मुक्तपीठ टीम
काँग्रेसचे नेते खासदार अधीर रंजन चौधरी यांनी ‘राष्ट्रपत्नी’ संबोधल्याचा वाद खूप रंगला. संसद सभागृहांबाहेरही एक वाद रंगला. तो होता काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि भाजपा नेत्या, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यातील. त्यांच्यात जोरदार वादावादी झाली. सोनिया गांधी एका भाजपा खासदाराशी बोलत असताना स्मृति इराणी यांनी मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेला वाद चर्चेचा विषय ठरला.
सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्यावर सोनिया गांधी बाहेर येत असताना त्यांना पाहून भाजप खासदारांनी घोषणाबाजी सुरू केली. सोनिया गांधी भाजपा खासदार रमा देवी यांच्याकडे गेल्या आणि त्यांनी सांगितले की, अधीर रंजन चौधरी यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. त्यावेळी तिथं स्मृति इराणी आल्या. त्यांनी काही बोलण्याचा प्रयत्न करताच सोनिया आणि त्यांच्यात वाद झाला.
सोनिया गांधी भडकल्या. त्या म्हणाला मला तुमच्याशी बोलायचे नाही. त्यावर प्रत्युत्तरात स्मृती इराणीही काही बोलल्या आणि सुमारे दोन मिनिटे दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. संसदेत विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात कटुता वाढली असून नेत्यांमधील संबंधही दुरावा निर्माण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
स्मृती इराणी संसदेतही या मुद्द्यावरून आक्रमक झाल्या होत्या. अधीर रंजन चौधरी यांनी सोनिया गांधींच्या परवानगीनेच असे वक्तव्य केले आहे, त्यामुळे सोनिया गांधींनी स्वतः संपूर्ण देशाची माफी मागावी, अशी त्यांनी मागणी केली. त्यासाठी त्या आक्रमक झाल्या.
गोंधळ का झाला?
- महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ‘राष्ट्रपत्नी’ म्हटल्याने संसदेत मोठा गदारोळ झाला.
- काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी बुधवारी दिल्लीत पक्षाच्या निदर्शनादरम्यान राष्ट्रपतींसाठी हा शब्द वापरला होता.
- भाजपाने आता हा मुद्दा बनवला आहे.
- संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.
- काँग्रेसने यासाठी संपूर्ण देशाची माफी मागावी, असे स्मृती इराणी म्हणाल्या.
काँग्रेसचा भाजपवर पलटवार
त्याचवेळी काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पलटवार केला आहे. ते म्हणाले, “”आज लोकसभेत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी असभ्य आणि अपमानास्पद वर्तन केले. पण वक्ता त्याचा निषेध करणार का? नियम फक्त विरोधकांसाठी आहेत का?