मुक्तपीठ टीम
देशात आजपासून 5G नेटवर्क मिळणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते इंडिया मोबाईल काँग्रेस कार्यक्रमात 5G इंटरनेट सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे. सुरुवातील देशातील १३ शहरांमध्ये 5G सेवा सुरु करण्यात येणार आहे. देशात कुठेही 5G यशस्वीपणे वापरण्याची ही पहिलीच वेळ असेल. अशा परिस्थितीत 5G म्हणजे नेमकं काय? या स्पेक्ट्रम लिलावात कोणाला काय मिळाले? 5G मुळे काय फरक पडेल? डेटा प्लान महाग होतील का? ही सेवा कधी पासून सुरू होईल? 5G स्पीड व्यतिरिक्त इतर कोणत्या सुविधा उपलब्ध असतील? असे प्रश्न तुम्हाला पडलेच असतील. म्हणून आज आम्ही तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहोत.
5G तंत्रज्ञान म्हणजे काय?
- 5G हे सर्वात आधुनिक स्तराचे नेटवर्क आहे, ज्या अंतर्गत इंटरनेटचा वेग सर्वात वेगवान असेल.
- 5G ही मोबाइल नेटवर्कची पाचवी पिढी आहे.
- यात अधिक विश्वासार्हता असेल आणि पूर्वीपेक्षा जास्त नेटवर्क हाताळण्याची क्षमता असेल.
- यात अधिक नेट स्पीड, कमी लेटेंसी आणि अधिक फ्लेक्सिबिलिटी पहायला मिळेल.
कोणत्या कंपन्यांना कोणते स्पेक्ट्रम मिळाले?
- दूरसंचार विभागाने २० वर्षांसाठी एकूण ७२,०९७.८५ मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम लिलावात ठेवले.
- स्पेक्ट्रम लिलावात रिलायन्स जियो इन्फोकॉमने सर्वाधिक बोली जिंकली आहे.
- रिलायन्सने एकूण २४,७४० मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम खरेदी केले आहे.
- रिलायन्सने ७००मेगाहर्ट्झ, ८००मेगाहर्ट्झ, १८००मेगाहर्ट्झ, ३३००मेगाहर्ट्झ आणि २६ गीगाहर्ट्झ स्पेक्ट्रमसाठी बोली लावली.
- स्पेक्ट्रम खरेदीत भारती एअरटेल दुसऱ्या क्रमांकावर असून १९,८६७ मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम खरेदी केले आहे.
- त्याच वेळी, व्होडाफोन-आयडियाने ६२२८ मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम खरेदी केले आहे.
- अदानी समूहानं २६ गीगाहर्ट्झ बँडमधील ४०० मेगाहर्ट्झचं स्पेक्ट्रम घेतलंय
5G च्या आगमनाने काय फरक पडेल?
- हे तंत्रज्ञान 4G पेक्षा वेगळं आहे.
- 4G च्या तुलनेत 5G मध्ये अधिक तांत्रिक सुविधा मिळतील.
- 4G मध्ये इंटरनेट डाउनलोड स्पीड १५० मेगाबाइट्स प्रति सेकंद इतका मर्यादित आहे.
- 5G मध्ये ते प्रति सेकंद १० जीबीपर्यंत जाऊ शकते.
- जास्त एमबीच्या फाइल्सही काही सेकंदात डाउनलोड करू शकतील.
- 5G मध्ये अपलोड गती देखील १ बीजी प्रति सेकंद पर्यंत असेल, जी 4G नेटवर्कमध्ये फक्त ५० एमबीपीएम पर्यंत आहे.
डेटा प्लान महाग होणार का?
- यूजर्सचा सर्वात मोठा प्रश्न 5G इंटरनेटसाठी द्यावा लागणारा खर्च आहे.
- 4Gच्या तुलनेत 5G सेवेचे प्लान्स महाग असण्याची शक्यता आहे; मात्र त्याची किंमत खूप जास्त असणार नाही.
- टेलिकॉम कंपन्या ग्राहकांसाठी काय पद्धतीनं 5G सेवा देतील, याबाबत सध्या काही स्पष्टता नाही.
ही सेवा कधी पासून सुरू होईल?
- 5G इंटरनेट रोल-आउटच्या पहिल्या टप्प्यात १३ शहरांना नवीन सेवा मिळणार आहे.
- अहमदाबाद, बेंगळुरू, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनौ, मुंबई आणि पुणे या शहरांचा समावेश आहे.
- तर संपूर्ण भारतात 5G सेवा २०२३ च्या पहिल्या तिमाहीपर्यंत लागू शकेल.
- रिलायन्सने या दिवाळीपर्यंत दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या महानगरांमध्ये 5G सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.
- कंपनीने डिसेंबर २०२३ पर्यंत देशातील प्रत्येक शहर, प्रत्येक तालुक्याला 5G सेवा पुरवण्याचे सांगितले आहे.
5G स्पीड व्यतिरिक्त इतर कोणत्या सुविधा उपलब्ध असतील?
- 5G लाँच केल्यामुळे, सर्वसामान्य ग्राहकांपासून ते बड्या व्यावसायिकांचे जीवन, व्यवसाय आणि कार्यपद्धती बदलेल.
- 5G ची प्रगत तंत्रज्ञान आणि उच्च क्षमता घर, ड्रायव्हरलेस कार, स्मार्ट ऑफिस, स्मार्ट सिटी सर्व काही जोडेल.
- विशेषतः रुग्णालये, विमानतळ आणि डेटा संकलनात मोठी भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे.
- वायरलेस तंत्रज्ञानाची पुढील पिढी केवळ फोनपुरती मर्यादित राहणार नाही.