मुक्तपीठ टीम
स्वरलता, गानकोकिळा एक नाही अनेक उपाध्यांनी ज्यांना गौरवण्यात आले त्या लता मंगेशकरांचा स्वर्गीय स्वर म्हणजे जीवनातील आनंदोत्सव! एक नाही तर अनेक पिढ्यांच्या कानांनाच नाही तर मनामनाला त्यांनी तृप्त केलं. १९२९मध्ये त्यांचा जीवनप्रवास सुरु झाला. लहानपणीच वडिलांचे निधन झाले. पण प्रतिकुलतेशी झुंजताना लता मंगेशकरांची स्वर आराधना अधिकच बहरली आणि त्यांनी भारतातीलच नाही तर जगातील स्वरविश्वातील ती उंची गाठली जी गाठणं आजच नाही तर येणाऱ्या भविष्यातही क्वचितच कुणाला शक्य होईल.
वडिलांचा संगीत वारसा पोहचवला स्वर्गीय उंचीवर…
- लता मंगशेकरांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ मध्ये मध्य प्रदेशातल्या इंदूर शहरात झाला.
- त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसंच नाट्यकलावंत होते.
- त्यांच्याकडूनच लता मंगशेकरांना संगीताचा वारसा मिळाला.
- गोव्यातलं मंगेशी हे लता लता मंगशेकरांचे मूळ गाव
- १९४२ मध्ये अवघ्या १३ वर्षांच्या असताना त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांचं निधन झालं.
- त्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी लता मंगेशकरांवर आली.
- भारतीय विविध भाषांमधल्या ३० हजार गाण्यांना लता मंगेशकर यांनी आपला आवाज दिला आहे.
- १९५०च्या दशकात नामांकित संगीत दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केलं.
- १९५८ मध्ये मधुमती या सिनेमातल्या आजा रे परदेसी या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
- १९६०च्या दशकात लता मंगेशकर निर्विवादपणे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रथम श्रेणीच्या पार्श्वगायिका ठरल्या.
- २७ जून १९६३ रोजी भारत-चीन युद्धानंतर एका कार्यक्रमात लता दीदींनी गायलेल्या ‘ऐ मेरे वतन के लोगों’ हे देशभक्तिपर गीत ऐकल्यानंतर दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
पुरस्कारांची गणतीच नाही…
लता मंगेशकर यांना राज्य, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरांवर अनेक बहुमान प्राप्त झाले आहेत.
- फिल्म फेयर पुरस्कार (१९५८, १९६२, १९६५, १९६९, १९९३, १९९४)
- राष्ट्रीय पुरस्कार (१९७२, १९७५, १९९०)
- महाराष्ट्र सरकार पुरस्कार (१९६६, १९६७)
- पद्मभूषण पुरस्कार – १९६९
- जगातील सर्वाधिक गाणी गाण्याचा गिनीज बुक रेकॉर्ड – १९७४
- १९८९ – दादासाहेब फाळके पुरस्कार
- १९९३ – फिल्मफेअरचा लाईफ टाईम अचिवमेंट पुरस्कार
- १९९७ – राजीव गांधी पुरस्कार
- १९९९ – एन.टी.आर. पुरस्कार
- १९९९ – पद्मविभूषण पुरस्कार
- २००१ – भारतरत्न पुरस्कार
- २००१ – नूरजहाँ पुरस्कार
- २००१ – महाराष्ट्र भूषण पुरस्कार
अभिमान वाटावा असे वेगळे सन्मान
- ‘पद्मभूषण’ ‘आस्थान विद्वान’ (तिरूपती देवस्थान)
- ‘स्वर भारती’ (श्री शंकराचार्य)
- ‘कलाप्रवीण’ (जवाहरलाल नेहरू तंत्रशास्त्रीय विद्यापीठ)
- ‘डी. लिट्.’ (शिवाजी विद्यापीठ)
- ‘सूरश्री’ (लंडनच्या रॉयल ॲल्बर्ट हॉलमधील यशस्वी कार्यक्रमाबद्दल मिळालेला किताब)
- ‘स्वरल
गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन! स्वर्गीय स्वरांची धनी स्वर्गाकडे निघाली…
गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन! स्वर्गीय स्वरांची धनी स्वर्गाकडे निघाली…