मुक्तपीठ टीम
सांगलीतील कृष्णा नदी म्हणजे तिच्या किनाऱ्यावर वसलेल्या लेकरांसाठी आईसारखी कृष्णामाई. तिच्या किनाऱ्यावरच, तिच्या पाण्यावरच सांगलीकरांचं जीवन घडतं, बहरतं. त्याच कृष्णामाईची जत्रा आयोजित करून उत्सव साजरा करण्याची एक नवी परंपरा आता रुजतेय.
सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेने हाती घेतलेला हा उपक्रम सर्वांच्या पसंतीस उतरत आहे. मनपा आयुक्त नितिन कापडणीस यांनी यावर्षीच्या उत्सवासाठी जोमाने तयारी सुरु केली आहे. या वर्षीची कृष्णामाईची जत्रा १४ ते १७ एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.
यावर्षी कृष्मामाईच्या जत्रेत सांगलीची कला व संस्कृती आणि खाद्य संस्कृतीचं दर्शन घडले. स्थानिक कलाकौशल्याच्या जोडीनंच सांगलीकरांच्या वेगळ्या चवदार खाद्य संस्कृतीला अनुभवण्याची संधी मिळेले.महिला बचत गटांसाठी दालने असल्यानं स्त्रीशक्तीलाही वाव असेल.
एकीकडे सांगलीतील कृष्णामाईची जत्रा तर दुसरीकडे पलुस तालुक्यातील पर्यटन वाढीसाठी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे प्रयत्नही समोर आले आहेत.