मुक्तपीठ टीम
सूर्यदत्त नॅशनल स्कूलचा अष्टपैलू विद्यार्थी अर्चित पळशीकर याने नुकत्याच झालेल्या सोलारिस स्क्वॅश पुणे ओपन स्पर्धेत सिनिअर गटात प्रथम क्रमांक मिळवला. इयत्ता बारावीत शिकणारा अर्चित अतिशय लहान वयात अनेक उपक्रमात यश मिळवणारा विद्यार्थी ठरला आहे. त्याच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले.
अर्चितला भारतीय आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिम्पियाड, संगणक विज्ञान आणि वित्त क्षेत्रात रुची आहे. तसेच तो सामाजिक कार्यात स्वयंसेवक, इंटरनॅशनल मॉडेल युनायटेड नेशन्स (आयएमयुएन) कॅम्पस अम्बेसेडर, कोडर, वेबसाइट आणि ऍप विकसक, बाल हक्क कार्यकर्ता म्हणून काम करतो. त्याने विविध संस्थांमध्ये इंटर्न, सॉफ्टवेअर अभियंता, कॅम्पस अँबेसेडर म्हणून काम केले आहे. लंडन येथील यंग सायंटिस्ट जर्नलचा संपादक आणि राजदूत म्हणून करण्याची संधी त्याला मिळाली आहे. याशिवाय दिल्ली येथील चाइल्ड राइट्स अँड यू संस्थेचा स्वयंसेवक आणि इंटर्न आहे.
अर्चित सूर्यदत्त नॅशनल स्कूलमध्ये तंत्रज्ञान, विपणन आणि रणनीती या विषयात ज्युनियर एमबीए आहे, पीअर ट्युटरिंगनंतर अर्चितने विविध वर्गांना शिकवले आणि विद्यार्थ्यांना निसर्गातील गणिताबद्दल शिकवले. या विषयावर विविध प्रकल्प आयोजित केले. प्राचार्य शैला ओक आणि शिक्षकांबद्दल अर्चितने कृतज्ञता व्यक्त केली.
सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशन च्या डी. व्ही. पी. स्नेहल नवलखा म्हणाल्या, “सूर्यदत्त गुणवत्ता आणि समग्र शिक्षणावर विश्वास ठेवते. सूर्यदत्त संस्थेला अर्चितच्या कामगिरीचा अभिमान आहे.”