मयूर जोशी
हे पुस्तक वाचले तर पुढे काही दिवस झोप येणार नाही किंवा प्रचंड अस्वस्थ असाल. खऱ्या घटनेवर आधारित पुस्तक माझ्या हातात तीन वर्षांपूर्वी पडले. जगामधील सगळ्यात मोठी म्हणजे अठरा वर्ष किडन्याप केल्या गेलेल्या मुलीने लिहिलेले पुस्तक आहे हे.
Jaycee dugard नावाची एक सुंदर छोटी अकरा वर्षाची मुलगी शाळेमध्ये जात असताना तिला एका व्यक्तीने किडनॅप केलेले. त्यानंतर ते १८ वर्ष त्या माणसाच्या ताब्यात होती. तिचा अकरा वर्षाचा असतानाचा फोटो या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरती आहे. वय वर्ष २९ झाल्यावर तिची सुटका झाली आणि ती देखील अत्यंत आश्चर्यकारक आणि आपल्याला विचार करायला लावणाऱ्या पद्धतीमुळे.
तो माणूस आणि त्याची बायको या दोनच व्यक्ती जेसी क्या आयुष्यात होत्या त्या १८ वर्षात. तो माणूस प्रचंड विचित्र होता. त्याने तिला कधी मारहाण केली नाही परंतु इतक्या लहान वयात जे करायचे नाही ते सर्वकाही करत राहिला. तिला वयाच्या चौदाव्या वर्षी पहिली मुलगी झाली. सोळाव्या का सतराव्या वर्षी दुसरी मुलगी झाली. एकदाही तिला कोणत्याही दवाखान्यात केव्हा डॉक्टरांकडे दाखवायला हे गेले नाहीत. किती प्रचंड अवघड परिस्थिती असेल त्या मुलीसाठी याचा विचार करवत नाही. हल्ली आजूबाजूला बघितले तर डॉक्टरकडे गेल्याशिवाय कोणाचेही पान हलत नाही परंतु ती मुलगी १८ वर्ष कोणते आहे डॉक्टर शिवाय आपली दुखणी व बाळंतपणे काढत होती.
तो माणूस तिच्याशी चांगला देखील वागे. तिला चांगले खायला-प्यायला आणून देत असे. परंतु त्या घराबाहेर ती मुलगी जवळपास १६ वर्ष बाहेर पडली नव्हती. फक्त एकच घर व ही दोन माणसे आणि त्यानंतर झालेल्या दोन मुली. त्या दोन मुलींना ही फक्त घरातच ठेवले गेले. पहिल्या दिवसापासून वेगळे नाव त्या माणसाने ठेवले होते. व स्वतःचे नाव कुठेही लिहायचे नाही. स्वतःचे नाव बोलायचं नाही अशी सक्त ताकीद तिला दिलेली होती. याचा परिणाम काय झाला माहिती आहे का? १८ वर्षानंतर तिला स्वतःचे नाव जेसी आहे यावर विश्वास नव्हता. स्वतःचे खरे नाव लिहायला पोलीस स्टेशनमध्ये ती तयार नव्हती. ब्रेन वॉश करून काय होऊ शकते त्याचे मूर्तिमंत उदाहरण.
जेव्हा ते पूर्ण एकटी असायची पूर्ण दिवस पूर्ण रात्र… हा माणूस किंवा त्याची बायको नेहमीच असेल असे नाही. त्यामुळे एकूण मिळवून तिने कैक दिवस असे एकटीने काढलेले आहे. परंतु त्या वयात देखील ते स्वतःला फक्त एकच समजवायची की नेहमी चांगले वागावे. हे आता लिहिताना देखील माझ्या अंगावर शहारा येत आहे. की कासेंकाय इतकी छोटी मुलगी स्वतःला समजावत असेल? आपण नेहमी चांगले वागावे या गोष्टीवर त्या अठरा वर्षात देखील ते ठाम होते त्याचे कौतुक करावे का तिच्यासाठी वेदना फील करावी समजत नाही. तिचा वेळ जावा म्हणून त्याने तिला काही वेळेला मांजरी गिफ्ट केल्या होत्या. परंतु काही महिने झाले आणि तिला त्या मांजरींचा इतका लळा लागला की मग मात्र तो ती मांजर घेऊन जात असे.
त्या वेळेला प्रचंड दुःख तिला होत असेल व तिथे कुठेतरी लिहून काढत असे. त्याकाळात ते पेन्सिलने कागदावर बरेच काही लिहित असायची. मला दिलेला हा बोका इतका छान आहे आणि तो आता मोठा होत आहे. किंवा माझी मांजर आता हळूहळू माझी मैत्रीण व्हायला लागली आहे. आणि त्या मांजरी बद्दल जो काही दिवस जातो तेथे त्या काळात बऱ्याच वेळा लिहून ठेवायची.
