मुक्तपीठ टीम
ब्रँडेड महागडी औषधे रुग्णांना परवडणाऱ्या दरात देण्यासाठी पंतप्रधान जनौषधी केंद्रं चालवली जातात. प्रधानमंत्री भारतीय जनौषधी योजना (PMBJP)मार्फक चालवल्या जाणाऱ्या या दुकांनांची संख्या आता वाढवली जाणार आहे. फार्मास्युटिकल्स अँड मेडिकल डिव्हाईसेस ब्युरो ऑफ इंडिया या संस्थेने भारतात पंतप्रधान भारतीय जनौषधी केंद्रे (PMBJKs), सुरू करण्यासाठी ,बेरोजगार व्यक्ती औषध जाणकार (फार्मासिस्ट), सरकारने नामनिर्देशित केलेल्या एजन्सीज, स्वयंसेवी संस्था, धर्मादाय संस्था, सहकारी संस्था इत्यादींकडून अर्ज मागविले आहेत. हे अर्ज ऑनलाइन प्रक्रियेद्वारे मागवले आहेत.इच्छुक अर्जदार पीएमबीआयच्या “janaushadhi.gov.in”या संकेतस्थळावर अर्ज करू शकतात. पात्र अर्जदारांना प्रथम येणाऱ्यास प्रथम या तत्त्वावर पीएमबीजेपी (PMBJP) च्या अंतर्गत औषध परवाना घेण्यासाठी तत्वतः मान्यता दिली जाईल.
सामान्य जनतेला, विशेषत: गरिबांसाठी स्वस्त दरात दर्जेदार औषधे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनातून सरकार मार्च २०२४ पर्यंत प्रधानमंत्री भारतीय जनौषधी केंद्रांची (PMBJKs) संख्या १० हजारापर्यंत वाढवण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे.
३१ मार्च २०२२ पर्यंत या केंद्रांची संख्या ८ हजार ६१० पर्यंत वाढली आहे.आतापर्यंत पीएमबीजेपीअंतर्गत, देशातील सर्व ७३९ जिल्हे समाविष्ट झाले आहेत.यासह ४०६ जिल्ह्यांतील ३५७९ तालुके समाविष्ट करण्यासाठी नव्याने अर्ज मागवण्यात आले आहेत.लहान शहरे आणि तालुका मुख्यालयातील रहिवासी आता प्रधानमंत्री जनौषधी केंद्रे सुरू करण्याच्या संधीचा लाभ घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत महिला, अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती, डोंगराळ भागातील जिल्हे, बेटांवरील जिल्हे आणि ईशान्येकडील राज्यांसह विविध श्रेणींसाठी व्यक्तिंना याअंतर्गत प्रोत्साहन/ विशेष प्रोत्साहन देण्यात येत आहे.
पीएमबीजेपीअंतर्गत येणाऱ्या विक्री उत्पादनांत १६१६ औषधे आणि २५० शस्त्रक्रिया उपकरणे आहेत; जी सध्या देशभरात कार्यरत असलेल्या ८ हजार ६०० हून अधिक प्रधानमंत्री भारतीय जनौषधी केंद्रांवर (PMBJKs) विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
पाहा व्हिडीओ :