मुक्तपीठ टीम
जुगाड…एक असा शब्द जो भारतासाठी अतुलनीयच आहे. अनेकांना आवडत नाही. दर्जाशी तडजोड वाटते. पण प्रत्यक्षात आहे त्या साधनांमध्ये, परिस्थितीनुसार समस्या सोडवतो तो जुगाडचा शोधच! त्यामुळेच उद्योगपती आनंद महिंद्रांपासून अनेक मान्यवरही जुगाडचे कौतुकच करतात.
पूर्वी जुगाड म्हटलं की अनेकजण हेटाळणी करायचे. आता मात्र उद्योगपती आनंद महिंद्रा अशा अनेक उपयोगी जुगाडचं कौतुक करतात. तेही ट्विटरवर जाहीर असं. नुकताच त्यांनी एक व्यक्तीचा व्हिडीओ ट्विट करत लिहिलं, गुडघ्यापर्यंत साचलेल्या पाण्यात चालण्यासाठी एक आश्चर्यकारक शोध!
भारतातीय उद्योजकांमध्ये नामवंत असलेले आनंद महिंद्रा नेहमीच चर्चेत असतात. कधी ते त्यांच्या गाड्यांमुळे तर कधी भावूक स्वभावामुळे ते चर्चेचा विषय ठरतात. आनंद महिंद्राची उदारता ही त्यांच्या पोस्टवरूनच समजते. ते नेहमीच नवनवीन व्हिडीओ शेअर करून व्हायरल करत असतात. असाच एक व्हिडीओ त्यांनी आजही शेअर केला आहे. आता सर्वचजण काही सोपं करण्यासाठी ‘जुगाड’ वापरण्यात पटाईत झाले आहेत. काही लोक त्यांच्या जुगाडाने प्रत्येक समस्येवर उपाय शोधतात. असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विट केला आहे.
👍🏽 As the saying goes: Necessity is the mother of invention… pic.twitter.com/VjyD2LzgAR
— anand mahindra (@anandmahindra) July 8, 2022
गरज ही शोधाची जननी आहे
आनंद महिंद्रा यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओसोबत एक सुंदर संदेशही लिहिला आहे. ते म्हणतात की एक जुनी म्हण आहे, ‘गरज ही शोधाची जननी असते’.
व्हायरल झालेल्या व्हिडीओ पोस्टमध्ये काय आहे?
- आनंद महिंद्रांनी पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये, एक तरुण गुडघाभर पाणी साचलेला भाग पार करण्यासाठी दोन प्लास्टिकच्या स्टूलसह एक अनोखा जुगाड करतो.
- त्याला पाण्यात उतरावे लागू नये म्हणून या तरुणाने स्टूलला दोरी बांधली आहे, ज्याच्या मदतीने तो एक स्टूल उचलतो आणि पुढे करतो, नंतर दुसरा स्टूल करतो आणि अशा प्रकारे तो स्टूलच्या सहाय्याने चालतो. स्टूल आणि पाण्याने भरलेला रस्ता ओलांडतो.
- हा व्हिडीओ पाहून तो पूर्व भारतातील कुठल्यातरी भागातील असल्याचे दिसते. सध्या आसाम आणि ईशान्येतील इतर राज्यांमध्ये भीषण पूरस्थिती आहे. अशा परिस्थितीत हा व्हिडिओ त्या भागातील असल्याची शक्यता आहे.
आनंद महिंद्रा यांचा हा व्हिडिओ रिट्विट करून अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
- राज कुमार नावाचा यूजर म्हणाला, भारत असाच एक अतरंगी देश आहे, सर, जग त्यांच्या जुगाडासमोर नतमस्तक होते.
- सुशांत संत्रा नावाच्या यूजरने सांगितले, सोपे आणि प्रभावी उपाय. ‘जुगाडू’ विचार करणारे भारतीय खूप चांगले आहेत.
- एक यूजर म्हणाला, “उत्तम कल्पना” पण मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये हे दोन स्टूल वाहून नेणे अशक्य आहे, त्यासाठी काहीतरी नवीन विचार करण्याची गरज आहे.
- हा एकमेव व्हायरल झालेला जुगाड नाही. याआधीही काही जुगाड नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत. त्यातील एक भन्नाटच.
चौथ्या मजल्यावरून थेट जमिनीवर!
एक भन्नाट जुगाड एका व्हायरल क्लिपमध्ये आपण पाहू शकतो. इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून एक मोठा मजबूत कापड जमिनीवर ‘सरकत्या’ झुल्याप्रमाणे पसरलेलं आहे. तेथे टेम्पो उभा आहे आणि काही लोकही आहेत. फ्लॅटमधील एक व्यक्ती काही सामान त्या कापडी स्लाइडवरून खाली पाठवते. ते सामान काही क्षणात टेम्पोपर्यंत पोहोचते आणि ती व्यक्ती थोड्याच वेळात टेम्पोवर माल चढवते. खरच, जास्त मेहनत न करता इमारतीतील सामान उतरवून ते टेम्पोमध्ये चढवण्याचा हा अप्रतिम जुगाड वाखाणण्याजोगा आहे. अर्थात तसं करणं कितपत सुरक्षित, याबद्दल शंका आहे. या मजेशीर जुगाडचा व्हिडिओ satisfyingnaturehub या इंस्टाग्राम हँडलवरून शेअर करण्यात आला आहे.