मुक्तपीठ टीम
प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचं वयाच्या ८३ वर्षी निधन झालं आहे. ‘पद्मविभूषण’ने सन्मानित बिरजू महाराज यांनी दिल्लीतील साकेत रुग्णालयात उपचारादरम्यान रविवारी मध्यरात्री अखेरचा श्वास घेतला. त्यांचे नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.
वडील-काकांकडून नृत्याचे धडे
- बिरजू महाराज यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९३८ रोजी लखनौच्या ‘कालका-बिंदादिन घराण्यात’ झाला.
- त्यांचे खरे नाव पंडित बृजमोहन मिश्रा होते.
- ज्या रुग्णालयात बिरजू महाराजांचा जन्म झाला, तिथे ते सोडून इतर सर्व मुली जन्माल्या होत्या, म्हणूनच त्यांचे नाव बृजमोहन ठेवण्यात आले.
- त्यांच्या वडिलांचे नाव जगन्नाथ महाराज होते आणि ते आच्छान महाराज म्हणून ओळखले जात होते.
- वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी बिरजू महाराजांना कलेची दीक्षा देण्यास त्यांच्या वडिलांनी सुरुवात केली.
- पण वडिलांच्या मृत्यूनंतर लगेचच त्यांना त्यांचे काका, सुप्रसिद्ध गुरु शंभू आणि लच्छू महाराज यांनी प्रशिक्षण दिले.
- बिरजू महाराजांना यांना तीन मुली आणि दोन मुलगे आहेत.
- त्यांची तीन मुले ममता महाराज, दीपक महाराज आणि जय किशन महाराजही कथ्थकच्या जगात नाव कमावत आहेत.
चित्रपटांसाठीही बिरजू महाराजांचं नृत्य दिग्दर्शन
- बिरजू महाराजांनी गोवर्धन लीला, माखन चोरी, मालती-माधव, कुमार संभव आणि फाग बहार इत्यादी विविध प्रकारच्या नृत्यप्रकारांची रचना केली.
- सत्यजित रॉय यांच्या ‘शतरंज के खिलाडी’ या चित्रपटासाठी त्यांनी उच्च दर्जाच्या दोन नृत्यनाट्यांची रचना केली.
- तबला, पखवाज, ढोलक, नाल आणि तंतुवाद्य, व्हायोलिन, स्वर मंडळ आणि सतार इत्यादी तालवाद्यांचे त्यांना विशेष ज्ञान होते.
- देवदास, देढ इश्किया, उमराव जान आणि बाजीराव मस्तानी यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांसाठी बिरजू महाराज यांनी नृत्य दिग्दर्शन केले होते.
- याशिवाय सत्यजित रे यांच्या ‘शतरंज के खिलाडी’ या चित्रपटालाही त्यांनी संगीत दिले होते.
कथ्थक केंद्रात बिरजू महाराजांनी वाढवली कला परंपरा…
- बिरजू महाराज यांनी वयाच्या १३व्या वर्षी दिल्लीतील संगीत भारती येथे नृत्य शिकवण्यास सुरुवात केली.
- त्यानंतर त्यांनी दिल्लीतील भारतीय कला केंद्रातच अध्यापन सुरू केले.
- काही काळानंतर त्यांनी कथ्थक केंद्रात शिकवण्याचे काम सुरू केले. येथे ते प्राध्यापक आणि संचालकही होते.
- त्यानंतर १९८ मध्ये ते तेथून निवृत्त झाले.
- यानंतर दिल्लीतच कलाश्रम नावाने थिएटर स्कूल सुरू करण्यात आले.
बिरजू महाराजांच्या कलासाधनेचा प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरव!
- बिरजू महाराजांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत.
- १९८६ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- यासोबतच त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कार आणि कालिदास सन्मानही मिळाला आहे.
- यासोबतच बनारस हिंदू विद्यापीठ आणि खैरागड विद्यापीठातून त्यांना मानद डॉक्टरेट मिळाली.
- २०१२ मध्ये, त्यांना विश्वरुपम चित्रपटातील नृत्य नृत्यदिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
- २०१६ मध्ये बाजीराव मस्तानी या हिंदी चित्रपटातील ‘मोहे रंग दो लाल’ या गाण्यासाठी नृत्यदिग्दर्शनासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.