मुक्तपीठ टीम
‘आपलं गाव, आपली माणसं’ म्हटलं की प्रत्येकाला एक वेगळी आपुलकी वाटते. पण हे गाव नेमकं कसं असलं पाहिजे? जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेनं नेमका हाच प्रश्न महिलांना विचारला. जिजाऊच्या लेकींनी आत्मविश्वासानं आपल्या टीमच्या मनातील कल्पना मांडल्या. त्या स्पर्धेतील पहिल्या पाच स्पर्धकांचे व्हिडीओ सादरीकरण ‘मुक्तपीठ’वर गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्रात दाखवलं जाईल. तसेच बातमीतही मांडलं जाईल. आज पालघरच्या कार्तिकी चुरी आणि टीमनं मांडलेलं आदर्श गाव.
माझ्या लाडक्या तायांनो, हे गाव माझं नसून, तुमचं नसून, आमचं नसून, आपल्या सर्वांचं आहे म्हणून आपल्या गावात म्हणजेच आपल्या सर्वांच्या गावात मी आपलं स्वागत करते. आज मी तुम्हाला दाखवणार आहे की, माझ्या गावामध्ये किती योजना आहेत? आणि माझं गाव कसं तत्परतेने काम करते. तर चला मग माझ्या गावातील पहिली प्रमुख गोष्ट म्हणजे ती आहे माझी ग्रामपंचायत. माझी ग्रामपंचायत ही सुजलाम, सुफलाम आहे. आणि गावाच्या प्रत्येक योजना राबवण्यामध्ये सक्षम आहे. माझ्या गावची दुसरी गोष्ट म्हणजे ते आहे पर्यटनस्थळ. माझ्या गावामध्ये भरपूर झाडे आहेत. माझ्या गावामध्ये अजून कोणतीही कंपनी आलेली नाही. त्यामुळे प्रदूषण होत नाही म्हणून माझ्या गावामध्ये माझे गाव बघायला हे बाहेरून लोक येत असतात. त्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी पर्यटनस्थळ बनवलेलं आहे.
त्यानंतर, आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, सौरऊर्जा. आपल्याला नैसर्गिक मिळणारी ऊर्जा ही कशी वापरू शकतो? नैसर्गिक स्त्रोत उपलब्ध असताना आपण उगाचच नको तेवढे पैसे खर्च करून लाइटबिल जास्त भरतो आणि मग ती ऊर्जा आपण घरामध्ये आणतो. त्यापेक्षा आहे ती ऊर्जा कशी वापरता येईल यासाठी आम्ही वेळोवेळी आमच्या गावातील नागरिकांना सौरऊर्जेबद्दल माहिती दिलेली आहे आणि त्यांनी सौरऊर्जा बसवून घेतलेली आहे.
आमच्या गावामध्ये पहिले बाजारपेठ नव्हते. महिलांना आणि पुरूषांना तसेच इतर शालेय मुलांना त्यांच्या आरोग्यजीवनाच्या वस्तू नेण्यासाठी भरपूर लांब-लांब जावे लागत असत, म्हणून आम्ही दर आठवड्याच्या एका सोमवारी इथे बाजारपेठ लावतो. आमच्या इथे आहे गार्डन आणि ते खासकरून लहान मुलांसाठी आहे. कारण, आता आपण बघतो आहे आपल्या तरूण मुली वाढत आहेत. आपली वृद्धपिढी वाढत असताना मुलांना आणि लहान मुलांना कोरोना काळानंतर खेळायचंही माहित नाही आहे. त्यामुळे हे गार्डन लहान मुलांसाठी बनवण्यात आलेलं आहे. तिथे त्यांना, शालेय शिकण्यातून ते कसे खेळ तयार करू शकतात, असे खेळतिकडे बनवलेले आहेत.
आमची दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, स्पोर्ट्स अकॅडमी, आमच्या गावात आहे सैनिक प्रशिक्षण, पोलीस प्रशिक्षण आणि खासकरून महिलांसाठी जीम तिथे तयार करण्यात आले आहे. महिला त्यांच्या आरोग्यविषयक, त्यांच्या शरीराविषयी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. मात्र, त्यांच्या शंका दूर करण्यासाठी काही गोष्टी उपलब्ध होत नाही. तर, त्या जीममध्ये आम्ही महिलांसाठी खास ट्रेनर दिलेली आहे. ती वेळोवेळी त्यांना गाईड करत असते. आमची पुढची गोष्ट आहे, प्राथमिक-माध्यमिक शाळा आणि अंगणवाडी तर यासाठी आम्ही स्कूल हब बनवलेला आहे. जिथे प्राथमिक म्हणजे वयाच्या ६ ते १५ वर्षांपर्यंत येणाऱ्या मुलांना शालेय गोष्टी कशा सोडवता येतील त्यांना त्यांची बुद्धिमता चाचणी कशी वाढवता येईल, त्यांच्या शरीरामध्ये होणारे बदल, त्यांच्या वेळोवेळी होणाऱ्या शंका या कशा दूर केल्या जातील यासाठी आम्ही स्कूल हब बनवलेला आहे.
पुढची गोष्ट म्हणजे आमच्या गावात वाचनालय आहे. आमच्या गावमध्ये भरपूर तरूणमंडळी आहे. परंतु, आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना कामाला जाणे खूप जास्त गरजेचे आहे. पण रात्री उरलेल्या वेळेत त्यांना वाचायचं आहे, अभ्यास करायचा आहे. त्यासाठी आम्ही हे वाचनालय उघडलेलं आहे. पण ते खास असे नाईट म्हणजे काम करून मुलं येतात त्यांच्यासाठी बनवलेलं आहे. दुसरं आमच्या गावात आहे.
