मुक्तपीठ टीम
उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ महाराष्ट्रात आगाडी सरकारने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. राज्यभरात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला असून काही ठिकाणी हिसंक वातावरण पाहायला मिळाले. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारवर टीका केली आहे.
आजचा बंद हा ढोंगीपणाचा कळस
- देवेंद्र फडणवीस हे पत्रकार परिषद बोलत होते.
- महाविकास आघाडी सरकारचा ढोंगीपण समोर आला आहे.
- हे पूर्णपणे ढोंगी सरकार आहे.
- लखीमपूरच्या घटने करता महाराष्ट्रात बंद केला जातो.
- पण महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी हे सरकार एकही पैसा देत नाही.
शेतकरी संकटात आहे. - हे सरकार आल्यापासून दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.
- सरकारने बांधावर जाऊन २५ हजाराच्या घोषणा केल्या, ५० हजाराच्या घोषणा केल्या, पण या सर्व घोषणा हवेत विरल्या.
- विविध आपत्तीत मदतच केली नाही.
- केली तरी तोकडी केली.
- त्यामुळे घटक पक्षच म्हणून लागले भाजपचं सरकार बरं होतं.
- हे सरकार मदत करत नाही
- त्यामुळे आजचा बंद हा ढोंगीपणाचा कळस.
गोळीबार करणाऱ्यांना आंदोलन करण्याची नैतिकता तरी आहे का?
- मावळमध्ये गोळीबार हेच जालियनवाला होतं
- याच सरकारने मावळला पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता.
- गोळीबार करणाऱ्यांना आंदोलन करण्याची नैतिकता तरी आहे का?
- मावळमध्ये गोळीबार झाला तो जालियनवाला बाग होता, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.
- आजचा बंद संवेदना दाखवणारा नाही तर राजकीय पोळी भाजण्यासाठीचा आहे.
- या बंदला लोकांचा प्रतिसाद नाही.
- प्रशासनाची मदत घेऊन दमदाटी करून पोलीस, जीएसटी प्रशासनाचा वापर करून लोकांना बंद करायला भाग पाडलं जात आहे.
या सरकारचं नाव बंद सराकर
- तसंही या सरकारचं नाव बंद सराकर आहे.
- या सरकारने आल्यापासून योजना, अनुदानं बंद केल्या.
- कोरोना काळात महाराष्ट्र बंद केला.
- आता कुठे छोटे दुकानदार आणि व्यापाऱ्यांचं गाडं रुळावर येत असताना सरकारने बंद पुकारला.
- ईस्टर्न एक्सप्रेसवर दहा लोकांनी जाळपोळ केली.
- त्यावेळी पोलीस बघ्याची भूमिका घेत होते.
- धमक्या देऊन, दमदाटी करून बंद पुकारला जात आहे.
बंदमध्ये जे काही नुकसान होईल ते मविआ सरकारकडूंन वसूल करावे
- सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाने बंद करण्यास मनाई केली होती.
- मुंबई उच्च न्यायालयाने स्यूमोटो घेऊन अवमानना केल्याप्रकरणी या पूर्वी बंद पुकारला म्हणून शिवसेनेला दंड ठोठावला होता.
- सेनेने त्याची भरपाई भरली होती.
- त्यामुळे आजच्या बंदमध्ये जे काही नुकसान होईल,
- त्याची भरपाई ही सरकारकडून वसूल केली पाहिजे. न्यायालयाने स्यूमोटोद्वारे या घटनेची दखल घ्यावी.