मुक्तपीठ टीम
भारत जगात काकडीची निर्यात करणारा सर्वात मोठा निर्यातदार ठरला आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या काळात (२०२०-२१) भारताने जगात काकडी आणि खिरी काकडीची १,२३,८४६ मेट्रिक टन म्हणजेच, ११४ दक्षलक्ष डॉलर्सची निर्यात केली आहे.
भारताने गेल्या आर्थिक वर्षात, कृषि प्रक्रिया उत्पादने, लोणच्याची काकडी अशा पदार्थांच्या उत्पादनात, २०० दशलक्ष डॉलर्सपेक्षा अधिक अधिक मूल्यांची निर्यात केली. जगभरात काकडी आणि लोणच्याची काकडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कृषिमालात देशाच्या निर्यातीत वाढ केली आहे.
२०२०-२१ या वर्षात, भारताने २,२३,५१५ मेट्रिक टन काकडीची, म्हणजेच २२३ दशलक्ष डॉलर्स मूल्यांच्या काकडीची निर्यात केली.
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील, वाणिज्य विभागाच्या निर्देशांनुसार, कृषि आणि अन्नप्रक्रिया निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा) ने पायाभूत विकास, जागतिक बाजारात उत्पादन प्रोत्साहन देण्याबाबत अनेक उपक्रम राबवले आहेत. त्याशिवाय, अन्नप्रक्रिया केंद्रात अन्न सुरक्षा व्यवस्थापनाच्याही उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
India’s Cucumber / Gherkins exports (in US million tonne)
2020-21 | 2021-22 (April-November) | ||
HSN code | Products | US million | US million |
20011000 | Cucumber/Gherkins prepared and preserved in Vinegar / Acetic acid | 138 | 72 |
07114000 | Cucumber/Gherkins provisionally preserved | 85 | 42 |
Total | 223 | 114 |
Source: DGCIS