मुक्तपीठ टीम
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सोमवारी ट्विटरवर एनसीबी आधिकारी समीर वानखेडे यांच्या जन्माच्या दाखल्याचं प्रमाणपत्र प्रसिद्ध केलं होतं, त्यामुळे मोठा वाद उफाळला होता. त्यावर समीर वानखेडे यांनी आपले स्पष्टीकरण देत माझे वडील ज्ञानदेव कचरुजी वानखेडे आणि आई मुस्लिम असल्याचे म्हटले होते मात्र समीर वानखेडे यांचा जन्म दाखला आम्ही जात पडताळणी समितीसमोर देणार आहोत. त्यातून सत्य काय ते बाहेर येईल, असं मलिक यांनी सांगितलं. तसेच समीर वानखेडे यांनी माझ्या मुलीचा सीडीआर पोलिसांकडे मागितला. सीडीआर हा गुन्हेगारांचा मागवला जातो. सीडीआर मागवायला माझी मुलगी गुन्हेगार आहे काय?, असा संतप्त सवाल मलिकांनी केला आहे. एकप्रकारे मलिक वानखेडेंच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करत असल्याच्या आरोपाला त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
वानखेडेंचे जात प्रमाणपत्र खोटे असेल तर खऱ्या दलिताची संधी हुकली असेल!
- आम्ही दिलेले बर्थ सर्टिफिकेट असली
- नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली.
- एखादा दलित व्यक्ती गावखेड्यात अभ्यास करत असेल.
- या खोट्या दाखल्यामुळे त्याची संधी हुकली.
- जो व्यक्ती बनावट जन्म तारीख तयार करून शेड्यूल कास्टच्या कॅटेगिरीत नोकरी मिळवतो.
- त्याच्यामुळे इतरांची संधी हुकली आहे.
- आम्ही दिलेले बर्थ सर्टिफिकेट असली आहे.
- त्यावर त्याच्या वडिलांचं नाव दाऊद असं आहे.
- त्यानंतर या सर्टिफिकेटवर अल्टरेशन करण्यात आलं, असं मलिक यांनी सांगितलं.
जात पडताळणी समितीसमोर प्रमाणपत्र तपासण्याची मागणी
- मुंबईत लोकांचे बर्थ सर्टिफिकेट सर्च करून मिळवता येतं.
- वानखेडेच्या बहिणीचं सर्टिफिकेट इंटरनेटवर आहे.
- पण समीर वानखेडेचं नाही.
- आम्ही खूप शोधल्यानंतर आम्हाला हे सर्टिफिकेट मिळालं.
- ज्ञानेश्वर वानखेडे जन्माने दलित आहेत.
- त्यांनी दलित असल्याचं सर्टिफिकेट घेतलं.
- नोकरी मिळवली.
- त्यानंतर त्यांनी लग्न केलं आणि धर्मांतर केलं.
- त्यानंतर ते आयुष्यभर मुस्लिम म्हणून जगले.
- त्यानंतर समीर वानखेडेंनी वडिलांच्या सर्टिफिकेटचा आधार घेऊन सर्टिफिकेट घेतलं.
- आम्ही या प्रकरणी दलित संघटना आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहोत.
- शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचे सर्टिफिकेट बनवून नोकऱ्या मिळवल्या गेल्या.
- त्याच्या या पूर्वी तक्रारी आल्या.
- त्यानंतर त्याची चौकशी करण्यासाठी जात पडताळणी समिती स्थापन करण्यात आली.
- पण केंद्राकडे अशी कमिटी नाही.
- केवळ जिल्हाधिकाऱ्याकडून प्रमाणपत्रं मिळवलं जातं.
- आता या व्हॅलिडेशन कमिटी समोर हे सर्टिफिकेट तपासण्याची मागणी करण्यात येणार आहे.
जात पडताळणी समितीकडे करणार तक्रार
- खोटं जात प्रमाणपत्र दिल्यास दोन ते सात वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे.
- पडताळणी समितीकडे तक्रार केली जाणार आहे.
- मी दिलेलं प्रमाणपत्र खोटं आहे तर तुमचं असली प्रमाणपत्र जाहीर करा.
- वडिलांचं सर्टिफिकेट दाखवलं जात आहे.
- पण वानखेडेंनी त्यांचं सर्टिफिकेट दाखल करावं.
माझी मुलगी काय गुन्हेगार आहे का?
- नवाब मलिक यांनी मीडियाशी बोलताना हा सवाल केला आहे.
- आम्ही कुणाच्याही खाजगी आयुष्याच्या अधिकाराचा भंग केला नाही.
- एखादा व्यक्ती धर्मांतर करून दुहेरी लाभ घेत असेल तर त्याचा उल्लेख केला पाहिजे.
- सत्य समोर आणण्यासाठी काही गोष्टी बाहेर येत आहेत.
- कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यावर आम्ही घाला घालत नाही. माझ्या जावयाला बंद केलं गेलं.
- कोणत्या आधारावर माझ्या मुलीच्या खाजगी आयुष्याची माहिती मागितली आहे?
- समीर वानखेडेंनी मुंबई पोलिसांना पत्रं लिहून माझ्या मुलीचा सीडीआर मागितला.
- माझी मुलगी निलोफर मलिक काय गुन्हेगार आहे का?
- कोणत्या आधारावर माझ्या मुलीच्या खाजगी आयुष्याची माहिती मागितली आहे?