मुक्तपीठ टीम
आता भारतीय सैन्याला लढण्यासाठी बेल्जियन मालिनॉईस या जातीच्या शिकारी कुत्र्याची साथ मिळालेली आहे. मात्र, आतापर्यंत या जातीचे किती कुत्रे सापडले आहेत, याची माहिती स्पष्ट झालेली नाही.
भारतीय लष्कराला बेल्जियन मालिनॉइस हा शिकारी कुत्रा मिळाला आहे. कुत्र्याची ही जात शहरी भागात चालवल्या जाणार्या कारवायांमध्ये आक्रमकता आणि हेरगिरी कौशल्यांसाठी ओळखली जाते. सैन्याने आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे, ज्यामध्ये प्रशिक्षित बेल्जियन मालिनॉइस या जातीचा हा कुत्रा सैनिकाच्या आदेशानुसार तलावाच्या पलीकडे वेगाने जाताना दिसत आहे.
भारतीय लष्कराने आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले आहे की, “या जातीच्या कुत्र्याचे कौशल्य आणि वैशिष्ट्य म्हणजे वेग, चपळता, तग धरण्याची क्षमता, चावणे, बुद्धिमत्ता आणि प्रशिक्षण घेण्याची क्षमता आहे. यासाठीच तो ओळखला जातो.”
#IndianArmy
RVCC&C of @artrac_ia has introduced the use of @Belgian Malinois dogs as Assault dogs . They are known for their excellent agility, endurance, stamina, bite work, olfactory acuity, intelligence & trainability. pic.twitter.com/jozy1s8WNa— Army Training Command,Indian Army (@artrac_ia) November 28, 2021
या कुत्र्याची जात लोकप्रिय का आहे?
- सध्या जगभरातील सैन्य या जातीचे कुत्र्यांची लढयात मदत घेत आहेत.
- विशेषत: या कुत्र्यांचा वापर करून शत्रूचा खात्मा करण्यासाठी अमेरिकन लष्कराने आपले दोन मोठे ऑपरेशन्स केले आहेत.
- यापैकी एक ऑपरेशन म्हणजे अबोटाबादमध्ये ओसामा बिन लादेनला मारणे.
- याशिवाय, याच बेल्जियन मालिनॉइसने २०१९ मध्ये सीरियामध्ये आयएस लिडर अबू बकर अल-बगदादीचा खात्मा करण्याच्या ऑपरेशनमध्ये मोठी भूमिका बजावली होती.
- नंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून बेल्जियन मालिनॉइसचा फोटो पोस्ट केला.
ही गुणवत्ता जर्मन शेफर्डला अधिक धोकादायक बनवते
- पॅराशूट उड्डाणासाठी ही जात बेल्जियन मालिनॉइसपेक्षा चांगली मानली जाते.
- त्यांच्या लहान संरचनेमुळे, ते बोगदे आणि रस्त्यावर सहजपणे प्रवेश करण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जातात.
- या गुणांमुळे भारतातील काही निमलष्करी दलांनी त्यांना स्वखर्चाने विकत घेतले आहे.
- बेल्जियन मालिनॉईस कुत्र्यांची मदत प्रथम सीआरएफने नक्षलविरोधी कारवायांसाठी घेतली होती, त्यानंतर आयटीबीपी आणि एनएसजी ने देखील त्यांचे सहाय्य घेण्यास सुरुवात केली.
- एनएसजीने प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्येही या जातीची ओळख करून दिली होती.