मुक्तपीठ टीम
जिल्हा परिषद म्हणजे झेडपीची शाळा म्हटले की अनेकांच्या कपाळावर आठ्या ठरलेल्याच. पण अशा साधनं नसलेल्या शाळांमधील काही प्रयोगशील शिक्षकांमुळे खूप वेगळं सुरु असतं. ज्याचा आदर्श शहरातील शाळांनीही ठेवावा. या प्रयत्नांचे श्रेय आहे ते प्रयोगशील शिक्षिका ज्योती टेंगसे यांना. त्या मानवतमधील जिल्हा परिषद शाळेत शिकवतात. त्यांचा विद्यार्थ्यांना जपानी भाषेचे धडे देतानाचा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. सगळीकडे जिल्हा परिषद शाळेतील या शिक्षेकेच्या प्रयत्नांचं कौतुक होतंय. त्या त्याचे श्रेय देतात ते परभणीतील बीईओ ससाणे यांना. त्यांच्या प्रेरणेतूनच आम्ही वेगळे उपक्रम राबवू शकलो असे त्यांनी सांगितले.
ज्योती टेंगसे यांचे वडिलही शिक्षक. त्या पाथ्रीत शिकल्या. शिक्षक वडिलंचाच आदर्श ठेऊन त्या शिक्षकी पेशात आल्या असाव्यात. शिक्षणानंतर त्या जिल्हा परिषदेच्या सेवेत रुजू झाल्या. सध्या परभणी जिल्ह्यातील मानवतमध्ये शाळा क्र. ४मध्ये शिकवतात. प्राथमिकच्या मुलांना शिकवतात. नवनवीन उपक्रम चालू असतात. मुक्तपीठशी बोलतना त्यांनी सांगितले, “ब्लॉक एज्युकेशन अधिकारी संजय ससाणे यांच्या प्रेरणेतून आम्ही शिक्षक खूप वेगळे उपक्रम राबवतो. त्यांनी आम्हाला वेगवेगळ्या प्रशिक्षणातून शिकवले. ते शिकवतात, आम्ही शिकतो आणि वर्गांमध्ये मुलांना वेगळे काही शिकवतो.”
त्या पुढे म्हणाल्या, “या वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण झाला. एक तृतियांश वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करायचा आणि त्यानंतर इतर उपक्रम राबवायचे. त्यानंतर आता आम्ही इंग्रजी ते जपानी शिकवण्याचा प्रयत्न करत आहोत. इंग्रजी भाषेतील वाक्य गुगलचा वापर करून जपानीत बदलले. त्यानंतर स्वत: काही रोजच्या व्यवहारातील वाक्य शिकून आता मुलांना शिकवत आहोत.”
पाहा व्हिडीओ: