मुक्तपीठ टीम
भारतीय रेल्वेने एक नवा इतिहास रचला आहे. स्वदेशी बनावटीच्या ट्रेन कोलिजन प्रोटेक्शन सिस्टीम कवचची चाचणी ४ मार्च रोजी सिकंदराबाद येथे करण्यात आली. यामध्ये दोन रेल्वे विरुद्ध दिशेने पूर्ण वेगाने एकमेकांकडे आल्या. यापैकी एका ट्रेनमध्ये रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव स्वतः बसले होते, तर दुसऱ्या ट्रेनमध्ये रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष उपस्थित होते. मात्र प्रोटेक्शन सिस्टीम कवचमुळे या दोन रेल्वे सुरक्षित अंतरावर थांबल्या. दोन्ही गाड्यांचे अपघात न होता सुरक्षितपणे थांबल्याने कवच यंत्रणा यशस्वी ठरली. आजच्या बहुचर्चित चाचणीमुळे कोकण रेल्वेच्या याच नावाच्या टक्कर रोधी यंत्रणेची आठवण मात्र झाली. त्याविषयी माहितीसाठी या बातमीच्या शेवटी दिलेली लिंक क्लिक करा.
आत्मनिर्भर भारत की मिसाल- भारत में बनी ‘कवच’ टेक्नोलॉजी।
Successfully tested head-on collision. #BharatKaKavach pic.twitter.com/w66hMw4d5u— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) March 4, 2022
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव एका ट्रेनच्या इंजिनमध्ये तर बोर्डाचे अध्यक्ष विनय कुमार त्रिपाठी दुसऱ्या ट्रेनच्या इंजिनमध्ये प्रवास करत होते. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर एकमेकांच्या विरुद्ध दिशेने ५० किमी प्रतितास वेगाने धावत होत्या. मात्र, दोन्ही गाड्या भरवेगात असतानाही एकमेकांच्या जवळ येवू लागताच ३८० मीटर आधी थांबल्या. रेल्वेमंत्र्यांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओत ते मोटरमनला विचारत आहेत, तुम्ही ब्रेक नाही लावलात, तर गाडीला कोण रोखत आहे, मोटरमन सांगतात, कवच वेग कमी करतोय. आणि खरोखरच दोन्ही गाड्या रोखल्या गेल्या. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कवच यंत्रणेच्या यशस्वी चाचणीचं टाळ्या वाजवून कौतुक केलं.
कसं संरक्षण करतं कवच?
अनेक वर्षांच्या संशोधनानंतर रेल्वे मंत्रालयाने हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. जगातील सर्वात स्वस्त स्वयंचलित ट्रेन टक्कर संरक्षण प्रणाली म्हणून ‘कवच’ ची जाहिरात रेल्वेकडून केली जात आहे. ‘शून्य अपघात’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी रेल्वेला मदत करण्यासाठी स्वदेशी विकसित ऑटोमेटेड ट्रेन प्रोटेक्शन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. कवचची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की निर्धारित अंतरावर त्याच मार्गावर दुसरी ट्रेन येत असल्यास दोन्ही गाड्या आपोआप थांबतात.
या डिजिटल सिस्टीममुळे रेड सिग्नलकडे दुर्लक्ष करणे किंवा अन्य काही बिघाड अशा मानवी चुकांमुळे ट्रेन आपोआप थांबेल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कवच बसवण्याची ऑपरेशनल किंमत प्रति किलोमीटर ५० लाख रुपये येईल, तर जागतिक स्तरावर अशा सुरक्षा यंत्रणेची किंमत प्रति किलोमीटर सुमारे २ कोटी रुपये आहे.
भारत में बना, भारत का कवच!
#BharatKaKavach pic.twitter.com/12vkwgOhS0
— Ministry of Railways (@RailMinIndia) March 4, 2022
मुंबई – दिल्ली, दिल्ली – हावडा मार्गावर कवच यंत्रणेचा वापर
१. ‘कवच’ प्रणालीमध्ये हाय व्हर्जन रेडिओ कम्युनिकेशनचा वापर केला जातो.
२. अधिकार्यांच्या मते, चिलखत एसआयएल-४ म्हणजेच सिक्युरिटी स्टँडर्ड लेव्हल फोरशी सुसंगत आहे, जी कोणत्याही सुरक्षा प्रणालीची सर्वोच्च पातळी आहे.
३. ही प्रणाली सुरू झाल्यानंतर, पाच किलोमीटरच्या परिघात असलेल्या सर्व गाड्या लगतच्या रुळांवर उभ्या असलेल्या ट्रेनच्या सुरक्षेसाठी थांबतील.
४. कवच प्रति तास १६० किलोमीटर वेगासाठी मंजूर आहे.
५. २०२२ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत ‘कवच’चे २ हजार किमीपर्यंत रेल्वेचे जाळे आणण्याची योजना आहे.
६. दक्षिण मध्य रेल्वेच्या सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये आतापर्यंत १,०९८ किमी मार्गावर कवच बसवण्यात आले आहे.
७. दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-हावडा रेल्वे मार्गावरही कवच बसवण्याची योजना आहे, ज्यांची एकूण लांबी सुमारे ३ हजार किमी आहे.
कोकण रेल्वेने लावला २०१०मध्ये शोध!
भारतीय रेल्वेने ज्या कवच यंत्रणेची आज रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत यशस्वी चाचणी घेतली तशाच रक्षा कवच नावाच्या यंत्रणेचा शोध कोकण रेल्वेने २०१०मध्ये लावला आहे.
त्याच्या माहितीसाठी ही लिंक क्लिक करा:
Kokan Railway ACD_PRESENTATION-E-MARCH13_0