मुक्तपीठ टीम
भारतासह जगामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची वाढती प्रकरणे समोर आली आहेत. चिनी प्रसारमाध्यमांच्या मते, देशात महामारीच्या सुरुवातीस वुहानचा उद्रेक झाल्यापासून, एका दिवसात सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. चीनमध्ये एका दिवसात एकूण ५२६ नव्या रुग्णांची पुष्टी झाली आहे. अर्थात तरीही परिस्थिती घाबरावं इतकी बिघडलेली नाही आहे. चीनच्या कोरोनामुक्त धोरणाला हा धक्का असल्याचं चीनने मान्य केलं आहे. मात्र, चीन सतर्क झाला असून नागरिकांना कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे.
चीनमध्ये वाढते रुग्ण, चिंतेची बाब!
- चीनमध्ये एकूण ५२६ नव्या रुग्णांची पुष्टी झाली आहे, जी गेल्या दोन वर्षांत एका दिवसात सर्वाधिक संसर्गाची संख्या आहे.
- त्यापैकी २१४ रुग्ण लक्षणे असलेले तर ३१२ रुग्ण लक्षणे नसलेले होते.
- चीनने म्हटले आहे की कोरोनामुक्त धोरणाला मात्र धक्का बसला आहे.
चीनसह इतर देश सतर्क
- इतक्या प्रकरणांनंतर चीन सतर्क झाला आहे.
- कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळल्यानंतर इतर देशही सतर्क झाले असून नागरिकांना कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे.
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनच्या किंगदाओ शहरात ओमायक्रॉनचे ८८ नवीन रुग्ण आढळले आहेत.
महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट
- रविवारी राज्यात ३६२ नवीन रुग्णांचे निदान झालेयत.
- रविवारी राज्यात ६१ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
६८८ रुग्ण बरे झाले आहेत. - राज्यात रविवारी ३ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२% एवढा आहे.
- राज्यात रविवारी रोजी एकूण ३,७०९ सक्रिय रुग्ण आहेत.