याच्या नियमित कामाव्यतिरिक्त कोणतेही काम स्वतंत्रपणे करतो तेव्हा त्याला तांत्रिकदृष्ट्या ‘मूनलाइटिंग’ असे म्हणतात.
- ‘मूनलाइटिंग’च्या चर्चेदरम्यान सुब्रमण्यम म्हणाले की, कंपनीला मूनलाइटिंगबाबत कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
- ते म्हणाले की, ही कारवाई सेवा कराराचा एक भाग आहे.
‘मूनलाइटिंग’ निर्णयावर टीसीएसच्या सीओओंचे वक्तव्य!
- टीसीएस सीओओ एन गणपथी सुब्रमण्यम म्हणतात की कारवाईचा परिणाम म्हणजे कर्मचार्यांचे भविष्य संपुष्टात येईल.
- अशा प्रकारे कर्मचाऱ्यांसाठी भविष्यात नोकरी मिळवणे कठीण होईल.
- त्यामुळे आपल्याला थोडी सहानुभूती दाखवावी लागेल.
- कंपनी कर्मचार्यांना कुटुंबाचा भाग मानते आणि कोणत्याही कृतीचे परिणाम लक्षात घेऊन कुटुंबातील सदस्याला भटकण्यापासून रोखण्यावर भर दिला जाईल, असेही ते म्हणाले.
- आयटी कंपन्या अशा मॉडेलवर काम करतात जिथे कर्मचाऱ्यांचे ‘फ्रीलान्सिंग’ चालते.
- परंतु टीसीएससारख्या कंपन्या फ्रीलान्सिंगसारख्या कार्याला परवानगी देऊ शकत नाहीत कारण, येथे ग्राहक डेटा संरक्षित करणे आवश्यक आहे.
टीसीएससारख्या अनेक कंपन्यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे तर विप्रोनेही ३०० कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. त्याचवेळी टेक महिंद्रासारख्या कंपन्यांनी ‘मूनलाइटिंग’बाबत मवाळ भूमिका दाखवली आहे.