मुक्तपीठ टीम
जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHOने जारी केलेल्या माहितीनुसार, जगातील ८९ देशांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंट आढळला आहे. तसेच, वर्दळीच्या ठिकाणी डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही हा व्हेरिएंट जास्त वेगाने पसरतो. त्याची प्रकरणे दीड ते तीन दिवसांत दुप्पट वाढलेली दिसत आहेत. सध्याची उपलब्ध आकडेवारी पाहता, समुदाय स्तरावर विषाणूचा प्रसार जास्त असलेल्या ठिकाणी ओमायक्रॉन डेल्टाला मागे टाकेल अशी भीती आहे.
“१६ डिसेंबर २०२१ पर्यंत, सर्व सहा WHOच्या क्षेत्रांमधील ८९ देशांमध्ये ओमायक्रॉन संसर्ग आढळला आहे,” असे अहवालात म्हटले आहे. अधिक डेटा उपलब्ध झाल्यामुळे ओमायक्रॉन प्रकारांबद्दलची सध्याची समज विकसित होत राहील.”
जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, ओमायक्रॉन हा डेल्टापेक्षा वेगाने पसरतो याचे ठोस पुरावे आहेत. डेल्टा व्हेरिएंटपेक्षा समुदाय संसर्ग पसरलेल्या देशांमध्ये त्याचा प्रसार अधिक वेगाने होत आहे. त्याची प्रकरणे दीड ते तीन दिवसांत दुप्पट होतात.
भारतातही ओमायक्रॉनच्या प्रकरणांमध्ये वेगाने वाढ
- देशात ओमायक्रॉन प्रकाराची ३० नवीन प्रकरणे नोंदवली गेली.
- याआधी २६ नवीन रुग्ण आढळले होते.
- गेल्या तीन दिवसांपासून देशात ओमायक्रॉन संसर्गाचा वेग वाढत आहे.
- अशाप्रकारे, देशात आतापर्यंत ओमायक्रॉनची १४३ प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.
- देशातील १२ राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा संसर्ग आढळून आला आहे.
- तज्ज्ञांच्या मते, हे देशातील चिंतेचे कारण आहे. तज्ज्ञांनी कोरोनापासून बचाव करण्याच्या पद्धतींचा अवलंब करण्याबद्दल सांगितले आहे.
- देशात ओमायक्रॉनची विक्रमी ३० नवीन प्रकरणे नोंदवली गेली. यामध्ये तेलंगणातील बारा, महाराष्ट्रात आठ, कर्नाटकातील सहा आणि केरळमधील चार नवीन रुग्णांचा समावेश आहे.
- देशात सलग तिसर्या दिवशी ओमायक्रॉन प्रकरणांमध्ये सर्वाधिक एक दिवसीय वाढ झाली आहे.
ओमायक्रॉन आणि डेल्टा सुपर वेरिएंट बनण्याची शक्यता
- ओमायक्रॉन आणि डेल्टाबाबत शास्त्रज्ञांच्या नव्या इशाऱ्यांमुळे जगभरातील देशांची चिंता वाढली आहे.
- मॉडर्नाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पॉल बर्टन यांनी सांगितले आहे की, ओमायक्रॉन आणि डेल्टा एकत्रितपणे नवीन आणि अधिक धोकादायक सुपर प्रकार तयार करू शकतात.
- सामान्यत: कोरोनाच्या एकाच प्रकाराची लागण होते. परंतु काही विशेष प्रकरणांमध्ये, दोन व्हेरिएंट एकाच वेळी रुग्णाला संक्रमित करतात.
- जर डेल्टा आणि ओमायक्रॉन दोन्ही पेशींना संक्रमित करतात, तर ते एकमेकांशी डीएनएची देवाणघेवाण करू शकतात.
- या दोन व्हेरिएंटमुळे कोरोनाचे नवीन सुपर व्हेरिएंट तयार होऊ शकते.
- दोन्ही प्रकारांसह, हे पूर्वीपेक्षा अधिक धोकादायक प्रकार बनू शकते.
ओमायक्रॉनची महाराष्ट्रात काय स्थिती?
(शनिवारपर्यंतची माहिती)
- शनिवारी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आणखी ८ रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत. यापैकी ४ रुग्ण मुंबई विमानतळ सर्वेक्षणातील तर ३ रुग्ण सातारा येथे आणि १ रुग्ण पुणे मनपा क्षेत्रातील आहेत.
- शनिवारपर्यंत राज्यात एकूण ४८ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. (मुंबई – १८, पिंपरी चिंचवड -१०, पुणे ग्रामीण- ६, पुणे मनपा -३ , सातारा – ३, कल्याण डोंबिवली – २, उस्मानाबाद -२, बुलढाणा-१ नागपूर -१ ,लातूर -१ आणि वसई विरार -१) .
- यापैकी २८ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
ओमायक्रॉन बाधित आढळलेल्या ८ रुग्णांची सर्वसाधारण माहिती –
मुंबईचे ४ रुग्ण
- मुंबईतील चारही रुग्ण हे विमानतळावरील सर्वेक्षणातून शोधण्यात आले आहेत. यातील एक रुग्ण मुंबईतील आहे.
- इतर ३ रुग्ण छत्तीसगड, केरळ आणि जळगाव येथील रहिवासी आहेत.
- यातील दोघांनी द. आफ्रिकेचा, एकाने टांझानियाचा तर एकाने इंग्लंडचा प्रवास केलेला आहे.
- हे चारही जण पूर्ण लसीकरण झालेले आणि लक्षणविरहित आहेत. सर्वजण सध्या विलगीकरणात आहेत.
सातारा येथील ३ रुग्ण –
- हे पूर्व आफ्रिकेचा प्रवास केलेले एकाच कुटुंबातील सदस्य असून हे सर्वजण लक्षणेविरहित आणि विलगीकरणात आहेत. यातील ८ वर्षाची मुलगी वगळता इतर दोघांचे लसीकरण झालेले आहे.
- पुणे येथील एक रुग्ण हा आंतरराष्ट्रीय प्रवास केलेल्या प्रवाशाचा निकटसहवासित असून १७ वर्षाच्या या मुलीला कोणतीही लक्षणे नाहीत. ती १८ वर्षाखालील असल्याने तिचे लसीकरण झालेले नाही.
दरम्यान १ डिसेंबर पासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –
एकूण आलेले प्रवासी आर टी पी सी आर केलेले प्रवासी आर टी पी सी आर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण
अतिजोखमीचे देश इतर देश एकूण अतिजोखमीचे देश इतर देश एकूण
अतिजोखमीचे देश इतर देश एकूण
१७८७८ १०३७९६ १२१६७४ १७८७८ २६६८ २०५४६ ४५ १६ ६१
या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ५५१ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी ८६ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.