मुक्तपीठ टीम
एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचं आक्रमक आरोपसत्र सुरु आहेत. शिवसेना नेते संजय राऊत हेही काहीवेळा त्यांच्या सोबत आरोप करतात. आता त्यांच्या माऱ्याला तोंड देणाऱ्या समीर वानखेडेंच्या साथीला भाजपाचे नेते किरीट सोमय्या आले आहेत. तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियाही आता वानखेडेंसाठी आक्रमक झाल्या आहेत.
किरीट सोमय्यांचा ठाकरे-पवारांवर हल्लाबोल
- ठाकरे सरकार चुकीचे वागत आहे.
- शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना हे शोभत नाही.
- नवाब मलिक ज्या प्रकारे चिखलफेक करत आहेत, ते साफ चुकीचं आहे.
- मलिकांनी न्यायालयात जावे. न्यायालय काय तो निर्णय घेईल.
- आघाडी नेत्यांचे घोटाळे बाहेर काढले त्यामुळे लक्ष विचलित करण्यासाठी समीर वानखेडेंना टार्गेट केले जात आहे.
- तरीही आम्ही घोटाळेबाजांना सोडणार नाही.
- आयकर विभागाला अनेक गोष्टी सापडल्या आहेत. ईडीही मागे लागली आहे.
- आम्ही ईडीकडे जाणार आणि तक्रार दाखल करणार.
अंजली दमानियाही समीर वानखेडेंसाठी सरसावल्या
- समीर वानखेडे यांचं काम चांगले आहे.
- नवाब मलिक यांच्याकडून वानखेडे यांची प्रतिमा बिघडवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.
- समीर वानखेडे यांच्या बाजूने सर्व सहकारी आणि अधिकाऱ्यांनी उभे राहणे आवश्यक आहे.
- आज जर त्यांच्यासोबत कुणी उभं राहिलं नाही, उद्या तुम्हीदेखील तुमचं कर्तव्य व्यवस्थित पाडू शकणार नाहीत.
- याच नवाब मलिक यांनी माझ्यावरदेखील दररोज खोटे आरोप केले होते.
- पण पुढे त्यातून काहीच सिद्ध झालं नाही.
- आता हेच नवाब मलिक स्वत:च्या जायवाच्या अटकेचा हिशेब चुकवत आहे.
- वानखेडेंविरोधातील कटकारस्थानाच्या विरोधात सर्वांनी एकत्र येत वानखेडे आणि एनसीबीच्या पाठीशी उभं राहणे आवश्यक आहे.