मुक्तपीठ टीम
आजपासून सर्व चारचाकी वाहनांना टोल भरण्यासाठी फास्टॅग असणे आवश्यक आहे. देशातील कोणत्याही राष्ट्रीय महामार्गाचा टोल नाका ओलांडताना याची आवश्यकता असेल. वारंवार मुदत वाढवल्यानंतर अखेर आजपासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. फास्टॅग म्हणजे काय, ते कसे कार्य करेल, आपण तो कसा, कुठे, कधी मिळवू शकतो हे जाणून घ्या…
फास्टॅग आहे तरी काय?
- फास्टॅग ही इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणाली आहे.
- जे स्टिकरच्या स्वरूपात आहे.
- प्रत्येकाला ते कार किंवा कारच्या विंडशील्डवर लावावे लागेल.
- फास्टॅग रेडिओ-फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (आरएफआयडी) तंत्रज्ञानासह कार्य करतो.
- प्रत्येक फास्टॅग त्या संबंधित गाड्यांचे रजिस्ट्रेशन डिटेल्ससह जोडलेला असतो. हे लावल्यानंतर टोल नाक्यावर कॅशलेस व्यवहार करता येतो
फास्टॅग कसे काम करते?
- जेव्हा आपण टोल नाक्यावरुन जाता तेव्हा टोल नाक्यावरील फास्टॅग रिडर आपल्या फास्टॅगचा बारकोड रिड करेल.
- यानंतर, आपल्या बँक खात्यातून टोल फि घेतील. ते सुरू झाल्यानंतर टोल नाक्यांवर गाड्यांच्या लांबलचक रांगा नसतील.
- हा फास्टॅग अद्याप दुचाकी वाहनांसाठी नाही.
- नॅशनल पेमेंट्स कोऑपरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) आरएफआयडी तयार केले आहे.
फास्टॅग कुठे खरेदी करू शकतो?
- आपण देशातील कोणत्याही टोल नाक्यावर फास्टॅग खरेदी करू शकता.
- याशिवाय तुम्ही अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, एसबीआय, कोटक बँक या शाखांकडूनही खरेदी करू शकता.
- आपण पेटीएम, अॅमेझॉन, गूगल पे सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरुनही हे खरेदी करू शकता.
- यामध्ये बऱ्याच डिस्काउंटसह वेगवेगळ्या ऑफर देण्यात येत आहेत.
- फास्टॅग खरेदी करताना आपल्याकडे आयडी प्रूफ आणि वाहन नोंदणी दस्तऐवज असणे आवश्यक आहे.
फास्टॅगच्या बॅलन्सच्या महितीसाठी माय फास्टॅग अॅप
- अनेकदा लोकांच्या फास्टॅगची वैधता संपल्यावर फास्टॅग लेनमध्ये वाहनांची गर्दी होते.
- काहीवेळा फास्टॅग नसलेल्या गाड्या फास्टॅग लेनमध्ये येतात.
- जर आपल्या कारमध्ये फास्टॅग स्थापित केला असेल तर आपण त्यासंदर्भातील सर्व माहिती माय फास्टॅग नावाच्या यूपीआय अॅपवर पाहू शकता.
- हे राष्ट्रीय महामार्ग व्यवस्थापन कंपनी लिमिटेडने तयार केले आहे.
- हे अॅप आपल्या कारच्या फास्टॅगचे स्टेटस देखील सांगते.
- आपण या अॅपसह आपल्या फास्टॅग खात्याला या अॅपशी लिंक करून पेमेंटसुद्धा करू शकतो.
- आपण या अॅपसह आपले बँक खाते जोडू शकता.
- यासह, जेव्हा जेव्हा आपण टोल नाक्यावर जाता तेव्हा आपल्या खात्यातून टोल कर वजा केला जाईल.
फास्टॅगची किंमत आणि मुदत
- फास्टॅगची किमंत दोन गोष्टींवरून ठरवली जाते.
- प्रथम आपली गाडी कोणती आहे आणि दुसरी ते आपण कुठून खरेदी करत आहात.
- बँकांच्या ऑफरनुसार त्याच्या किंमतीत काही फरक असेल.
- आपण फास्टॅग ज्या बँकेतून घेतलेले आहात त्याद्वारे आपण इश्यू फी आणि सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून पैसे घेतल्यामुळे त्याच्या किंमतीतही फरक पडतो. एक वेळ फी २०० रुपये असल्याचे अधिकारी सांगतात.
- पुन्हा जारी करण्यासाठी फी १०० रुपये आणि रिफंडेबल सिक्योरिटी डिपॉजिट २०० रुपये आहे.
- एकदा खरेदी केलेला फास्टॅग स्टिकर पाच वर्षांसाठी वैध असेल.
- स्टेट बँकेसारख्या बँका अमर्यादित वैधतेचा फास्टॅग देत आहेत.
- उदाहरणार्थ, जर तुम्ही पेटीएमकडून कारसाठी फास्टॅग विकत घेतले असेल तर त्यासाठी तुम्हाला ५०० रुपये खर्च करावे लागतील.
तुम्हाला बँकेतून फास्टॅग घ्यायचा असेल तर ही कागदपत्रे असणे आवश्यक
- बँकेतून फास्टॅग घेण्यासाठी तुम्हाला केवायसी कागदपत्र
- वाहनाचा आरसी
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- पॅनकार्ड
- पत्ता आणि आयडी पुरावा लागेल
- आपला परवाना, आयडी आणि अॅड्ररेस पुरावा सबमिट करू शकता.
- जर तुम्ही तुमचे खाते असलेल्या बँकेतून फास्टॅग घेतला, तर तुम्हाला फक्त आरसी घ्यावे लागेल.