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र संचलित स्वच्छ आणि सुंदर गाव ही संकल्पना आम्ही राबवलेली आहे. आणि त्या माध्यमातून आम्ही गावाला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतो आणि इतर योजना आणि उपक्रम राबवत असतो. आमच्या गावामध्ये पाण्याची टाकी आहे, ती गावाच्या एका विशिष्ट टोकावर लावलेली आहे. जेणेकरून, येणाऱ्या भविष्यामध्ये आमच्या गावाला पाणी मिळाले नाही. तर या पाण्याच्या टाकीमुळे आम्ही सर्वांपर्यंत पाणी पोहोचवू शकतो. आमचे गाव हागणदारीमुक्त आहे, तंटामुक्त आहे तसेच गावातील कोणताही पुरूष व्यसन करत नाही. म्हणून आमचे गाव प्रसिद्ध आहे आणि आम्हाला पुरस्कार मिळालेला आहे. आमच्या गावामध्ये जिजाऊ संघटनेच्या महिला मंडळ, महिला बचत गट आणि शाखा आहेत. शाखा असल्यामुळे आमच्या गावातील समस्या गावपातळीवर सोडवता येत नाहीत, त्या आम्ही शाखा सदस्यांच्या माध्यमाने जिजाऊ संघटनेपर्यंत जावून सोडवू शकतो. आणि त्याबद्दल आम्ही जिजाऊ संघटनेचे खूप आभारी आहे.
आमच्याकडे आरोग्य उपकेंद्र आहे. परंतु, ते उपकेंद्र नुसते उपकेंद्र नसून आमच्या उपकेंद्राला २४ तास फिरणारी अॅम्ब्युलन्सदेखील आहे. आमच्या गावामध्ये एक मंदिर आहे. हे मंदिर कोणत्याही देवाचं नाही, हे मंदिर आहे सरस्वती आईचं. तिथे जे स्थलांतरित मजूर असतात, जे त्यांच्या मुलांना शाळेमध्ये कसं काय टाकणार? मग ती मुले कुठे शिकणार? त्यांच्यासाठी खास आम्ही गावातील तरूण मंडळी आहे जी, १०वी ते १५वी या माध्यमामध्ये शिकतात त्यांच्यासाठी रविवारी आम्ही खास क्लासेस घेतो त्यासाठी आमच्याकडे हे सरस्वतीदेवीचं मंदिर आहे.
आमच्याकडे बारमाही शेती आणि तलाव आहे. बारमाही शेतीसाठी वेळोवेळी आम्ही शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत असतो. त्यानंतर आमच्या गावामध्ये लोकांना ओला कचरा, सुखा कचरा वेगळा कसा करायचा याबद्दल प्रशिक्षण दिले जाईल. परंतु हा घरच्या पातळीवर ओला आणि सुखा कचरा वेगवेगळा होतो तो कचरा एकत्र टाकला जात नाही ना याची काळजी घेऊन मोठा ओला कचरा आणि मोठा सुखा कचरा याचे विघटन करून आम्ही सुख्या कचऱ्यापासून टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवतो आणि त्या महिलांना, बचत गटांना बनवायला सांगतो आणि मग ते जत्रेत विकले जातात. पुढची गोष्ट खासकरून महिलांसाठी आहे. महिला पुढे जाव्यात यासाठी आहे. महिलांसाठी आहे औद्योगिक केंद्र, समाज हॉल आहे, म्हणजे प्रत्येक समाजाच्या आमच्या गावात कातकरी समाज आहे, हरिजन समाज आहे, कुणबी समाज आहे, आग्री समाज आहे. प्रत्येक समाजाला एकत्र करून येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्याला एकत्र येऊन लढण्यासाठी एकीचं बळ वापरावे लागेल. यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि यासाठी आम्ही प्रशिक्षण देत असतो.
त्यानंतर आहे आमचं लेडिज मल्टी स्पेशल हॉस्पिटल. याच्यामध्ये आम्ही महिलांना जेणेकरून आता आमच्या मागच्या गावामध्ये एका महिलेला पोटामध्ये गाठ होती हे तिला माहिती नव्हतं परंतु, जिजाऊच्या माध्यमातून आम्ही महिला मंडळ बनवले. त्या महिला मंडळच्या ट्रेनिंगमध्ये जेव्हा आम्ही हॉस्पिटलबद्दल सांगत होतो तेव्हा तिने सांगितले की, माझ्या पोटात दुखतं. त्या तपासणीतून जाणवलं की तिच्या पोटामध्ये अर्धा किलोची गाठ होती आणि आम्ही ती काढली. म्हणून आम्ही त्यासाठी लेडिज मल्टी स्पेशल हॉस्पिटल बनवलेलं आहे. आणि महिलांसाठी स्वयम सहायता गट आहे.
एक गोष्ट आहे ती महत्त्वाची आहे ती आहे आशा गृह उद्योग. आशा हे आपल्या गावासाठी अप्रत्यक्षितरित्या खूप महत्त्वाचं कार्य करत असतात. जे आपल्याला माहित नसते. कोरोना काळात आपण बघितलेलच आहे दारोदारी, वेळोवेळी येऊन आपली तपासणी केलेली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचं गाव हे स्मार्ट व्हिलेज आहे. आता आमच्या गावाला राज्याच्या पातळीवर बघायचे आहे. त्यासाठी गावात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आम्ही तत्पर आहे. आमच्या गावाचं नाव आहे सोगावे. आणि याचं ब्रीदवाक्य आहे, हम होगे कामयाब!!