मुक्तपीठ टीम
लॅब ग्रोन हिऱ्यांची ओळख पर्यावरणपूरक आणि परवडणारे रत्न म्हणून जगभरात केली जाते. लोकांमध्ये याची सध्या एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेमधील ७०% पेक्षा जास्त तरुण मंडळी लॅब ग्रोन हिरे विकत घेण्यावर भर देत आहेत. भारतात देखील याची क्रेझ वाढताना दिसत आहे जिथे भारतीय तरुण देखील लॅबग्रोन हिरे स्वीकारत आहेत. लॅबग्रोन हिरे हे नैसर्गिक हिऱ्यांसारखेच असतात. फरक एवढाच आहे की ते जमिनीखाली मिळण्याऐवजी ते प्रयोगशाळेत वाढवले जातात.
लॅबग्रोन हिऱ्यांचे टेस्ट ट्यूब बेबी स्वरूपात उत्पादन
- लॅबग्रोन हिरे हे टेस्ट ट्यूब बेबी आणि नैसर्गिकरीत्या जन्मलेल्या बाळासारखे असते.
- दोन्हींमध्ये विकास प्रक्रिया भिन्न असते परंतु अंतिम परिणाम अगदी सारखाच असतो.
- त्याचप्रमाणे, प्रयोगशाळेत वाढवलेले हिरे १००% अस्सल आहेत जे नैसर्गिकरीत्या प्रयोगशाळेत खडकाळ उत्पादन प्रक्रियेनुसार उगवले जातात.
- प्रयोगशाळेत बनवलेले हिरे आणि पृथ्वीवरील नैसर्गिकरीत्या निर्मित हिरे यांच्यात कोणताही फरक नाही.
- दोन्हींमध्ये समान रासायनिक, थर्मल, ऑप्टिकल आणि भौतिक वैशिष्ट्ये आहेत.
प्रयोगशाळेतील हिरे पर्यावरणपूरक कसे?
- उत्खनन न केल्यामुळे, प्रयोगशाळेत वाढवलेले हिरे पृथ्वी आणि पाण्याचा नाश करत नाहीत. परिणामी सर्व प्रयोगशाळेत उगवलेले हिरे पर्यावरणाचे रक्षण करतात.
- ते सर्वच संघर्षमुक्त तसेच पर्यावरणपूरक असतात.
- याशिवाय उत्खननाच्या खर्चातही मोठी बचत होते.
- यामुळे ग्राहकांना या बचतीचा लाभ मिळतो.
- प्रयोगशाळेत वाढवलेले हिरे पृथ्वीकडून मिळालेल्या हिऱ्यांच्या तुलनेत किमान ५०% किफायतशीर असतात.
- त्यामुळे ते केवळ इको फ्रेंडली नाही तर पॉकेट फ्रेंडलीही आहे.
लॅबग्रोन हिऱ्यांची वाढती बाजारपेठ
- जगभरातील प्रयोगशाळेत वाढवलेल्या हिऱ्यांबद्दलची वाढती जागरूकता आणि पर्यावरणपूरकतेमुळे त्यांची लोकप्रियता वाढतेय.
- त्यामुळे २०३० पर्यंत जगभरातील हिरे आणि दागिने क्षेत्रातील प्रयोगशाळेत वाढवलेल्या हिऱ्यांची बाजारपेठ ८० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.
या उत्पादनाबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी, लॅब क्रिएटेड डायमंड्स असोसिएशन ऑफ इंडियासोबत लाइम लाइट लॅब ग्रोन डायमंड्स आणि लॅब ग्रोन डायमंड सादर करते. हा रोड शो अनेक शहरांमध्ये आयोजित केला जाईल आणि भारतातील लॅब ग्रोन डायमंड उद्योगाची भविष्यातील क्षमता दर्शवेल. हे जाणून घेण्यासाठी शहरातील आघाडीच्या ज्वेलरी उद्योगातील दूरदर्शी या शोमध्ये सहभागी होणार आहेत.