अपेक्षा सकपाळ
जम्मू-काश्मिरला केंद्रशासित प्रदेश घोषित केल्यापासून पाकिस्तानचा रोजच जळफळाट होताना दिसतो. जगभर वाडगा घेऊन फिरणारा पाकिस्तान भिकेसाठीही काश्मीरचाच मुद्दा वापरतो. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. भारताने यावेळी पाकिस्तानची बोलतीच बंद केली. पाकिस्तानी पंतप्रधानांच्या अपप्रचाराला मुंहतोड जबाब देणारी एक भारत कन्या होती. तिचं नाव भारताच्या प्रथम सचिव स्नेहा दुबे! कन्या दिवसाच्या निमितानं त्यांची कहाणी…
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान असो किंवा अन्य कुणी अधिकारी. भारताच्याविरोधात गरळ ओकल्याशिवाय त्यांना गप्प बसवतच नाही. यावेळी इम्रान खान यांनी तसंच केलं. त्यांचं दुर्दैव असं की भारताच्यावतीने उत्तर देण्यासाठी समोर एक बहाद्दर भारत कन्या सज्ज होती. भारताच्या प्रथम सचिव स्नेहा. त्यांनी काश्मीरवर पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले आणि बोलणे बंद केले. पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांना आरसा दाखवत स्नेहा दुबे म्हणाल्या की, जम्मू -काश्मीर आणि लडाख हे भारताचे अविभाज्य अंग आहेत आणि नेहमीच राहतील. यामध्ये पाकिस्तानच्या बेकायदेशीर ताब्यात असलेल्या क्षेत्रांचा समावेश आहे. आम्ही पाकिस्तानला त्यांच्याकडे अवैधरित्या असणारे सर्व भूभाग रिकामे करण्याचे आवाहन करतो. UNGA मध्ये स्नेहाच्या या उत्तरानंतर #SnehaDubey हा ट्रेंड सोशल मीडियावर सुरु झाला.
कोण आहेत स्नेहा दुबे?
- इम्रान खान यांचे बोलणे बंद करणारी स्नेहा दुबे पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीमध्ये यशस्वी झाल्या होत्या.
- स्नेहा दुबेंचे सुरुवातीचे शिक्षण गावातूनच झाले.
- यानंतर त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली.
- त्यानंतर त्य़ा पुढील शिक्षणासाठी दिल्लीला गेल्या.
- दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (जेएनयू) एमए केले आणि नंतर तिथून एमफिल केले.
- त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली
- त्या २०१२ च्या बॅचची महिला IFS अधिकारी आहे.
- आयएफएस झाल्यानंतर त्यांची परराष्ट्र मंत्रालयात नियुक्ती झाली.
- यानंतर, २०१४ मध्ये तिची माद्रिद येथील भारतीय दूतावासात नियुक्ती झाली.
- त्यानंतर काही वर्षांनी संयुक्त राष्ट्र महासभेत भारताच्या पहिल्या महिला सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
- स्नेहा दुबेंना आधीच आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये खूप रस होता, त्यामुळे तिने भारतीय परराष्ट्र सेवेत रुजू होण्याचा निर्णय घेतला.
काय म्हणाल्या स्नेहा दुबे?
- भारताच्या प्रथम सचिव स्नेहा दुबे यांनी राईट टू रिप्लाय अंतर्गत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले.
- दहशतवाद्यांना प्रोत्साहन आणि मदत करण्याचा पाकिस्तानचा इतिहास असल्याचे संयुक्त राष्ट्राच्या सदस्य देशांना माहित आहे.
- विशेष म्हणजे याचा पाकिस्तानच्या धोरणातदेखील समावेश आहे.
- पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठाचा वापर नेहमीच भारताविरोधात खोटे बोलण्यासाठी आणि जगाचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी केला आहे.
- ही पाकिस्तानची पहिलीच वेळ नाही.
- दहशतवादी पाकिस्तानात मुक्तपणे फिरत असून ओसामा बिन लादेनलाही पाकिस्तानने आश्रय दिला होता.
- पाकिस्तान ओसामा बिन लादेला आपल्या देशात शहीद म्हणून उल्लेख करतो.