मुक्तपीठ टीम
- महाराष्ट्रात पुणे आणि गुजरातेतील गांधीनगरमधील व्यवसाय आणि ग्राहकांसाठी ५जी युज केसेसची विशाल श्रेणी प्रदर्शित करत आहे.
- सरकारने वाटून दिलेल्या ५जी स्पेक्ट्रमवर एरिक्सन आणि नोकिया या तंत्रज्ञान भागीदारांसोबत आणि एलअँडटी स्मार्ट वर्ल्ड अँड कम्युनिकेशन, एथोनेट, विझबी अँड ट्वीक लॅब्स या इकोसिस्टिममधील कंपन्या व भारतीय स्टार्ट-अप्स करत आहे ५जी चाचण्या
आघाडीची टेलिकॉम ऑपरेटर कंपनी वोडाफोन आयडिया लिमिटेड (व्हीआयएल) ने त्यांना सरकारकडून वाटून देण्यात आलेल्या ५जी स्पेक्ट्रमवर सध्या महाराष्ट्रातील पुण्यात आणि गुजरातेतील गांधीनगर येथे सुरु असलेल्या ५जी चाचण्यांतर्गत ५जीवर आधारित तंत्रज्ञान सुविधांच्या श्रेणीचे प्रात्यक्षिक आज केले.
वोडाफोन आयडिया लिमिटेडचे एमडी आणि सीईओ श्री. रविंदर ठक्कर यांनी सांगितले, “एकीकडे आमच्या ५जी चाचण्या सुरु आहेत आणि ‘वी’ भारताला वायरलेस मोबाईल कम्युनिकेशन तंत्रज्ञानाच्या पाचव्या पिढीच्या पुढील प्रवासासाठी घेऊन जाण्याची तयारी करत आहे. आमच्या ५जी चाचण्या विविध क्षेत्रातील संधी आणि संभावनांचे एक नवे विश्व प्रदर्शित करतात, अशा संभावना ज्यामुळे भारतामध्ये तंत्रज्ञान सुधारणांचे एक नवे युग नक्कीच अवतरेल. मला खात्री आहे की, ५जी आपले भवितव्य अधिक उज्वल बनवेल, ज्यामध्ये ग्राहक, उद्योगधंदे आणि समाज अशा सर्वांनाच लक्षणीय फायदे मिळतील व भारतामध्ये डिजिटल अर्थव्यवस्थेच्या प्रगतीमध्ये वृद्धी होईल.”
अधिक चांगल्या भवितव्यासाठी ‘वी’ ५जी चाचण्या करत आहे आणि त्यांनी भारतात व्यवसाय व ग्राहकांसाठी अनुकूल अशा युज केसेसची विशाल श्रेणी विकसित केली आहे. पुणे व गांधीनगर या दोन ठिकाणी युज केसेसच्या चाचण्या करण्यासाठी ‘वी’ने उद्योगक्षेत्रातील दिग्गज कंपन्या एलअँडटी स्मार्ट वर्ल्ड अँड कम्युनिकेशन, एथोनेट, भारतीय स्टार्टअप्स विझबी अँड ट्वीक लॅब्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या एरिक्सन आणि नोकिया यांच्याशी भागीदारी केली आहे.
आपल्या ग्राहकांची भरभराट व्हावी आणि त्यांना उज्वल भवितव्य साकारता यावे यासाठी ‘वी’ विविध क्षेत्रांमध्ये ५जी तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेत आहे, यामध्ये इंडस्ट्री ४.०, स्मार्ट शहरे, स्मार्ट आरोग्यसेवा, स्मार्ट कार्यालये, स्मार्ट शिक्षण, स्मार्ट कृषी, गेमिंग आणि अशा इतर अनेक क्षेत्रांचा समावेश आहे. ‘वी’च्या चाचण्यांनी हे सिद्ध केले आहे की, डेटाचा प्रचंड वेग, कमी लॅटेन्सी आणि ५जी तंत्रज्ञानाची विश्वसनीयता यामुळे व्यवसायाच्या कामगिरीत सुधारणा होऊन, ग्राहकांना मिळणाऱ्या अनुभवांमध्ये क्रांती घडून येऊन, ग्राहकांच्या जीवनशैलीत बदल होऊन आणि भारतातील दुर्गम भागातील लोकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव घडून येऊन खूप मोठ्या प्रमाणावर विकास होऊ शकतो.
५जी नेटवर्क चाचण्या आणि युज केसेससाठी टेलिकम्युनिकेशन विभागाने ‘वी’ला एमएमवेव्ह बँडमध्ये २६ गिगाहर्ट्झ आणि ३.५ गिगाहर्ट्झ स्पेक्ट्रम वाटून दिले आहे. ‘वी’ने ३.५ गिगाहर्ट्झवर १.५ जीबीपीएस, २६ गिगाहर्ट्झवर ४.२ जीबीपीएस आणि ई-बँड्सच्या बॅकहॉल स्पेक्ट्रमवर ९.८ जीबीपीएसपर्यंत सर्वाधिक वेग मिळवले आहेत.
पुण्यामध्ये ‘वी’ने स्थापित केलेल्या ५जी चाचणी नेटवर्कमध्ये क्लाऊड नेटिव्ह तंत्रज्ञानावर आधारित एरिक्सन ड्युएल मोड कोअर आणि एरिक्सन रेडिओज् यांचा वापर केला जातो, ज्यामध्ये ५जी एसए, ५जी एनएसए आणि एलटीई पॅकेट कोर फंक्शन्सचा समावेश आहे. पुण्यामध्ये प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आलेल्या सर्व युज केसेसना एरिक्सनच्या ५जी तंत्रज्ञान सुविधांवर विकसित करण्यात आले आहे.
गांधीनगरमध्ये ‘वी’ मोठ्या, लहान व मध्यम उद्योगांना विश्वसनीय कनेक्टिव्हिटी मिळवून देणाऱ्या चाचणीसाठी नोकियाच्या एअरस्केल रेडिओ पोर्टफोलिओ आणि मायक्रोवेव्ह ई-बँड सुविधेचा उपयोग करत आहे.