मुक्तपीठ टीम
नागपूरमधील जीएच रायसोनी इंजिनिअरिंग महाविद्यालयातील ३० विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या पथकाने एक लघू उपग्रह तयार केला आहे. हा उपग्रह लोअर अर्थ ऑर्बिटसाठी निर्मित असलेल्या युनिटीसॅट प्रकल्पाचा एक भाग असेल. इस्त्रोचे पीएसएलव्ही सी-५१ हे रॉकेट २८ फेब्रुवारी रोजी श्रीहरिकोटा येथून अंतराळात झेपावणार आहे. या रॉकेटसोबत तीन उपग्रहांचा पे लोड असेल. त्यापैकी एक नागपूरकर विद्यार्थ्यांचा लघू उपग्रह असेल.
इस्त्रोच्या रॉकेटसोबतचे इतर दोन उपग्रह जेपीपार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि श्री शक्ती इन्स्टीट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अॅन्ड टेक्नॉलॉजी यांनी बनवले आहेत.
जीएचआरसीई उपग्रह कार्यक्रमाचे प्रकल्प मार्गदर्शक सचिन उंटवले यांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकल्प वर्षभराच्या प्रयत्नांनी पूर्ण झाला आहे. जानेवारी २०२० मध्ये इस्त्रोने प्रकल्पाला मान्यता दिली. रायसोनी महाविद्यालयाने यासाठी ३५ लाख रुपयांचा खर्च उचलला आहे.
उपग्रह हे मोठे असतात. तर लघू उपग्रह खूपच वेगळे असतात. ते एका चपट्या जेवणाच्या डब्यासारखे दिसतात. नागपूरकर विद्यार्थ्यांनी घडवलेली ही चौरस धातू आवृत्ती, अर्धा किलो वजनाची आहे. ती १० सेंटीमीटर रूंद आणि ३ सेंटीमीटर उंच आहे. सिग्नल क्षमता चाचणीनंतर भविष्यात त्याचा व्यावसायिक वापर शोधला जाऊ शकतो.
ते तयार करण्यासाठी, उंटवले यांनी इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर, मॅकेनिकल आणि कृत्रिम बुद्धिमत्ता प्रवाहातून प्रत्येकी पाच विद्यार्थ्यांसह एक मनोरंजक मिश्रण एकत्र केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्या प्रवाहामधील प्राध्यापक सदस्यांनाही जोडले. हा प्रकल्प जानेवारीच्या मध्यापासून सुरू झाला असताना, लॉकडाऊनमुळे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या हालचालींवर बंधने आली. तरीही टीम कार्यरत राहिली. या लघू उपग्रहाची निर्मिती बेंगळुरूमध्ये झाली असली डिझाईन आणि तंत्रज्ञान हे सर्व नागपुरातील टीमचे आहे.
रॉकेट एलईओपर्यंत पोहोचल्यानंतर युनिटीसॅट उपग्रह अवकाशात सोडले जातील. त्यानंतर हे तीन उपग्रह एकमेकांपासून अवघ्या एक मीटर अंतरावर स्थिर राहतील. आमच्या कॉलेज कॅम्पसमध्ये असलेल्या अर्थ स्टेशनवरुन त्याच्या सिग्नल्सवर लक्ष ठेवले जाईल.
पाहा व्हिडीओ: