मुक्तपीठ टीम
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा दहावा हप्ता १५ डिसेंबरपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी २५ डिसेंबर २०२० रोजी सरकारने शेतकऱ्यांना पैसे हस्तांतरित केले. महाराष्ट्रातील ९५,६४९ शेतकऱ्यांचे पेमेंट अयशस्वी झाले आहेत तर ३०१,२४२ शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता अजून जमा झालेला नाही. हप्ता न मिळण्याची कारणं अनेक असू शकतात यामध्ये आधार, बँक तपशील, नावाचे स्पेलिंग, लाखो शेतकऱ्यांचे बँक खाते नंबरमधील चूक हे कारण असू शकतात. असे शेतकरी त्यांच्या पीएम किसान योजनेच्या अर्जाचं स्टेटस पाहू शकतात आणि दुरुस्ती देखील करु शकतात.
पेमेंट अयशस्वी होणाऱ्यांचे प्रमाण जास्त
- ऑगस्ट-नोव्हेंबरसाठी २ हजार रुपयांच्या लाखो शेतकऱ्यांचे हप्ते अद्याप प्रलंबित आहेत.
- पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक १७५१७३६ शेतकरी आहेत, तर ३३८८ शेतकर्यांना हप्ता मिळालेला नाही.
- त्याचबरोबर ओडिसा दुसऱ्या क्रमांकावर आहे.
- येथील १०५७२५१ शेतकऱ्यांचे हप्ता रखडला आहे.
- तिसऱ्या स्थानावर उत्तर प्रदेशातील ६५८३७६ शेतकऱ्यांचा हप्ता रखडला आहे.
- सहव्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्रात एकूण ११,४५७,४४९ शेतकरी आहेत.
- यामध्ये ९५,६४९ शेतकऱ्यांचे पेमेंट अयशस्वी झाले आहेत तर ३०१,२४२ शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता अजून जमा झालेला नाही.
- या वेळी पेमेंट अयशस्वी होणाऱ्या खात्यांची संख्याही जास्त आहे, म्हणजेच सरकारने पैसे पाठवले, पण शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले नाहीत.
- अशा लाभार्थ्यांची जास्तीत जास्त संख्या उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांची आहे.
- पेमेंट अयशस्वी झाल्यामुळे १२१६७६ शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहोचले नाहीत.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत केंद्र सरकारला कृषी विभागाने पाठवलेल्या काही पडताळलेल्या अर्जांमध्ये, पीएफएमएसद्वारे निधी हस्तांतरणाच्या वेळी अनेक चुका आढळून आल्या, ज्यामुळे हप्त्याची रक्कम हस्तांतरित होत नाही आहे. यामुळे, अर्जात झालेल्या चुका सुधारण्यासाठी परत पाठवल्या जात आहेत.
कोणत्या कारणामुळे पीएम किसान योजनेचे पैसे अडू शकतात?
- शेतकऱ्याचे नाव “इंग्रजी रोमन” मध्ये असणे आवश्यक आहे.
- ज्या शेतकऱ्याचे नाव अर्जामध्ये “मराठी देवनागरी भाषे” मध्ये असेल तर त्यांनी कृपया नाव सुधारित करा.
- आधारवरील तुमचं नाव आणि अर्जावरील तुमचं नाव सारखं असणं आवश्यक आहे.
- IFSC कोड लिहिण्यात चूक.
- बँक खाते क्रमांक लिहिण्यात चूक.
- गावाच्या नावात चूक.
- वरील सर्व प्रकारच्या चुका सुधारण्यासाठी आधार पडताळणी आवश्यक आहे.
- आधार पडताळणीसाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळच्या CSC / वसुधा केंद्र / सहज केंद्राशी संपर्क साधावा.
राज्य | शेतकऱ्यांची संख्या | RFT Signed | पेमेंट अयशस्वी | पेमेंट पेंडिंग |
पश्चिम बंगाल | ४,०२१,९२५ | ४,४८५,६२१ | ३,३८८ | १,५५१,७३६ |
ओडिसा | ४,०५०,२३४ | ४,००३,०६९ | १९,८६० | १,०५७,२५१ |
उत्तर प्रदेश | २८,१४४,४२७ | २३,०१७,४०० | १२१,६७६ | ६५८,३७६ |
गुजरात | ६,४४१,३१२ | ५,३७६,०२८ | ५१,६२२ | ४७५,९६१ |
राज्यस्थान | 7,882,296 | ७,२००,७३९ | ५५,६०६ | ३३३,९७३ |
महाराष्ट्र | ११,४५७,४४९ | ११,३९४,८०१ | ९५.६४९ | ३०१,२४२ |
आसाम | ३,१२५,६९१ | १,१५७,२४९ | १,४५२ | २९७,९८६ |
मध्य प्रदेश | ८,९६९,८५५ | ८,४४२,०१७ | ५४,०७६ | २५१,०५० |
झारखंड | ३,०८८,९६५ | १,४८६,२७३ | ४,३८७ | २०४,९३३ |
छत्तीसगड | ३,८२५,९३८ | ३,०४६,२९९ | २२,७७५ | १७९,७७० |
कर्नाटक | ५,७३२,२२५ | ५,२०१,२९१ | ७५,१९६ | ८१,३३१ |
बिहार | ८,३७९,०२९ | ८,१८१,०१२ | २५,७८४ | ६८,६६४ |