मुक्तपीठ टीम
मंगळवारी तारकर्लीच्या समुद्रकिनाऱ्यावरून पर्यटकांना घेऊन जाणारी जय गजानन ही बोट अचानक उलटली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेवरून भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी संताप व्यक्त केला. निलेश राणे यांनी अप्रत्यक्षपणे राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंवर निशाणा साधत, या दोन पर्यटकांचा जीव वाचू शकला असता असं ट्वीट केलं. मात्र त्यांच्या या ट्वीटनंतर लोकांनी निलेश राणेंनाच ट्रोल केलं.
…तरी दोघांचे प्राण वाचले असते!!
मालवण, तारकर्ली, देवबाग ही नावं आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर असताना मालवण ग्रामीण रुग्णालयात एक व्हेंटिलेटर नाही. आज दोन पर्यटक तारकर्ली समुद्रात बुडाले. ग्रामीण रुग्णालयात व्हेंटिलेटर असते तरी दोघांचे प्राण वाचले असते. त्यापैकी एकाला खासगी रुग्णालयात हलवल्याने एकाचा जीव वाचला.
निलेश राणेचं झाले ट्रोल-
मालवण, तारकर्ली, देवबाग ही नावं आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर असताना मालवण ग्रामीण रुग्णालयात १ व्हेंटिलेटर नाही. आज २ पर्यटक तारकर्ली समुद्रात बुडाले. ग्रामीण रुग्णालयात व्हेंटिलेटर असते तरी दोघांचे प्राण वाचले असते. त्यापैकी एकाला खासगी रुग्णालयात हलवल्याने एकाचा जीव वाचला.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 24, 2022
निलेश राणेंच्या ट्विटवर अनेकांनी वेगवेगळे रिप्लाय दिले असून काहींनी तुम्हीच या भागातून खासदार होता अशी आठवण करुन दिलीय.
किरण रवींद्र आकेरकर-
महाशय तेथील स्थानिक खासदार होते ना..?
शिवाय आपले पिताश्री 20 वर्षे मालवण चे स्थानिक आमदार, मुख्यमंत्री, मंत्री होते, सध्या केंद्रीय मंत्री आहेत.त्यावेळी स्वतःच्या खासगी रुग्णालयाच्या प्रोजेक्ट पुढे जिल्ह्यातील शासकीय आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष द्यायला त्यांना वेळच मिळाला नाही राव..— Kiran Ravindra Akerkar (@AkerkarKiran) May 24, 2022
- महाशय तेथील स्थानिक खासदार होते ना..?
- शिवाय आपले पिताश्री 20 वर्षे मालवण चे स्थानिक आमदार, मुख्यमंत्री, मंत्री होते, सध्या केंद्रीय मंत्री आहेत.त्यावेळी स्वतःच्या खासगी रुग्णालयाच्या प्रोजेक्ट पुढे जिल्ह्यातील शासकीय आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष द्यायला त्यांना वेळच मिळाला नाही राव..
विजय सागर
अहो तुमचे पिताश्री आमदार, मुख्यमंत्री होते आणि तुम्ही खासदार सध्या घरी आमदार आहेत तरी मदत करू शकत नाही का?उगीच नाटकं करत जाऊ नका. आणि जनतेला वेडे बनवू नका.मुख्यमंत्री आणि टोपे साहेब निश्चित मददत करतील पाठपुरावा करा.
— Vijay Sagar (@VijaySagar24686) May 25, 2022
अमर घाडी
मग आपण खासदार असताना हा विषय आपल्या डोक्यात आला नाही का ?
तेव्हा व्हेंटिलेटर चा शोध लागला न्हवता का ?
— श्री. अमर घाडी (@Ghadi_amar) May 24, 2022
मग आपण खासदार असताना हा विषय आपल्या डोक्यात आला नाही का ? तेव्हा व्हेंटिलेटर चा शोध लागला न्हवता का ?
मनोहर साळुंके
कुणी काय केलं ते सोडा तुम्ही बाप बेटे काय करताय, फक्त फुशारक्या आणि पत्रकार परिषद.
— Manohar Salunke (@ManoharSalunk16) May 25, 2022
कुणी काय केलं ते सोडा तुम्ही बाप बेटे काय करताय, फक्त फुशारक्या आणि पत्रकार परिषद.
बाबासाहेब खोत
एक काळ असा होता की कोंकण म्हटलं की राणे आणि राणे म्हंटले
— Babasaheb Khot (@bakhot2009) May 24, 2022
एक काळ असा होता की कोंकण म्हटलं की राणे आणि राणे म्हटले.
अनिकेत खानविलकर
Tumhi kay kela etke varsh???
— Aniket Khanvilkar (@Aniket65753662) May 24, 2022
तुम्ही काय केलं इतके वर्ष? निलेश राणे.
नेमकं घडलं काय?
- मालवणमधील सकाळी तारकर्लीच्या समुद्रकिनाऱ्यावरून जय गजानन ही बोट २० जणांना घेऊन स्कुबा डायव्हिंगसाठी गेली होती.
- तेथून परत येताना ही बोट समुद्रकिनाऱ्यापासून काही अंतरावर असतानाच अचानक उलटली.
- बोट किनाऱ्याजवळ येत असताना लाटांच्या तडाख्यामुळे हा अपघात झाला.
- या दुर्घटनेत दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
- आकाश देशमुख (रा. अकोला) स्वप्नील पिसे (रा.पुणे) अशी मृत व्यक्तींची नावं आहेत.