मुक्तपीठ टीम
बीकेसी अंतर्गत SCLR जोडरस्त्यांवर बीकेसी आणि कुर्ला उड्डाणपूलाला जोडणाऱ्या कामादरम्यान झालेली दुर्घटना सुरक्षा मानक आणि नियमांचे उल्लंघन असून यात झालेला अक्षम्य निष्काळजीपणा लक्षात घेता संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई पोलिसांकडे केली आहे.
मुंबई पोलीस सहित एमएमआरडीएचे महानगर आयुक्त यांस लिहिलेल्या पत्रात अनिल गलगली यांनी नमूद केले आहे की आज पहाटे घडलेल्या दुर्घटनेत कामगार जखमी झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कंत्राटदार आणि अधिकारी वर्गानी केलेला अक्षम्य निष्काळजीपणा माफ करण्यायोग्य नाही. पुलाचा काही भाग कोसळतो म्हणजे कामात दक्षता घेतली गेली नाही आणि हे कृत्य सरळसरळ कामगार वर्गाची हत्या करण्याच्या इराद्याने करण्याचा प्रयत्न आहे. असे गलगली यांचे म्हणणे आहे. अनिल गलगली यांनी महानगर आयुक्त, एमएमआरडीए यांस 30 ऑगस्ट 2021 रोजी एसएमएस करून कामाच्या संथगतीबाबत तक्रार सुद्धा केली होती. आज पोलिसांनी कारवाई केली तर भविष्यात अश्या चुका पुन्हा होणार नाही आणि दक्षता बाळगली जाईल, असे गलगली पुढे म्हणाले.
वांदे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील पुलाचा भाग कोसळल्याचा फटका, पुलाचे काम रेंगाळण्याची भीती!