मुक्तपीठ टीम
विमानानं प्रवास करणं जेवढं वेगानं, तेवढंच प्रवासानंतर विमानातून उतरणं मंद गतीनं असतं. वेळ जातो. कंटाळाच येतो. आता मात्र, इंडिगो एअरलाईन्सनं शोधलेला तिसऱ्या रॅम्प म्हणजे शिडीचा उपाय ही समस्या सोडवेल.
विमानातून उतरण्यासाठी प्रवाशांना आता जास्त वेळ थांबावे लागणार नाही. इंडिगो देशातील सर्वात मोठी एअरलाईन इंडिगोने डिबोर्डिंग प्रवाशांसाठी तीन-दरवाजे असलेल्या एक्झिट गेट्स सुविधा सुरू करण्याची घोषणा केली आहे. अशी व्यवस्था सुरू करणारी इंडिगो ही जगातील पहिली विमान कंपनी असेल. सध्या प्रवाशांना विमानातून उतरण्यासाठी किमान १३ मिनिटे लागतात. मात्र तीन दरवाजा असलेल्या सुविधेमुळे ते ७ मिनिटावर येईल. सर्वात आधी दिल्ली, मुंबई आणि बंगळुरूमध्ये ही सेवा सुरू केली जाईल आणि त्यानंतर ती देशभरात लागू होईल.
विमानाला तीन शिड्या…इंडिगो जगातील पहिली विमान कंपनी!
- एअरलाइन इंडिगोने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, नवीन प्रक्रियेअंतर्गत प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी दोन पुढचे दरवाजे आणि एक मागचा दरवाजा असेल.
- यामुळे ही प्रक्रिया वापरणारी इंडिगो ही जगातील पहिली एअरलाइन बनणार आहे.
- इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोनोजॉय दत्ता यांनी दिल्ली विमानतळावर पत्रकारांना सांगितले की, तीन एक्झिट गेटच्या व्यवस्थेमुळे, विमान कंपनी प्रवाशांना डी-बोर्डिंगमध्ये ५ ते ६ मिनिटं वाचतील.
इंडिगो एअरलाइन्सने आपल्या उड्डाणाला १६ वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी, देशांतर्गत मार्गावर १६व्या वर्धापन दिनानिमित्त स्वीट १६ विक्रीची घोषणा केली. त्यात प्रवाशांना १ हजार ६१६ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत पुढील तीन दिवसांसाठी फ्लाइट बुक करता आल्या.
इंडिगोची ३ दरवाजे असलेली व्यवस्था सध्या मुंबई आणि दिल्लीत राबवली जाणार
- एक्झिट गेटच्या व्यवस्थेनुसार, प्रवाशांना विमानातून उतरण्यासाठी फक्त ७ ते ८ मिनिटे लागतील.
- सुरुवातीला इंडिगो ही व्यवस्था बंगळुरू, मुंबई आणि दिल्लीमध्ये लागू करेल.
- हळूहळू सर्व विमानतळांवर त्याची अंमलबजावणी केली जाईल.