मुक्तपीठ टीम
कानपूरमधील न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय क्रिकेटपटूंसाठी फक्त ‘हलाल’ मांसाची शिफारस करण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. त्यामुळे आता ‘हलाल’ मांस नेमकं काय असतं, त्याच्या मेनूमधील समावेशामुळे का वाद निर्माण झालाय, ते समजून घेणं आवश्यक आहे.
भारतीय क्रिकेटपटूंसाठी तयार करण्यात आलेल्या मेनूमध्ये पोर्क म्हणजेच डुकराचे मांस आणि गोमांस कोणत्याही स्वरूपात जेवणाचा भाग असू नये, असे स्पष्टपणे नमूद केले आहे. सपोर्ट स्टाफ आणि मेडिकल टीमने खेळाडूंच्या पोषणाचा विचार करून ही आहाराची यादी तयार केल्याचे मानले जात आहे.
हलाल आणि झटका मांस यात काय फरक आहे?
- मांसाहारासाठी प्राण्याला मारण्याची हलाल ही एक वेगळी प्रक्रिया आहे.
- हलाल मांसासाठी, प्राण्यांची श्वसनवाहिनी कापली जाते, ज्यानंतर त्यांचा रक्तस्त्राव होत तडफडत जीव जातो.
हलाल पद्धतीत प्राण्यांचा मृत्यू सावकाश हालहाल होत असतो. - दुसरीकडे, झटका मांसासाठी, एका झटक्यात प्राण्यांना मारले जाते.
- हिंदू आणि शीख धर्मातील मांसाहारी लोक झटक्याच्या मांसाला प्राधान्य देतात.
- तर, इस्लाम धर्मात, हलालशिवाय इतर कोणत्याही प्रकारचे मांस निषिद्ध असल्याचा उल्लेख आहे.
पूर्वी पोर्क आणि बीफच्या मांसावर होती बंदी
- एका माजी भारतीय क्रिकेटपटूने सांगितले की आहारात डुकराचे मांस आणि गोमांस समाविष्ट न करणे आश्चर्यकारक नाही परंतु या संदर्भात कधीही लिखित सूचना नाहीत.
- क्रिकेटर म्हणाला, ‘मी संघात असताना सामन्याच्या दिवसांमध्ये गोमांस किंवा डुकराचे मांस ड्रेसिंग रूममध्ये पाठवले जात नव्हते. निदान भारतात तरी नाही.
- त्यामुळे लेखी सूचना देण्याशिवाय यात नवीन काही आहे असे मला वाटत नाही.
टीम इंडियाच्या मेनूमध्ये काय आहे?
- रेसिपीमध्ये कोंबडीचे आणि मेंढीचे असे दोन प्रकारचे मांस नमूद केले आहे.
- सूचीबद्ध मांसाहारी खाद्यपदार्थांमध्ये भाजलेले चिकन, भाजलेले लँब, काळी मिरी सॉससह लँब चॉप्स, मुर्ग यखनी, चिकन थाई करी, मसालेदार ग्रील्ड चिकन, गोवन फिश करी, टंगडी कबाब आणि फ्राइड विथ गार्लिक चटणी चिकन यांचा समावेश आहे.