मुक्तपीठ टीम
केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून प्रेशर कुकरची विक्री करणार्या १५ ई-कॉमर्स कंपन्या आणि विक्रेत्यांना नोटीस बजावली आहे. ग्राहक सुरक्षेसाठी सरकारने जारी केलेल्या वैधानिक आयएसआय मापदंड आणि ग्राहक संरक्षण नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. घरगुती प्रेशर कुकरच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल तीन नोटिसा आणि हेल्मेटसाठी क्यूसीओचे उल्लंघन केल्याबद्दल दोन नोटिसा बजावल्या आहेत.
प्रेशर कुकर आणि हेल्मेटमधील मापदंडाकडे दुर्लक्ष
- या संदर्भात, मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बीआयएसने घरगुती प्रेशर कुकरच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल तीन नोटिसा आणि हेल्मेटसाठी क्यूसीओचे उल्लंघन केल्याबद्दल दोन नोटिसा बजावल्या आहेत.
- केंद्र सरकारने ग्राहकांना अलर्ट जारी करताना ग्राहकांना घरगुती वापराच्या वस्तूंमध्ये आयएसआयची आवश्यकता काटेकोरपणे पाळण्यास सांगितले आहे आणि चिन्हाशिवाय उपकरणे खरेदी करू नका असा सल्ला दिला आहे.
- एवढेच नाही तर विभागाने ६ डिसेंबर रोजीच सीसीपीए अंतर्गत सुरक्षा नोटीस जारी केली होती.
- यामध्ये ग्राहकांना अनिवार्य मानकांचे उल्लंघन करणारे हेल्मेट, प्रेशर कुकर आणि एलपीजी सिलिंडर खरेदी करण्याविरूद्ध चेतावणी दिली होती.
केंद्र सरकारने दिलेली अधिकृत माहिती विस्ताराने पुढील प्रमाणे आहे
वैध आयएसआय मानकाशिवाय आणि केंद्र सरकारने जारी केलेल्या सक्तीच्या मानकांचे उल्लंघन करणाऱ्या गृहोपयोगी वस्तू खरेदी करण्यापासून केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने ग्राहकांना सावध केले आहे. ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्या कलम 18(2)(j) अंतर्गत प्राधिकरणाने ही सुरक्षा नोटीस जारी केली आहे.
ग्राहकांना इजा आणि नुकसान पोहोचू नये यासाठी आणि आवश्यक सुरक्षा तसेच तांत्रिक निकषांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी, भारतीय मानक ब्युरोच्या कलम 16 अंतर्गत, दर्जा राखण्यासाठी आणि मानक चिन्हाचा अनिवार्य वापर करण्यासाठी निर्देश देण्याचे अधिकार केंद्र सरकारला आहेत. गुणवत्ता नियंत्रण आदेश या स्वरुपात हे निर्देश प्रसिद्ध केले जातात.
याआधी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने 06.12.2021ला सुरक्षा नोटीस जारी करत, अनिवार्य निकषांचे उल्लंघन करणाऱ्या हेल्मेट,प्रेशर कुकर,स्वयंपाकाचा, गॅस सिलेंडर खरेदी करताना ग्राहकांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. सक्तीच्या मानकांचे उल्लंघन करणाऱ्या वस्तूंची, ग्राहक अंतर्गत संरक्षण कायदा 2019 अंतर्गत सदोष म्हणून गणना होते.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने,बनावट वस्तूं विरोधात याआधीच देशव्यापी मोहीम सुरु केली आहे.
सक्तीच्या मानकांचे उल्लंघन करत प्रेशर कुकरची ऑनलाईन विक्री करणाऱ्या दोषी ई कॉमर्स कंपन्या आणि विक्रेत्यांची केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने स्वतःहून दखल घेत कारवाईला सुरवात केली आहे. या संदर्भात 15 नोटीसा जारी करण्यात आल्या आहेत. भारतीय मानक ब्युरो कायदा 2016 अंतर्गत आवश्यक कारवाईसाठी ही प्रकरणे भारतीय मानक ब्युरो कडेही सोपवण्यात आली आहेत. गुणवत्ता नियंत्रण आदेशाचे उल्लंघन केल्या बाबत भारतीय मानक ब्युरोनेही देशांतर्गत प्रेशर कुकरसाठी 3 तर हेल्मेट साठी 2 नोटीसा पाठवल्या आहेत.
The household goods in reference to which CCPA has issued Safety Notice are as under –
S.No. | Name | Line Ministry | Standard | Date of coming into force |
1 | Electrical Immersion Water Heaters | DPIIT | IS 302-2-201 (1992) | 17.02.2003 |
2 | Electric Iron | DPIIT | IS 302-2-3 (1992) | 17.02.2003 |
3 | Switches for domestic and similar purposes | DPIIT | IS 3854: 1988 | 17.02.2003 |
4 | Domestic Gas Stoves for use with Liquefied Petroleum Gases | DPIIT | IS 4246:20020 | 01.06.2020 |
5 | Microwave Oven | MEITY | IS 302 : Part 2 : Sec 25 : 2014 | 18.09.2021 |
6 | Aluminium Foil for Food Packaging
|
DPIIT | IS: 15392 | 17.08.2020 |
7 | Hand-held Blender | DPIIT | IS 302 : Part 2 :Sec 14 | 01.05.2019 |
8 | Domestic Electric Food Mixer (Liquidizers and Grinders) and Centrifugal Juicer. |
DPIIT | IS 4250 | 01.05.2019 |
9 | Helmet for riders of Two
Wheeler Motor Vehicles |
MoRTH | IS 4151: 2015 | 01.06.2021 |
10 | Sewing Machines | DPIIT | IS 15449 : Part 1 : 2004 | 01.09.2021 |
11 | Cooking Gas Cylinder | DPIIT | As specified in Gas Cylinder Rules, 2016 | 22.11.2016 |
पाहा व्हिडीओ: