मुक्तपीठ टीम
पेट्रोल इंधन दरवाढीने लोक त्रस्त आहेत त्यात आणखी महागाई वाढत आहे. आता पुढील महिन्यापासून वाहन विमाही महाग होणार आहे. सरकार १ जून २०२२ पासून वाहनांच्या थर्ड पार्टी इन्शुरन्सच्या प्रीमियममध्ये वाढ करणार आहे. अशा परिस्थितीत, जर वाहन विमा संपणार असेल, तर तात्काळ भरा. कारण एक जूनपासून थर्ड पार्टी विमा न भरलेल्यांसाठी असलेल्या दंडात मोठी वाढ होणार आहे. तसेच काही प्रकरणात कारावासाचही शिक्षा होऊ शकते. यामुळे अपघातात वाहनाचे झालेले नुकसान तर भरून निघेल त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा दंड भरावा लागणार नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, विमा नसताना किंवा मुदत संपल्यावर अपघात झाल्यास किंवा तुमच्या वाहनाचे इतर कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले तर तुम्हाला त्याची आर्थिक भरपाई करावी लागेल. विमा रिन्यू न केल्यास, विमा कंपनी कोणत्याही नुकसानाचं क्लेम करणार नाही. तसेच, मोटार वाहन कायद्याच्या कलम-१४६ अन्वये, जर तुम्ही विमा नसलेले वाहन चालवत असल्याचे आढळून आले, तर २००० रुपये दंड किंवा तीन महिन्यांपर्यंत कारावास या दोन्ही शिक्षा होऊ शकतात. असा गुन्हा केल्यास ४ हजार रुपये दंड आणि तीन महिने कारावास या शिक्षा होऊ शकतात.
थर्ड पार्टी विमा समाविष्ट करणे आवश्यक
- वाहन विमा रिन्यू करताना, त्यात थर्ड पार्टी विमा समाविष्ट करणे आवश्यक आहे.
- मोटार वाहन कायदा, १९९८ च्या कलम १४६ अंतर्गत हे आवश्यक आहे.
- या अंतर्गत, अपघात झाला तर क्लेम मिळत नाही, पण ज्याच्या वाहनाचे आपल्या गाडीमुळे नुकसान झाले आहे त्याला भरपाई मात्र मिळते. यामध्ये विरुद्ध पक्षालाच फायदा होतो.
नो क्लेम बोनस केव्हा मिळतो?
- जर वाहन विम्याची मुदत संपल्यानंतर ९० दिवसांच्या आत रिन्यू केले नाही, तर विमा कंपनीकडून नो क्लेम बोनस मिळणार नाही.
- नो क्लेम बोनस तुमचा विमा प्रीमियम ५०% पर्यंत कमी करण्यात मदत करते.
- नो क्लेम बोनस अंतर्गत, पहिल्या वर्षासाठी २०% सूट उपलब्ध आहे.
- ते वर्षानुवर्षे वाढत जाते आणि विमा रिन्यू करताना, प्रीमियमवर कमाल ५०% सवलत असते.
जर विमा एजंटकडून पॉलिसी घेतली असेल, तर रिन्यूच्या वेळी त्यांच्याशी संपर्क साधा.
जर पॉलिसी ऑनलाइन खरेदी केली असेल, तर विमा कंपनीच्या वेबसाइटला भेट देऊन योजना निवडा.
वेगवेगळ्या विमा कंपन्यांच्या योजनांची तुलना करा आणि प्रीमियम मिळवा. विमा कंपनीबद्दल समाधानी नसल्यास, तुम्ही ती बदलू शकता.
रिन्यूसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- एक्सपायर झालेल्या वाहन विम्याची प्रत
- नोंदणी प्रमाणपत्र
- चालक परवाना
- वाहनाची माहिती
- आरटीओचा पत्ता, जिथे कार नोंदणीकृत आहे