सर्व काही सांगत बसत नाही परंतु प्रत्येकाने आवर्जून हे पुस्तक वाचावे. आपल्या आयुष्यामध्ये आपली बायको सोडून गेली किंवा नवरा सोडून गेला किंवा जॉब गेला किंवा पैसा मिळत नाही या कारणांवरून आपण उध्वस्त झाल्या सारखे वागतो. छोट्या कारणांवरून लोक आत्महत्या करतात. इथे सलग अठरा वर्ष या मुलीबरोबर काय होते हे प्रत्यक्ष तिच्या हातांनी लिहिलेले आहे ते वाचा. स्टॉकहोम सिंड्रोम म्हणजे काय ते या पुस्तकांमध्ये वाचायला मिळते. काही काळ अपहरण केलेल्या माणसाबरोबर राहिल्यावर त्या माणसावरच अपहरण केल्या गेलेल्या माणसाचे प्रेम बसते. कारण तोच माणूस खायला आणून देत असतो किंवा बोलत असतो किंवा थोडी फार काळजी घेत असतो. त्यामुळे त्याने केलेल्या रेप किंवा बाकीच्या गोष्टी सहज बाजूला टाकल्या जातात आणि त्या माणसांमधील फक्त चांगुलपणा दिसायला लागतो. कारण मेंदू आणि मन हे नेहमी सर्वाइवल स्टेट मध्ये असते. आपण येथून सुटणार नाही याची खात्री झाल्यानंतर जो समोरचा माणूस आहे त्याने वाईट कृत्य केले तरीदेखील ते जास्त मनावर घ्यायचे नाही असे मेंदू मनाला समजावतो. त्याने केलेले प्रत्येक छोटी गोष्ट किती जास्त चांगली आहे अशा पद्धतीने घ्यायला लागतो. आणि आपल्या अपहरण केलेल्या माणसावरच आपले प्रेम बसते.
ते इतके जास्त की अठरा वर्षांनंतर जेसी जेव्हा सुटली त्यावेळेला पोलिसांना ती हे सांगत होती की तिचा अपहरण केलेला माणूस अत्यंत चांगला माणूस आहे आणि त्याचे तिच्यावर प्रेम आहे. किती भयानक आहे हे.पोलिसांना देखील हे समजेना की खरे काय? कारण ही मुलगी इतर कोणतीही कंप्लेंट करायला तयार नव्हती.
तिला आहे समजण्याकरता मानसोपचाराची गरज लागली की तो माणूस तुझ्यावर अन्याय करणारा होता तुझे सर्व बालपण हिरावून घेणारा होता. त्या माणसाचे तुझ्यावर प्रेम नव्हते तर तो माणूस अक्षरशहा सैतान होता. आणि त्याने काय काय केले ते लिहून काढ हा मानसोपचार यांचा सल्ला होता, त्यावर एक उपाय म्हणून. आणि तिने जे काही लिहिले आहे तेच हे पुस्तक.
हे पुस्तक वाचताना तो अपहरण करता आणि त्याची बायको यांच्यावर राग , अस्वस्थता, हेल्पलेसनेस, जेसी बद्दल प्रचंड ममता व करुणा या जाणिवा अक्षरशहा मेंदू आणि मन फोडून बाहेर येतील असे वाटायला लागते. फारसा भावनिक न होणारा मी हे पुस्तक वाचताना मात्र रडलो रागाने त्याचप्रमाणे या मुलीची पॉझिटिव्हिटी आणि चांगुलपणा बघून.
परंतु तरीदेखील हे पुस्तक का वाचावे?
ते यासाठी की आपले आयुष्य किती चांगले आहे तरीदेखील आपण प्रत्यक्ष ने बेचेन असतो अस्वस्थ असतो आणि चिडचिड करत असतो. घरापासून लांब ब् १८ वर्ष कोंडून ठेवल्यानंतर देखील जी मुलगी मनाने अत्यंत चांगली आहे म्हणजे विचार करावा की खरोखर किती जास्त पॉझिटिव्हिटी भरलेली असेल तीच्या अंगात. हे पुस्तक वाचताना तिच्याकडून ही पॉझिटिव्हिटी घेतली पाहिजे. मन कसे हे चांगले ठेवले पाहिजे हे शिकले पाहिजे.
युट्युब वर देखील त्याचे नाव टाकले तर तिचे अनेक इंटरव्यू तुम्हाला दिसून. वरती मी त्या अपहरण केलेल्या माणसाचे नाव टाईप केले नाही कारण माझी इच्छाचा नव्हती त्याचे नाव लिहायचे.
फेसबुक वर देखील मी तिला फॉलो करतो. आता ती खूप सावरली आहे. तिने तिचा वेश व केस वगैरे बदललेले आहे थोडा फार कारण कोणीही तिला ओळखू नये व तिच्या मुलीही आता छान मोठ्या झाल्या आहेत. एक आई म्हणून ती खूपच प्रगल्भ असणार यात वाद नाही. आणि एक माणूस म्हणून खूप मोठा आदर्श.
सलाम त्या जेसी ला…. तिच्या संयमाला आणि positivity la…
#mayurthelonewolf
(लेखक मयूर जोशी आयटी क्षेत्रातील आहेत. त्यांची सृजनशीलता छायाचित्रण आणि लेखनाच्या माध्यमातून अभिव्यक्त होत असते. ट्विटरवरील त्यांच्या एका वाक्यातील लघूभयकथाही लक्षवेधी असतात.)
ट्विटरवर फॉलो करा – @mayurjoshi999