मुक्तपीठ टीम
आंदोलक शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यामुळे संयुक्त किसान मोर्चा सोमवारी देशभरात ‘विश्वासघात दिवस’ साजरा करत आहे. केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. मोर्चाशी संबंधित सर्व शेतकरी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
➡️ वादा : आन्दोलन के दौरान शहीद परिवारों को हरियाणा, UP सरकार ने सैद्धांतिक सहमति दी है।
❌ विश्वासघात : मुआवजा देने पर UP सरकार ने कोई कार्यवाही शुरू नहीं की है। हरियाणा सरकार की तरफ से मुआवजे के बारे में भी कोई निर्णय घोषित नहीं हुआ है।#विश्वासघात_दिवस #ModiBetrayingFarmers
— Kisan Ekta Morcha (@Kisanektamorcha) January 31, 2022
देशातील किमान ५०० जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन होत असल्याचा शेतकरी नेत्यांचा दावा आहे. शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप किसान मोर्चाने केला आहे. संयुक्त किसान मोर्चाने १५ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत आंदोलनाचा निर्णय घेतला होता. या आंदोलनामध्ये केंद्र सरकारला निवेदनही देण्यात येणार आहे. आंदोलन यशस्वी करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाची समन्वय समितीने प्रयत्न केले आहेत.
Memorandum from the farmers to the Honourable President (via – DMs and SDMs) on the occasion of “Day of Betrayal” on 31st January 2022.#ModiBetrayingFarmers pic.twitter.com/ncZfVPiIes
— Kisan Ekta Morcha (@Kisanektamorcha) January 31, 2022
‘विश्वासघात दिन’ कशासाठी?
- १५ जानेवारीच्या निर्णयानंतरही भारत सरकारने ९ डिसेंबरच्या पत्रात दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नसल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे.
- आंदोलनादरम्यानचा खटला तत्काळ मागे घेण्याच्या आणि शहीदांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याच्या आश्वासनावर गेल्या दोन आठवड्यांत कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
- एमएसपी म्हणजे किमान हमी दराच्या मुद्द्यावर सरकारने समिती स्थापनेबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.
- त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांनी ‘विश्वासघात दिना’च्या माध्यमातून सरकारविरोधात संताप व्यक्त करत आहेत.
लखीमपुर खीरी हत्याकांड मे SIT की रिपोर्ट में षड्यंत्र की बात स्वीकार करने के बावजूद भी इस कांड के प्रमुख षड्यंत्रकारी अजय मिश्र टेनी का केंद्रीय मंत्री रहना हर संवैधानिक और राजनैतिक मर्यादा के खिलाफ है।
यह किसानों के घाव पर नमक छिड़कना है।#विश्वासघात_दिवस#ModiBetrayingFarmers— Kisan Ekta Morcha (@Kisanektamorcha) January 31, 2022
‘मिशन उत्तर प्रदेश’ सुरूच राहणार!
- ‘मिशन उत्तर प्रदेश’ सुरूच राहणार असून, त्यातून या शेतकरी विरोधी शक्तीला धडा शिकवला जाईल, असे संयुक्त किसान मोर्चाने म्हटले आहे.
- केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांची हकालपट्टी व अटक, केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांचा केलेला विश्वासघात आणि उत्तर प्रदेश सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाबाबत जनतेतून कठोर निर्णय घेण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
- ३ फेब्रुवारीला पत्रकार परिषदेद्वारे या अभियानाच्या नव्या फेरीला सुरुवात होणार आहे.
- याअंतर्गत किसान मोर्चाच्या सर्व संघटनांकडून राज्यभरात साहित्य वाटप, पत्रकार परिषदा, सोशल मीडिया आणि जाहीर सभांच्या माध्यमातून संदेश भाजपाला संदेश दिला जाणार आहे.
➡️सरकार का वादा – किसान आन्दोलन के दौरान किसानों पर दर्ज मुकदमें तत्काल वापिस लिये जायेंगे।
❌विश्वासघात – केंद्र सरकार व भाजपा शासित राज्य सरकारो की तरफ से आंदोलन के केस वापिस लेने के आश्वासन पर नाममात्र की भी कोई कार्यवाई नहीं हुई है। #विश्वासघात_दिवस#ModiBetrayingFarmers
— Kisan Ekta Morcha (@Kisanektamorcha) January 31, 2022
टिकैत यांचा केंद्र सरकारवर टिकेचा वर्षाव
- शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केंद्र सरकार आश्वासन पाळत नसल्याचा आरोप केला आहे.
- एक वर्ष चाललेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान ज्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ते मागे घ्यावे तसेच एमएसपीबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
- राकेश टिकैत पुढे म्हणाले की, मोदी सरकारने दिल्लीत जी काही आश्वासने दिली आहेत ती लवकराच लवकरं पूर्ण करावी, आम्ही निवडणुकीपेक्षा वेगळे आहोत, आमचे एक मत आहे, तेही आम्ही कुणाला तरी देऊ.
- मी कोणाचेही समर्थन करत नाही.
- लोक सरकारवर खूश असतील तर त्यांना मत देतील, नाराज असतील तर दुसऱ्याला मत देतील.
➡️ सरकार का वादा : भारत सरकार अन्य राज्यों से भी अपील करेगी कि इस किसान आन्दोलन से सम्बन्धित दर्ज मुकदमों को वापिस लेने की कार्यवाही करेगी।
❌ विश्वासघात : केंद्र सरकार की तरफ से ऐसी कोई चिट्ठी भी नहीं गई है।#विश्वासघात_दिवस #ModiBetrayingFarmers
— Kisan Ekta Morcha (@Kisanektamorcha) January 31, 2022
उल्लेखनीय म्हणजे सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी वर्षभराहून अधिक काळ आंदोलन केले.गुरुपर्वच्या दिवशी पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित करताना शेतकऱ्यांची माफी मागून तीनही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतरही शेतकरी आंदोलन मागे घेण्यास तयार नव्हते.शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सरकारकडे एमएसपी, शेतकऱ्यांविरोधातील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रस्ताव पाठवला.ज्यामध्ये एमएसपीवर समिती स्थापन करण्याबाबत चर्चा झाली होती. आंदोलन मागे घेताच ज्या विभागाने गुन्हा दाखल केला आहे तो विभाग आपोआपच केस मागे घेईल, असे सरकारने म्हटले.
➡️ सरकार का वादा : MSP पर कमेटी बनेगी व SKM को शामिल किया जाएगा।
❌ विश्वासघात : सरकार ने न तो कमेटी के गठन की घोषणा की है, और न ही कमेटी के स्वरूप और उसकी मैंडेट के बारे में कोई जानकारी दी है।#विश्वासघात_दिवस #ModiBetrayingFarmers
— Kisan Ekta Morcha (@Kisanektamorcha) January 31, 2022
लखीमपुर खीरी हत्याकांड मे SIT की रिपोर्ट में षड्यंत्र की बात स्वीकार करने के बावजूद भी इस कांड के प्रमुख षड्यंत्रकारी अजय मिश्र टेनी का केंद्रीय मंत्री रहना हर संवैधानिक और राजनैतिक मर्यादा के खिलाफ है।
यह किसानों के घाव पर नमक छिड़कना है।#विश्वासघात_दिवस#ModiBetrayingFarmers— Kisan Ekta Morcha (@Kisanektamorcha) January 31, 2022