मुक्तपीठ टीम
अमेरिकेची अंतराळ संस्था नासा आता अणुऊर्जेवर चालणारे रॉकेट तयार करण्याच्या योजनेवर काम करत आहे. जर हा प्रकल्प यशस्वी झाला तर पृथ्वीपासून सुमारे २३ कोटी किलोमीटर अंतरावर ३ महिन्यांत माणूस मंगळावर पोहोचू शकेल. सध्या मानवरहित रॉकेट्स मंगळावर पोहोचण्यास ७ महिने लागतात. २०३५ पर्यंत माणसाला मंगळावर पोहोचवण्याची नासाची योजना आहे.
रॉकेटची गती ही नासाची सर्वात मोठी चिंता आहे. इतक्या अंतरावर जाणे ठरले तर ऑक्सिजनचा अभाव सर्वात मोठी समस्या निर्माण करेल. म्हणून, नासाचे शास्त्रज्ञ प्रवासाची वेळ कमी करण्याचे काम करीत आहेत.
अमेरिकेच्या सिएटलमधील कंपनी अल्ट्रा सेफ न्यूक्लियर टेक्नोलॉजी (यूएसएनसी-टेक) ने नासाला न्यूक्लियर थर्मल प्रोपल्शन (एनटीपी) इंजिन तयार करण्याचा प्रस्ताव दिला आहे. कंपनीने अणुऊर्जेसह रॉकेटची रचनाही केली आहे.
अल्ट्रा सेफ न्यूक्लियर टेक्नोलॉजीचे संचालक मायकल ईड्स यांच्या म्हणण्यानुसार, रॉकेटची रचना अशा प्रकारे केली गेली आहे की, ते इंजिन आणि क्रू एरियाच्या दरम्यान हानिकारक द्रव गोळा करेल आणि रेडिओएक्टिव्ह कणांना क्रूच्या संपर्कात येण्यापासून रोखेल. हे रेडिएशनशी संपर्क साधणार नाही आणि सुरक्षितता राखली जाईल.
नासाच्या अंतराळ तंत्रज्ञान मिशन संचालनालयाचे चीफ इंजीनियर जेफ शेय यांनी सांगितले की, इंजिन मॅन्युफॅक्चरिंगमधील मुख्य आव्हानांपैकी एक म्हणजे युरेनियम इंधन हे युरेनियम न्यूक्लियर थर्मल इंजिनच्या आत उच्च तापमान तयार करतात. अल्ट्रा सेफ न्यूक्लियर टेक्नोलॉजीचे असे म्हणणे आहे की, या समस्येचे निराकरण करण्यासाठी, एक इंधन विकसित केले जाऊ शकते जे २७०० डिग्री केल्विन (४,४०० डिग्री फॉरेनहाइट) पर्यंत तापमानात कार्य करू शकते. या इंधनात सिलिकॉन कार्बाइड असते जे टाकीच्या कवच संरक्षणात देखील वापरले जाते. हे इंजिनमधून रेडिएशन बाहेर सोडणार नाही आणि अंतराळवीरांना सुरक्षित ठेवेल.
पाहा व्हिडीओ