मुक्तपीठ टीम
महाराष्ट्राप्रमाणेच देशभरातील अनेक राज्यांमध्ये अध्यात्मिक कार्याच्या जोडीनेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मध्य प्रदेशातील इंदूरचे भय्यू महाराज यांचा संशयास्पद मृत्यू त्यांच्या अनुयायांना हादरवणारा होता. पोलिसांनी आत्महत्या म्हणून नोंद केलेल्या त्यांच्या मृत्यूप्रकरणी इंदूर न्यायालयाने शुक्रवारी मुख्य सेवक विनायक, चालक शरद आणि केअरटेकर पलक यांना दोषी ठरवत ६ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. मात्र भैय्यू महाराजांची दुसरी पत्नी डॉ आयुषी शर्मा यांनी दोषींना खूपच कमी शिक्षा मिळाल्याबद्दल असमाधान व्यक्त केलं आहे. या आरोपींनी विश्वासघात करत आम्हाला जीवनाची शिक्षा दिली, त्यामुळे त्यांना मिळालेली शिक्षा कमीच असल्याचे त्या म्हणाल्या.
घटनेनंतर साधारण सहा महिन्यांनतर पोलिसांनी ही कारवाई केली होती. या तिघांनी विविध मार्गांनी त्रास देऊन भय्यू महाराज यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तसेच पैशांसाठी त्यांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.
पैशासाठी भय्यू महाराजांचा छळ
मिळालेल्या माहितीनुसार, साडेतीन वर्षांच्या सुनावणीनंतर सत्र न्यायालयाने हा निकाल दिला.
- ३२ साक्षीदारांची सुनावणी झाली.
- १५० सादर केले.
- उच्च न्यायालयाने हा गुन्हा सिद्ध केला आहे.
- महाराजांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सत्र न्यायाधीश धर्मेंद्र सोनी यांनी महाराजांचा सेवक शरद देशमुख, विनायक दुधाळे आणि पलक पुराणिक यांना शिक्षा सुनावली.
- आरोपी पैशासाठी महाराजांचा छळ करत असे, हे न्यायालयाने मान्य केले.
- त्यांना पैशांसाठी ब्लॅकमेलही करण्यात आले.
- भय्यू महाराज यांनी १२ जून २०१८ रोजी स्वतःच्या कपाळावर गोळी झाडून आत्महत्या केली होती.
- भैय्यू महाराजांना कुटुंबापेक्षा जे सेवेदार होते, ज्यांच्यावर त्यांचा एवढा विश्वास होता की त्यांनी त्यांचा आश्रम आणि काम त्यांच्याकडे सोपवले होते, त्याच सेवेदारांनी त्यांना पैशासाठी एवढा त्रास दिला की त्यांना आत्महत्येसारखे पाऊल उचलावे लागले.
भय्यू महाराजांची पत्नी म्हणते शिक्षा खूपच कमी!
- संत भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी न्यायालयाने शुक्रवारी दोषींना ६-६ वर्षांची शिक्षा सुनावली.
- भैय्यू महाराजांची दुसरी पत्नी डॉ आयुषी शर्मा यांनी दोषींना देण्यात येणारी शिक्षा खूपच कमी असल्याचे सांगितले आहे.
- मीडियाशी बोलताना त्या म्हणाल्या की, मी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो पण दोषींना जी शिक्षा दिली आहे ती खूपच कमी
- त्यांनी आम्हाला जन्मभराची शिक्षा दिली आहे.
- मी अद्याप न्यायालयाची कार्यवाही किंवा आदेशपत्र वाचलेले नाही, मी ते एकदा बघेन, कुटुंबातील ज्येष्ठांशी बोलून पुढे काय करायचे याचा विचार करेन, असे त्या म्हणाल्या.